ETV Bharat / bharat

आंदोलनकांचा दिल्लीत प्रवेश; दिल्ली सरकार आंदोलकांची योग्य ती काळजी घेणार - शेतकरी दिल्ली चलो आंदोलन

Farmers Delhi Chalo protest LIVE updates
दिल्ली चलो आंदोलनाचा दुसरा दिवस, विरोधानंतरही शेतकऱ्यांची आगेकूच; पाहा LIVE अपडेट्स..
author img

By

Published : Nov 27, 2020, 11:02 AM IST

Updated : Nov 27, 2020, 8:39 PM IST

20:34 November 27

आमच्याकडे सहा महिन्यांचे रेशन आहे. शेतकर्‍यांविरूद्ध असलेले काळ्या कृषी कायद्यातून मुक्त झाल्यानंतर आम्ही परत जाऊ - आंदोलक शेतकरी

20:33 November 27

हरयाणा : पंजाबमधून निघालेले आंदोलक पुढे जाण्यासाठी सध्या दिल्ली-हरयाणाच्या सिंघू सीमेवर थांबले आहेत.  

18:49 November 27

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारमधील अधिकारी बुरारीतील निरंकारी समागम मैदानावर पोहोचले आहेत. तर आम्ही येथे शेतकऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी आलो आहोत. दिल्ली सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने असून अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकार आंदोलकांची काळजी घेईल. - राघव चड्डा, आम आदमी पक्ष

16:58 November 27

पंजाबमधील शेतकऱ्यांचा निषेध लक्षात घेता, दोन रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर पाच गाड्या अर्ध्यावरच थांबविण्यात आल्या आणि पाच इतर वळविण्यात आल्या - उत्तर रेल्वेची माहिती.

15:33 November 27

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहनांची तपासणी करण्यात येत असल्यामुळे दिल्ली-गुरुग्राम सीमेवर वाहतूक कोंडी

15:32 November 27

टिकरी सीमामार्गे आंदोलकांचा दिल्लीत प्रवेश.

15:27 November 27

चलो दिल्ली आंदोलनामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द.

15:02 November 27

आम्ही आमच्या मार्गातील 10 बॅरिअर्स ओलांडले आहेत. आम्हाला आंदोलनासाठी परवानगी दिल्याबद्दल प्रशासनाचे धन्यवाद. आम्ही आनंदी आहोत. आम्हाला फक्त या प्रकरणावर शांततापूर्ण प्रक्रियेने निर्णय हवा आहे. - टिकरी सीमा भागात आंदोलक शेतकऱ्याची प्रतिक्रिया  

15:00 November 27

केंद्र सरकारने आता शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्वरित चर्चा करावी आणि त्या समस्या सोडवाव्यात. - अमरिंदर सिंह (मुख्यमंत्री, पंजाब)

14:59 November 27

आंदोलक शेतकऱ्यांना लोकशाही अधिकाराचा वापर करुन आंदोलन करण्यासाठी दिल्लीत प्रवेश दिलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. - अमरिंदर सिंह (मुख्यमंत्री, पंजाब)

14:56 November 27

सुव्यवस्था राखून शांततेत निदर्शने करावे, दिल्ली पोलीस आंदोलकांना आवाहन

14:47 November 27

आंदोलकांना दिल्लीत प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यांना बुरारी परिसरातील निरंकारी समागम मैदानावर आंदोलनास परवानगी देण्यास आली आहे. - दिल्ली पोलीस आयुक्त

14:12 November 27

सिंघू सीमेवरील परिस्थिती चिघळली; आंदोलकांवर लाठीचार्ज..

सिंघू सीमेवर आंदोलकांनी बॅरिकेट्स तोडत पुढे आगेकूच केली. त्यावेळी झालेल्या झटापटीमध्ये आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे.

13:16 November 27

शेतकऱ्यांशी तातडीने चर्चा करा - कॅप्टन अमरिंदर सिंग

सरकारने चर्चेसाठी तीन डिसेंबरची वाट न पाहता, तातडीने शेतकरी संघटनांशी चर्चा करावी. अशी मागणी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केली आहे.

13:15 November 27

दिल्ली सरकारने पोलिसांची मागणी फेटाळली..

आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना ठेवण्यासाठी दिल्लीतील नऊ क्रीडांगणे तात्पुरत्या तुरुंगात बदलण्याची मागणी दिल्ली पोलिसांनी केली होती. मात्र, दिल्ली सरकारने ही मागणी फेटाळली आहे.

13:14 November 27

ईटीव्ही भारतची प्रतिनिधी जखमी..

शेतकरी आंदोलनाचे वृत्तांकन करत असलेल्या ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधी अर्शदीप कौर या जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

12:39 November 27

भिवानीमध्ये ट्रॅक्टर-ट्रक अपघात; शेतकरी ठार..

दिल्ली चलो आंदोलनासाठी जात असलेल्या शेतकऱ्यांच्या एका ट्रॅक्टरला शुक्रवारी सकाळी ट्रकने धडक दिली. या अपघातात एका शेतकऱ्याच्या मृत्यू झाला. यानंतर संतापलेल्या शेतकऱ्यांनी मृतदेहाला रस्त्यावर ठेवत तिथेच आंदोलन सुरू केले. यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

12:15 November 27

शंभू सीमेवर शेतकऱ्यांची गर्दी..

Farmers Delhi Chalo protest LIVE updates
शंभू सीमेवर शेतकऱ्यांची गर्दी..

पंजाबमधील शेतकरी, शंभू या हरियाणा आणि पंजाबच्या सीमेवर थांबले आहेत. त्यांना पुढे जाण्यापासून अडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात बॅरिकेट्स आणि वॉटर कॅनन सीमेवर तैनात करण्यात आले आहेत.

12:13 November 27

सिरसामध्ये आंदोलक बॅरिकेट्स ओलांडून पुढे..

पंजाबमधील शेतकरी सिरसा येथील बॅरिकेट्स ओलांडून पुढे जात आहेत. आम्ही जे काही करु ते शांततेच्या मार्गाने करु, आम्हाला कोणालाही इजा पोहोचवण्याची इच्छा नाही. आम्हाला येथे महिनाभर रहावे लागले तरी चालेल, असे एका शेतकऱ्याने म्हटले.

12:09 November 27

टिकरी सीमेवर आंदोलक-पोलिसांमध्ये झटापट..

टिकरी सीमेवर आंदोलक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झटापट झाल्याचे पहायला मिळाली.

12:08 November 27

टिकरी सीमेवर शेकडो शेतकरी एकत्र..

टिकरी सीमेवर शेकडो शेतकरी एकत्र..

दिल्लीला जाण्यासाठी टिकरी सीमेवर मोठ्या प्रमाणात शेतकरी आंदोलक एकत्र आले आहेत. त्यांना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.

11:41 November 27

मेरठ-बागपतमध्ये महामार्ग बंद..

शेतकरी आंदोलकांनी मेरठ-बागपतमध्ये महारमार्ग बंद केला आहे. उत्तर प्रदेशातील शेकडो शेतकरीही या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत.

11:39 November 27

नऊ खेळाच्या मैदानांना बनवणार तुरुंग?

शेतकरी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना ठेवण्यासाठी दिल्लीतील नऊ खेळाच्या मैदानांना तात्पुरते तुरुंग बनवण्यासाठी दिल्ली पोलिसांचा विचार सुरू आहे. याबाबत पोलिसांनी दिल्ली सरकारला परवानगी मागितली आहे.

11:36 November 27

सिंघू सीमेवरील आंदोलकांवर अश्रुधुराचा मारा..

सिंघू सीमेवरील आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला. यानंतरही शेतकरी आंदोलक मागे हटण्याच्या विचारात नाहीयेत.

11:33 November 27

दिल्लीपासून केवळ दहा किलोमीटरवर आहेत शेतकरी..

शेतकरी आंदोलक हे आता दिल्लीपासून केवळ दहा किलोमीटर अंतरावर आले आहेत. बहादुरगड-दिल्ली सीमेवर शेकडो शेतकरी आंदोलक पोहोचले असून, पोलीस त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत आहेत.

11:00 November 27

सिंघू सीमेवर सुरक्षा वाढवली..

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा-दिल्ली सीमेवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सीमेवर बऱ्याच ठिकाणी आंदोलकांना परत फिरण्याचे आवाहन करणारे फलक लावण्यात आले आहेत. तसेच काही ठिकाणी बॅरिकेट्सही लावण्यात आले आहेत.

10:52 November 27

दिल्ली चलो आंदोलनाचा दुसरा दिवस..

केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील शेतकरी रस्त्तांवर आले आहेत. शेतकऱ्यांच्या 'दिल्ली चलो' आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. हरियाणा सरकारकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत असूनही शेतकरी दिल्लीच्या दिशेने पुढे जात आहेत.. 

Last Updated : Nov 27, 2020, 8:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.