नवी दिल्ली - डॉ. कुमार विश्वास हे हिंदी कवी म्हणून देशात प्रसिद्ध आहे. त्यांनी कधी प्रेमावरील कविता तर कधी अण्णा हजारे यांच्या धरणे आंदोलनात कविता करून लोकांची मने जिंकलेली आहेत. राजकारणात त्यांना फारसे यश मिळाले नाही. मात्र, त्यांनी कोरोना महामारीत त्यांनी कोविड केअर किट, प्लाझ्मा अॅप यांच्या मदतीने लोकांना मदत केली आहे. ज्या लोकापर्यंत दिल्ली सरकार व प्रशासन पोहोचू शकले नाही, त्यांनाही विश्वास यांनी मदत केली. त्यांची खास मुलाखत ईटीव्ही भारतचे दिल्ली स्टेट हेड विशाल सुर्यकांत यांनी घेतली आहे.
१. सत्ता, संघटना, कार्यकर्ते नाहीत, तरीही तुम्ही कोरोनाच्या काळात लोकांना कशी मदत करत आहात? सत्तेत असलेल्या लोकांची नाराजी ओढवण्याची भीती नाही का?
कुमार विश्वास : एकट्याने पराक्रम करणे हा जीवनाचा नेहमीच हिस्सा राहिला आहे. उत्तराखंडमधील संकट असो की भ्रष्टाचार विरोधी आंदोलन अन्यथा महिलांना न्याय मिळवून देणे.. एक कवी म्हणून समाजासाठी जबाबदारी म्हणून काहीना काहीना मदत केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण व्यवस्था ढासळल्याचे आपण पाहत आहोत. तंत्राने आपल्याला खूप निराश केले आहे. ५ लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या आश्वासनाने यावेळेस लोकांना ऑक्सिजन मिळाला नाही. केंद्र सरकारच नव्हे तर सर्वच राज्यांनी कोरोना काळात जनतेला निराश केले आहे. अशा स्थितीत मी मित्रांसमवेत लोकांना मदत करण्याचा निश्चय केला. आमच्या क्षमतेनुसार लोकांना मदत केली आहे. सत्तेशी निगडीत असलेले लोकांचे नातेवाईक कोरोनाच्या काळात मदत करावी, असे विचारत नाहीत.
हेही वाचा-इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री डॉ. केके अग्रवाल यांचं कोरोनाने निधन
2. तुम्ही कोविड केअर किट, प्लाझ्मा डोनर अॅप तयार करण्याविषयी म्हटले होते, ही कल्पना कुठून आली?
कुमार विश्वास : लोक एकमेकांशी संपर्क करून रुग्णालय, बेड आणि ऑक्सिजनची सोय करत होतो. मात्र, प्लाझ्मा मिळविण्यात जनतेला खूप त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यावेळी मी व्हिडिओमधून लोकांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले. शेकडो लोकांशी वैयक्तिक बोलल्यानंतर लक्षात आले की, नेटवर्कशिवाय लोकांना मदत मिळू शकत नाही. गावांमधील परिस्थिती पाहिल्यानंतर संरपंचाशी बोलून गावांमध्ये कोविड केअर सुरू केले. प्रत्येक सेंटरला कोविड किट पाठविण्यात आले. गावातील सरपंचावर स्वयंसेवी लोकांची १० जणांची टीम बनवून जनजागृती करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. प्रत्येक सेंटरवर ४ डॉक्टरांची टीम पाठविण्यात आली. व्हॉट्सअॅप कॉलच्या माध्यमातून लोकांशी संपर्क करण्यात आला. या प्रयत्नामधून ५० गावापर्यंत पोहोचलो आहोत. यापुढे १०० गावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत.
३. आश्चर्यजनक बाब आहे, गौतम गंभीर, दिलीप पांडे, बी. व्ही. श्रीनिवास यांची चौकशी करण्यात आली आहे. मात्र, तुमची आजपर्यंत चौकशी करण्यात आलेली नाही.
कुमार विश्वास : हे पहा, चौकशी होणे, ही नवीन गोष्ट नाही. पूर्वीच्या सरकारनेही अशी कामे करणाऱ्यांची चौकशी केली आहे. मी तर स्वत:ला नशीबवान समजतो की हिंदी मातेने मला जे यश आणि सामर्थ्य दिले आहे, त्यामुळे मला स्वत:ची चिंता करण्याची गरज नाही. आम्ही चांगले काम करत आहोत, गावोगावी जात आहोत. त्यामुळे अशा परिस्थितीत चौकशी आणि तपासाची आम्हाला भीती वाटत नाही.
हेही वाचा-'खतांच्या दरवाढीचा निर्णय मागे घ्या', शरद पवारांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र