ETV Bharat / bharat

वडिलांना घेऊन १२०० किलोमीटर सायकल चालवणाऱ्या ज्योतीच्या वडिलांचे निधन, इव्हांका ट्रम्पनेही केले होते कौतुक

author img

By

Published : May 31, 2021, 12:25 PM IST

Updated : May 31, 2021, 12:57 PM IST

'सायकल गर्ल' ज्योतीचे वडील मोहन पासवान यांचे सोमवारी निधन झाले. हृदय विकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. ज्योतीने आपल्या वडिलांना घेऊन अवघ्या सहा दिवसांमध्ये गुडगाव ते दरभंगा असा 1200 किलोमिटरचा प्रवास सायकलवर केला होता. तेव्हापासून ती संपूर्ण देशात सायकल गर्ल नावाने प्रसिद्ध झाली.

सायकल गर्ल ज्योती
सायकल गर्ल ज्योती

दरभंगा - 'सायकल गर्ल' ज्योतीचे वडील मोहन पासवान यांचे सोमवारी निधन झाले. हृदय विकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. ज्योतीने आपल्या वडिलांना घेऊन अवघ्या सहा दिवसांमध्ये गुडगाव ते दरभंगा असा 1200 किलोमिटरचा प्रवास सायकलवर केला होता. तेव्हापासून ती संपूर्ण देशात सायकल गर्ल नावाने प्रसिद्ध झाली.

कोण आहे ज्योती पासवान ?

ज्योती पासवान ही मुळची दरभंगा जिल्ह्यातील सिरहुल्ली गावची रहिवासी आहे. ती आपल्या कुटुंबासोबत गुडगावमध्ये राहात होती. तिचे वडील मोहन पासवान हे रीक्षाचालक होते. लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवाहार ठप्प झाले, अनेकांवर बोरोजगारीचे संकट कोसळले, यातीलच एक ज्योतीचे कुटुंब देखील होते. लॉकडाऊनमुळे आधिच अडचणीत सापडेल्या ज्योतीच्या वडिलांचा याचदरम्यान अपघात झाला. वडिलांचा अपघात आणि लॉकडाऊन यामुळे ज्योतीने अखेर आपल्या मुळ गावी सिरहुल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. तिने त्यासाठी एक जुनी सायक खरेदी केली. या सायकलवर आपल्या वडिलांना घेऊन ती गुडगाववरून दरभंगाला निघाली. तीने अवघ्या सहा दिवसांत 1200 किलोमिटरचे अंतर पार केले. ही बातमी प्रसार माध्यमातून प्रचंड व्हायरल झाली. बातमी व्हायरल होताच तिचे सर्व स्थरातून कौतुक झाले. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनार्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांका ट्रम्प यांनी देखील ट्विट करत ज्योतीचे कौतुक केले होते. आज तिच्या वडिलांचे निधन झाले आहे.

हेही वाचा - दहावीच्या परीक्षांचे काय? राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाकडे मागितला वेळ

Last Updated : May 31, 2021, 12:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.