ETV Bharat / bharat

Exotic Vegetables In Kashmir : काश्मीरच्या नंदनवनात शेतकऱ्याने पीकवला विदेशी भाजीपाला, महिन्याला कमवतात लाखो रुपये - फारुख अहमद गनी

पुलवामा जिल्ह्यातील शेतकऱ्याने काश्मीर खोऱ्यातील नंदनवनात विदेशी भाजीपाला पीकवला आहे. त्यामुळे या शेतकऱ्याला मोठा फायदा झाला असून वर्षाला 8 लाखाचे उत्पन्न या शेतकऱ्याला मिळत आहे.

Exotic Vegetables In Kashmir
शेतकरी फारुख अहमद गनी
author img

By

Published : Apr 24, 2023, 12:52 PM IST

पुलवामा : काश्मीरच्या नंदनवनातील शेतकरी नेहमी नवनवे प्रयोग करतात. काश्मीर आतापर्यंत फक्त केशर, सफरचंद आणि मसाल्यांसाठी प्रसिद्ध होते. मात्र आता या नंदनवनातील शेतकऱ्यांनी चक्क विदेशी भाजीपाला पीकवण्यास सुरुवात केली आहे. विदेशी भाजीपाल्याच्या माध्यमातून येथील शेतकरी चक्क 8 लाख रुपयाचे उत्पन्न मिळवत आहे. फारुख अहमद गनी असे या विदेशी भाजीपाल्याचे उत्पन्न घेणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे.

सफरचंदांची बाजारपेठ आहे मर्यादित : फारुख अहमद गनी यांनी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात विदेशी भाजीपाला उत्पादन सुरू केले आहे. फारुख अहमद गणी हे काश्मीर खोऱ्यातील इतर शेतकऱ्यांप्रमाणे अनेक वर्षांपासून सफरचंदाची शेती करत होते. सफरचंदांची बाजारपेठ आता मर्यादित असल्याने, आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी बदल करणे आवश्यक असल्याचा त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी स्थानिक कृषी विभागाशी सल्लामसलत केली. त्यावेळी त्यांना विदेशी भाजीपाला आणि पिके वाढवण्याबाबत माहिती मिळाली.

विदेशी भाजीपाल्याने केले मालामाल : कृषी विभागाच्या मदतीने त्यांनी सफरचंद पिकवण्यापासून ते परदेशी भाजीपाला पीकवण्यापर्यंतचा प्रवास केला आहे. गेल्या दोन वर्षांत फारुख यांचे उत्पन्न वार्षिक आठ लाख रुपये झाले आहे. फारूक हे सध्या कांदे, फ्लॉवर, कोबी, टोमॅटो, काकडी, भोपळे आणि बटाटे यासह विविध प्रकारच्या भाज्या पिकवतात. त्यांनी ब्रोकोली, जांभळी ब्रोकोली, शतावरी, बेबी कॉर्न, चेरी टमाटर, थाईम, लाल कोबी, रंगीत बेल मिरची, ओवा (अजमोदा ), सेलेरी आणि लेट्यूस यांसारखी विदेशी पिके घेण्यास सुरुवात केली आहे.

नंदनवनात अनपेक्षित हवामान : काश्मीरच्या खोऱ्यातील हवामान हे नेहमीच विचित्र पद्धतीचे असते. त्यामुळे काश्मीर हे त्याच्या अनपेक्षित हवामानासाठी ओळखले जाते. या शेतकऱ्यांनी या हवामानाचा आपल्या फायद्यासाठी उपयोग करणे शिकून घेतले आहे. त्यांनी शेतीचे नवीन तंत्र विकसित केले. त्यामुळे बदलते हवामान लक्षात घेऊन स्थानिक परिस्थितीला अनुकूल अशी पिके घेण्यास मदत होते. फारुख यांच्या यशाने परिसरातील इतर अनेक शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या प्रशिक्षण कार्यक्रमांना उपस्थित राहून भाजीपाला आणि पिके घेण्यासाठी कृषी विभागाचा सल्ला घेणे सुरू केले आहे.

हेही वाचा - Wrestlers Protest : कुस्ती महासंघाविरोधात कुस्तीपटूंचे आंदोलन सुरूच, जंतरमंतरवर घालवली रात्र, स्वाती मालीवाल म्हणाल्या...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.