हमीरपूर : जिल्ह्यात एक अनोखा विवाह घडला आहे. बुलडोझरची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. उत्तर प्रदेशातील हमीपपूरमध्ये वराला वधू पित्याकडून हुंड्यामध्ये भेट म्हणून बुलडोझर दिला. यानंतर लग्न मंडपात उपस्थित पाहुण्यांनी योगी बाबा झिंदाबादच्या घोषणा दिल्या. विशेष म्हणजे वर भारतीय नौदलात कार्यरत आहे. तर, वधूदेखील स्पर्धा परिक्षांची तयारी करत आहे. लग्नाची भेट म्हणून वराला बुलडोझर दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तर उत्तर प्रदेशात हुंड्यासाठी कोणी बुलडोझर दिल्याची ही पहिलीच घटना आहे. (Hamirpur groom got bulldozer as dowry)
-
#हमीरपुर - उत्तर प्रदेश में शादी में उपहार स्वरूप बुलडोजर दिए जाने का पहला मामला आया सामने,भारतीय नौसेना में कार्यरत योगी ऊर्फ योगेंद्र को मिला शादी में उपहार स्वरूप बुलडोजर.शादी में बुलडोजर दिए जाने की चर्चा पूरे जिले में,लड़की का पिता बोला कार देते तो खड़ी रहती, pic.twitter.com/vglxJ3bx7v
— Sandeep Mishra (@sandeepmishraLK) December 17, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#हमीरपुर - उत्तर प्रदेश में शादी में उपहार स्वरूप बुलडोजर दिए जाने का पहला मामला आया सामने,भारतीय नौसेना में कार्यरत योगी ऊर्फ योगेंद्र को मिला शादी में उपहार स्वरूप बुलडोजर.शादी में बुलडोजर दिए जाने की चर्चा पूरे जिले में,लड़की का पिता बोला कार देते तो खड़ी रहती, pic.twitter.com/vglxJ3bx7v
— Sandeep Mishra (@sandeepmishraLK) December 17, 2022#हमीरपुर - उत्तर प्रदेश में शादी में उपहार स्वरूप बुलडोजर दिए जाने का पहला मामला आया सामने,भारतीय नौसेना में कार्यरत योगी ऊर्फ योगेंद्र को मिला शादी में उपहार स्वरूप बुलडोजर.शादी में बुलडोजर दिए जाने की चर्चा पूरे जिले में,लड़की का पिता बोला कार देते तो खड़ी रहती, pic.twitter.com/vglxJ3bx7v
— Sandeep Mishra (@sandeepmishraLK) December 17, 2022
म्हणून बुलडोझर भेट : योगेंद्र योगी आणि नेहा प्रजापती यांच्या लग्नात भेट म्हणून मिळालेला बुलडोझर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. मुलगी नेहाला भेट म्हणून 'कार' दिली असती, तर दारातच उभी राहिली असती, पण 'बुलडोझर दिल्याने तो अनेक कामांसाठी उपयोगात आणला जाऊ शकतो. यातून उत्पन्नही सुरू होईल असे कारण वधूच्या वडिलांनी दिले आहे.
नेमका प्रकार काय? हमीरपूर जिल्ह्यातील सुमेरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील देवगाव येथील रहिवासी परशुराम प्रजापती भारतीय लष्करात कार्यरत आहेत. त्यांनी त्यांची मुलगी नेहा प्रजापती हिचे लग्न भारतीय नौदलात कार्यरत असलेल्या योगेंद्र यांच्यासोबत करण्याचे निश्चित केले. शुक्रवारी लग्नाचे इतर विधी आटोपल्यानंतर वधूच्या वडिलांनी वराला चक्क बुलडोझर गिफ्ट दिले. ही भेट पाहून वऱ्हडीदेखील आचंबित झाले. यावेळी उपस्थित काही वऱ्हाडींनी योगी बाबा जिंदाबादच्या घोषणा दिल्या. भेट म्हणून गाडी ऐवजी बुलडोझर चांगला असल्याचे आणि उपयोगी असल्याचे मत वऱ्हाडींनी व्यक्त केले आहे.