दिंडीगुल - शेजाऱ्याच्या दारी आलेल्या कुत्र्याला कुत्रा का म्हटले, यावरुन दोन शेजाऱ्यात प्रचंड हाणामारी झाली. या हाणामारीत शेजाऱ्याने 65 वर्षीय शेजाऱ्याच्या छातीत चाकू भोसकून त्याचा खून केला. ही धक्कादायक घटना दिंडीगुल येथे शुक्रवारी घडली. रायप्पन असे खून झालेल्या शेजाऱ्याचे नाव आहे. तर डॅनियल असे मारेकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रायप्पन आणि डॅनियल एकमेकांचे नातेवाईक : शेजारी राहणारे डॅनियल आणि रायप्पन हे एकमेकांचे नातेवाईकही होते. मात्र शेजाऱ्यांनी पाळलेला कुत्रा रायप्पनवर नेहमी भुंकत होता. त्यामुळे रायप्पन परेशान होता. शुक्रवारीही डॅनियलच्या भावाने पाळलेला कुत्रा पायरप्पनवर भुंकला होता. त्यातू त्यांचे भांडण झाले होते.
कसा झाला डॅनियल आणि रायप्पनचा वाद सुरू : रायप्पन आपल्या नातवासोबत घराबाहेर फिरत होता. यावेळी डॅनियलचा भाऊ व्हिन्सेंटने पाळलेला कुत्रा रायप्पनच्या दिशेने शुक्रवारी भुंकत आला होता. त्यामुळे रायप्पनने आपल्या नातवाला काठी आणण्यास सांगितले. त्यानंतर रायप्पनने त्या कुत्र्याला गो डॉग गो असे म्हटले. त्यावरुन डॅनियलला मोठा राग आला. आम्ही आमच्या कुत्र्याचे चांगले भरण पोषण करतो. मात्र तू त्याला कुत्रा का म्हणाला, यावरुन डॅनियलने रायप्पनशी वाद सुरू केला.
कुत्र्याला कुत्रा का म्हटले : घराबाहेर फिरताना रायप्पनने डॅनियलच्या कुत्र्याला कुत्रा म्हटल्यावरुन डॅनियलने रायप्पनशी वाद सुरू केला. यावेळी डॅनियलचा भाऊ व्हिन्सेंट हा देखील या वादात सहभागी झाला. त्यांनी रायप्पनला मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी डॅनियलने आणलेला चाकू रायप्पनच्या छातीत चाकूने भोसकले. त्यामुळे रायप्पन जागीच खाली कोसळला. त्यानंतर काही वेळात त्याचा घटनास्थळावरच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दोन भावांसह त्यांच्या आईवरही खुनाचा गुन्हा : डॅनियल आणि त्याचा भाऊ व्हिन्सेंटने रायप्पन मारहाण केली, त्यामुळे रायप्पनचा जादीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी डॅनियल आणि त्याचा भाऊ व्हिन्सेंटवर कुनाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. यावेळी पोलिसांनी डॅनियलची आई सावपीमल हिलाही अटक केले आहे. कुत्र्याला कुत्रा का म्हटले यावरुन झालेल्या वादात खून झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - Uddhav Thackeray Remain Party Chief : उद्धव ठाकरेच राहणार पक्षप्रमुख! जाणून घ्या कारण
हेही वाचा - Mumbai Municipal Elections : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने ठोकले दंड, मिशन 150 ची घोषणा