श्रीनगर : नॅशनल कॉन्फर्नसचे प्रमुख आणि श्रीनगर मतदारसंघातील खासदार डॉ. फारुख अब्दुल्ला यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांना शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये (एसकेआयएमएस) दाखल करण्यात आले आहे.
यापूर्वी फारुख यांना ३० मार्चला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर ते काही दिवस गृहविलगीकरणात होते. त्यानंतर तीन एप्रिलला त्यांना एसकेआयएमएसमध्ये हलवण्यात आले होते. आज त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे.
![Farooq Abdullah tests positive for Covid-19 again](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/11310982_abdullah.png)
त्यांचे पुत्र ओमर अब्दुल्ला यांनी ही साधारण बाब असल्याचे सांगितले. कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असतानाही काही दिवस त्यांचा अहवाल पॉझिटिव्हच येतो. फारुख हे उपचारांना उत्तम प्रतिसाद देत आहेत, तसेच त्यांना अतिरिक्त ऑक्सिजनचीही आवश्यकता नसल्याचे ओमर यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : लसीकरणानंतर होणारा संसर्ग, संक्रमण आणि कोव्हिड आजाराविषयी समजून घेऊ या...