सिंघू सीमा (हरयाणा) - केंद्राच्या तीन कृषी कायद्याच्या निषेधार्थ दिल्लीच्या सीमेवर शेतकरी तळ ठोकून बसलेला आहे. मात्र शेतकऱ्यांनी ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या वाहनांसाठी सिंघू सीमेवरील महामार्गाची एक बाजू खुली केली आहे. शेतकरी संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी हरियाणा सरकारच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
कोरोना लढाईला शेतकऱ्यांचा पाठिंबा -
शेतकरी नेते दर्शन पाल यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंघू सीमेवरील महामार्गाच्या एका बाजूला असलेले बॅरिकेड्स हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑक्सिजन, रुग्णवाहिका व अशा प्रकारच्या आपत्कालीन सेवांना हा मार्ग उपलब्ध होईल. तसेच आंदोलक शेतकरी कोरोनाच्या लढात सर्व मार्गाने पाठिंबा देतील.
शेतकाऱ्यांवरील आरोप निराधार -
दिल्लीत ऑक्सिजन पुरवठा रोखत असल्याचा शेतकर्यांवरील आरोप निराधार असल्याचे पाल म्हणाले. राजधानीकडे जाणारे ऑक्सिजन ट्रक चुकीच्या दिशेने जाताना दिसत आहेत. शेतकरी नेत्यांनी रस्त्यावर बॅरिकेड्स लावल्याबद्दल ठपका सरकारने ठेवला होता.