नवरात्रौत्सव ( Navratri 2022 ) आपल्या देशातील मोठा सण आहे. नवरात्रीचे दिवस अतिशय शुभ मानले जातात. भक्तगण मनोभावे ९ दिवस उपवास ठेवून देवीच्या चरणी आपली सेवा अर्पण करतात. काही जण केवळ फलाहार करणं पसंत करतात तर काही वेगवेगळ्या फराळाचा आस्वाद घेतात. नवरात्रीच्या उपवासासाठी जाणून घेऊया फराळाच्या या नऊ सोप्या पाककृती. ( Fasting During Navratri Know Nine Delicious Navratri Recipes In Marathi )
- उपवासाचा बटाट्याचा शिरा -
साहित्य : बटाट - ४ (मध्यम आकाराचे), साखर- १/४ कप, तूप - दोन चमचे, फ्रेश क्रीम दोन चमचे, वेलची पावडर- अर्धा चमचा
कृती : बटाटे उकडून घ्या आणि चांगल्या पद्धतीने मॅश करा.
- एका पॅनमध्ये तूप गरम करा आणि मॅश केलेले बटाटे तुपात परतून घ्या. मध्यम आचेवर बटाटे शिजवून घ्या.
- बटाटे शिजल्यानंतर त्यामध्ये साखर आणि क्रीम मिक्स करा. साखर पूर्णतः विरघळेपर्यंत सर्व सामग्री ढवळत राहा.
- शिरा तयार झाल्यानंतर वरून वेलची पावडर सोडावी. गरमागरम शिऱ्याचा आस्वाद घ्यावा.
2 . बटाट्याची तिखट शंकरपाळी -
साहित्य : बटाटे - चार ते पाच, पुदिन्याची पावडर - एक छोटा चमचा, लाल मिरची - आवश्यकतेनुसार, कुट्टूचे पीठ - दोन छोटे चमचे, सैंधव मीठ - चवीनुसार, तळण्यासाठी तेल
कृती : बटाटे सोला आणि मोठ-मोठ्या आकारात कापून घ्या. कापलेले बटाटे दोन ते तीन वेळा पाण्यातून स्वच्छ धुऊन घ्या.
- एक ते दीड तास बटाटे थंड पाण्यामध्ये भिजत ठेवा. यानंतर एका स्वच्छ कापडावर बटाटे पसरून ठेवा.
- सुरणाचे काप तळताना ज्याप्रमाणे पीठ लावलं जातं, त्याप्रमाणे बटाट्याला हलक्या स्वरुपात कुट्टूचे पीठ लावा.
- आता गरम तेलामध्ये बटाटे फ्राय करून घ्या.
- बटाटे तळल्यानंतर वरून मीठ, लाल तिखट, पुदिन्याची पावडर मिक्स करावी. तयार आहे बटाट्याची तिखट खमंग शंकरपाळी.
3 . बिटाची कोशिंबीर -
साहित्य : बीट - ४, पुदिन्याची पाने - ५, फ्रेश क्रीम - ८० ग्रॅम, मोहरीची पेस्ट - एक चमचा, बदाम ४, सैंधव मीठ चवीनुसार, चिमूटभर काळी मिरी पावडर, कोथिंबीर
कृती : बीट उकडून घ्या आणि मध्यम आकारात कापा. पुदिन्याची पाने देखील स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्या.
- बाउलमध्ये कापलेले बीट, पुदिना, फ्रेश क्रीम, मोहरीची पेस्ट, आणि बदाम एकत्र घ्या व चांगल्या पद्धतीने मिक्स करा.
- मिश्रणात मीठ आणि काळी मिरी पावडर देखील मिक्स करावी.
4 . साबुदाण्याचे वडे -
साहित्य : साबुदाणे - ५०० ग्रॅम, तेल - अर्धा कप, उकडलेले बटाटे - २, हिरव्या मिरच्या - ३, कोथिंबीर - अर्धा कप, सैंधव मीठ, लाल मिरची पावडर -अर्धा छोटा चमचा, शेंगदाणे -अर्धा कप
कृती : साबुदाणे पाण्यात स्वच्छ धुऊन घ्या आणि दोन ते तीन तास पाण्यात भिजत ठेवा. बटाटे उकडून घ्या. साबुदाणे भिजल्यानंतर त्यातील पाणी काढून टाका.
- एका मोठ्या बाउलमध्ये बटाटे मॅश करून घ्या. त्यामध्ये शेंगदाण्याचा कुट, बारीक कापलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, लाल मिरची पावडर, सैंधव मीठ आणि भिजलेले साबुदाणे मिक्स करा.
- सर्व सामग्री चांगल्या पद्धतीने एकजीव करून घ्या. वडे तयार करा.
- कढईमध्ये तेल गरम करत ठेवा आणि त्यात वडे तळून घ्या. साबुदाणा वडा तयार झाल्यानंतर शेंगदाण्याची चटणी किंवा दह्यासोबत गरमागरम सर्व्ह करा
5 . साबुदाणा डोसा -
साहित्य : एक वाटी साबुदाणा पीठ, अर्धा वाटी भगर, दोन ते तिन हिरव्या मिरच्या बारीक पेस्ट, मीठ चवीनुसार, तेल
कृती : सर्वप्रथम भगर स्वच्छ पाण्याने धुवुन घ्यावी.
- नंतल मग धुतलेली भगर, साबुदाण्याचं पिठ. थोडे पाणी घालून सर्व मिश्रण एकत्र मिक्सरमधून वाटून घ्या. त्याचं छान स्मूथ बॅटर तयार होईल इतकं बारीक करावं.
- बारीक केलेले मिश्रण आता बारीक केलेल्या हिरव्या मिरचीची पेस्ट, चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून डोस्याचे करतो तसे बॅटर तयार करुन घ्या. बॅटर चांगल एकजीव करुन घ्या.
- बॅटर एकजीव झाल्यानंतर तव्यावर तेल लावून मस्त डोसा तयार करायला टाकावा. एका बाजूने डोसा चांगला भाजून झाला की त्यावर वरुन थोडं तेल घाला. आणि मंद आचेवर डोसा छान क्रिस्पी होउ द्या. अशारितीने तुमचा उपवासाचा साबुदाणा डोसा तयार झाला आहे.
- हा गरमागरम कुरकुरीत डोसा तुम्ही दही किंवा ओल्या शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता.
6 . भगरीचा खास पुलाव -
साहित्य : एक कप भगर, क्वार्टर कप शेंगदाणे, दोन बटाटे, एक चमचा जिरे, दोन चमचे तूप, 4 हिरव्या मिरच्या, एक चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, दोन कप पाणी आणि चवीनुसार मीठ.
कृती : सर्वप्रथम बटाटे धुवून ते उकळण्यासाठी ठेवा आणि भगर धुवून पाण्यात भिजवा. सुमारे 15 ते 20 मिनिटांनंतर भगरमधील पाणी काढून टाका आणि झाकून ठेवा आणि काही काळ सोडा.
- या दरम्यान, भगरेचा भात तयार करण्यासाठी उर्वरित तयारी करा. उकडलेले बटाटे सोलून त्याचे छोटे तुकडे करून हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्या.
- आता गॅसवर एक कढई ठेवा आणि तूप घालून गरम करा. सर्वप्रथम त्यात शेंगदाणे तळून घ्या. शेंगदाणे हलके तपकिरी झाल्यावर त्यांना एका भांड्यात काढून घ्या.
- आता त्यात जिरे घाला आणि तडतडू द्या. यानंतर बटाटे घालून थोडे मीठ टाका आणि बटाटे सुमारे दोन ते तीन मिनिटे तळून घ्या. यानंतर भगर घालून दोन्ही गोष्टी नीट मिक्स करा आणि आणखी दोन मिनिटे राहूद्या.
- आता त्यात पाणी घाला आणि चवीनुसार मीठ घाला आणि शेंगदाणे घाला. यानंतर ते उकळू द्या. उकळल्यानंतर गॅस कमी करा आणि पॅन झाकून ठेवा.
- सुमारे 20 ते 25 मिनिटे शिजू द्या. भगर शिजल्यावर गॅस बंद करा आणि चिरलेली कोथिंबीरवरून टाका. आता गरम गरम सर्व्ह करा.
7 . उपवासाची मसाला इडली
साहित्य : 2 वाट्या भगर, 1 वाटी साबुदाणा, अर्धी वाटी दाण्याचा कूट, चवीप्रमाणे मीठ, मिरची, आलं घ्यावे.
कृती : इडली करतान आधी भगर आणि साबुदाणा रात्रभर वेगवेगळा भिजत घालावा.
- सकाळी दोन्ही वेगळे वाटून मग ते एकत्र करावेत. हे पीठ आंबवावं आणि संध्याकाळी त्यात मिरची आल्याचे वाटण करी.
- मीठ, दाण्याचा कूट घालून मिश्रण चांगल घोटून इडलीपात्रात घालून इडल्या कराव्यात.
8 . उपवासाचे आप्पे -
साहित्य : २ वाट्या भगर/ वरईचे तांदुळ, १/२ वाटी साबुदाणा, हिरवी मिरची पेस्ट, जिरे, दाण्याचा कुट, मीठ
कृती : प्रथम भगर व साबुदाणा वेगवेगळ्या भांड्यात ७-८ तास भिजवुन ठेवा. नंतर भगर व साबुदाणा एकत्रितपणे मिक्सरमधुन वाटुन घ्या व रात्रभर आंबण्यासाठी ठेउन द्या. तयार मिश्रणात हिरवी मिरची पेस्ट, दाण्याचा कुट, मीठ, आवडत असल्यास जिरे घाला.
- आप्पेपात्र गरम झाल्यावर त्यात तेल/तुप सोडुन आप्पे लावुन घ्या. आप्पेपात्रावर झाकण ठेउन सुरुवातीला थोडा वेळ आप्पे तयार होउ द्या. थोड्या वेळाने झाकण काढुन सुरीच्या सहायाने अलगद आप्पे उलटुन घ्या.
- आप्प्यांच्या बाजुने थोड तेल/तुप सोडा.सोनेरी रंग आल्यावर तयार आप्पे चटणी बरोबर सर्व्ह करा.
9 . रताळ्याचा पराठा
साहित्य : अर्धा किलो रताळी, 200 ग्रॅम शिंगाड्याचं पीठ, 200 ग्रॅम राजगिर्याचं पीठ , साजूक तूप आणि वेलची पावडर घ्यावी.
कृती : पराठे करताना आधी रताळी उकडून घ्यावीत. मग ती सोलून कुस्करुन घ्यावीत.
- कढईत थोडं तूप घालून मंद आचेवर कुस्करलेरी रताळी परतावीत. परताना खमंग वास सुटला की त्यात वेलची पावडर घालून हे मिश्रण थंड होवू द्यावे.
- तोपर्यंत पराठ्यांसाठी लागणारं पीठ मळून घ्यावे. यासाठी शिंगाड्याचं आणि राजगिर्याचं पीठ एकत्र करुन पाण्यानं मळून घ्यावे. थोडा वेळ पीठ सेट होवू द्यावे.
- त्यानंतर बटाट्याचा पराठा करतो तसा हा पराठा करावा. त्यासाठी थोडं सारण घ्यावं. आणि ते एका छोट्या लाटीच्या छोट्या पोळीत भरावे.
- बटाट्याच्या पराठ्याप्रमाणे रताळ्याचा हा पराठा शेकून घ्यावा. शेकताना पराठ्यावर तेल किंवा तूप सोडावे. पण हे पराठे तुपावर शेकल्याने ते आरोग्यदायी होतात आणि खमंगही लागतात.