फरीदाबाद फरीदाबादच्या सिक्री गावात Son murder in Sikri village of Faridabad सोमवारी एक धक्कादायक घटना घटली. ज्यामध्ये एका दारुड्या पित्याने बायकोशी भांडण झाल्याचा रागातून स्वत:च्या 12 वर्षांच्या मुलाची हत्या केली. Father kills son in Faridabad आरोपी पिता सोमवारी रात्री उशिरा दारूच्या नशेत घरी पोहोचला. यानंतर त्याने आधी पत्नीला मारहाण beaten to wife केली. त्यानंतर मोठ्या मुलालाही बेदम मारहाण केली. मारहाण केल्यानंतर आरोपीने त्याच्या लहान मुलाला पळवून नेले आणि त्याचा गळा दाबून खून केला. father murder his son by strangulation
बायकोचा राग काढला लहान मुलावर कुटुंबीयांच्या म्हणण्याप्रमाणे, आरोपी पिता नशेत घरच्यांशी रोज घरात भांडण करायचा. सोमवारी रात्रीही त्याने मोठ्या मुलाला बेदम मारहाण केली. त्याच्या शरीरावर जखमांच्या खुणा आहेत. या भांडणानंतर तो लहान मुलाला घेऊन घराबाहेर पडला. नंतर त्यानेच मुलाची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. मुलाचे आजोबा वीर सिंग यांच्या म्हणण्यानुसार आमचा नातू हितेश याची त्याच्या वडिलांनी हत्या केली आहे. फरिदाबाद सेक्टर 58 पोलिस स्टेशनचे एसएचओ भूपेंद्र कुमार यांनी सांगितले की, मुलाच्या वडिलांना ड्रग्जचे व्यसन आहे. त्याचे पत्नीशी दररोज भांडण होत असे. घटनेच्या दिवशीही त्यांच्या घरात भांडण झाले होते. त्यानंतर आरोपी वडिलांनी मोठ्या मुलाला आणि त्याच्या आईला खोलीत बंद केले आणि लहान मुलाला घेऊन निघून गेला. त्यानंतर शेजाऱ्यांनी लहान मुलाचा मृतदेह पाहिला. आरोपी वडील निखिल हा फरार आहे. त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
हेही वाचा अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात अनेक जवानांचा मृत्यू