हावेरी : संतप्त शेतकऱ्याने भ्रष्टाचाराविरोधात वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले. हावेरी जिल्ह्यातील सावनूर नगरपालिकेत एका शेतकऱ्याने लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांना बैल देऊन आपली असहायता व्यक्त केल्याची घटना घडली आहे. 'साहेब, तुम्ही मागितले तेवढे पैसे माझ्याकडे नाहीत. त्याऐवजी बैल घ्या,' असे तो म्हणाला.
घराचे खाते बदलण्यास मागितली लाच : यल्लप्पा राणोजी नावाच्या शेतकऱ्याने आपली निराशा वेगळ्या पद्धतीने व्यक्त केली. त्यांनी लाच मागणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना एक चाबुक आणि बैल देण्याची तयारी दर्शवली आहे. 'घराचे खाते बदलण्यासाठी अधिकार्यांनी पैसे मागितले होते. ज्या अधिकार्यांना आधी पैसे मिळाले होते, त्यांची बदली झाली आहे. आता नवीन आलेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा पैसे देण्याची मागणी केली आहे,' त्यामुळे शेतकर्याने असहायता व्यक्त केली. त्यामुळे पैसे मिळत नाही तोपर्यंत हा बैल जपून ठेवा, असे म्हणत यल्लाप्पा पालिकेसमोर हजर झाले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया : शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आज संध्याकाळपर्यंत खाते बदलणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्याला न्याय देण्याचे आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले. याप्रकरणात गुंतलेल्या नगरपालिकेच्या तीन्ही अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे.
लाच प्रकरणी भाजप आमदाराची तपासणी : कर्नाटकातील 'टेंडरसाठी लाच' घोटाळ्यातील मुख्य आरोपी भाजपचे आमदार मदल विरुपक्षप्पा गुरुवारी बेंगळुरूमध्ये लोकायुक्त तपास अधिकाऱ्यांसमोर हजर झाले. कर्नाटक उच्च न्यायालयाने विरुपक्षप्पा यांना तपास यंत्रणेसमोर हजर राहण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली होती. तपास अधिकारी अँथनी जॉन यांच्यासमोर भाजप नेते हजर झाले. लोकायुक्त सूत्रांनी सांगितले की, जॉन यांनी तपास सुरू केला असून, या प्रकरणाबाबत आमदाराची चौकशी करण्यात आली.
केएसडीएल कार्यालयातील एका कंत्राटदाराकडून 40 लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली आमदाराचा मुलगा आणि सरकारी अधिकारी प्रशांत मदाल यांना 2 मार्च रोजी अटक करण्यात आली होती. लोकायुक्त अधिकार्यांनी छापे टाकून आरोपींची कार्यालये आणि निवासस्थानातून 8 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. आरोपी विरुपक्षप्पा कर्नाटक सोप अँड डिटर्जंट लिमिटेड (KSDL) चे अध्यक्ष होते आणि त्याचा मुलगा मदाल त्याच्या वडिलांच्या वतीने लाच घेत होता.
हेही वाचा : Beed Crime News : आमदार प्रकाश सोळुंके यांच्यावर गुन्हा दाखल, वाद पेटला