ETV Bharat / bharat

Aligarh Crime : यमुना एक्सप्रेस वेवर यूट्यूबर अगस्त्य चौहानचा मृत्यू, बाईक रायडिंग स्पर्धेतून खून झाल्याचा कुटुंबाचा आरोप - बाईक स्पीडचा रेकॉर्ड

सुप्रसिद्ध यूट्यूबर अगस्त्य चौहानचा यमुना एक्सप्रेस वेवर अपघातात मृत्यू झाला. मात्र त्याच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. त्याप्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Aligarh Crime
यूट्यूबर अगस्त्य चौहान
author img

By

Published : May 5, 2023, 9:05 AM IST

यमुना एक्सप्रेस वेवर यूट्यूबर अगस्त्य चौहानचा मृत्यू

अलीगढ : यमुना एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वार यूट्यूबर अगस्त्य चौहानचा 3 मे रोजी अपघातात मृत्यू झाला होता. मात्र हा अपघातातील मृत्यू नसून बाईक रायडिंग स्पर्धेतून खून असल्याचा आरोप अगस्तच्या नातेवाईकांनी केला आहे. कुटुंबीयांच्या आरोपाची गांभीर्याने दखल घेत ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षकांनी गुरुवारी रात्री घटनास्थळ गाठून अपघाताचा आढावा घेतला. पोलिसांनी आजूबाजूला लावलेले सीसीटीव्ही कॅमेरेही तपासले. त्याचवेळी फॉरेन्सिक तपासणी आणि अगस्त्यसोबत उपस्थित असलेल्या चार रायडर्सना चौकशीसाठी बोलावण्यात आले. अगस्त्यच्या हत्येचा संशय व्यक्त करत पोलिसांनी कुटुंबीयांकडून तक्रार मागवली आहे.

तीनशे किमी प्रतितास वेगाने चालवली दुचाकी : अगस्त्यचे वडील जितेंद्र सिंह चौहान यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. दिल्लीहून अगस्त्य त्याच्या चार दुचाकीस्वारांसह यमुना एक्सप्रेसवेकडे निघाले होते. 300 किमी प्रतितास वेगाने दुचाकी चालवण्याची स्पर्धा त्यांच्यामध्ये होती. त्यांच्या हेल्मेटवर व्हिडिओ बनवणारे कॅमेरेही लावण्यात आले होते. मात्र, घटनेपासून कॅमेरे गायब आहेत. अगस्त्यसह 3 स्वार जेवर टोलवरून यू टर्न घेऊन परतले होते. तर अपघातस्थळापर्यंत एक साथीदार त्याच्यासोबत होता. तो यू टर्न घेऊन घटनास्थळावरून निघून गेला. पण, त्यांनी अगस्त्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला नसल्याचा आरोपही त्याच्या वडिलांनी केला आहे.

बाईक स्पीडचा रेकॉर्ड मोडल्याच्या वादातून हत्या : बाईक स्पीडचा रेकॉर्ड मोडल्याच्या वादातून अगस्त्याची हत्या झाल्याचा आरोप त्याचे वडील जितेंद्र यांनी केला आहे. अगस्त्यच्या वडिलांनी त्याच्यासोबत रेसिंग करणाऱ्या रायडर्सनी घटनेच्या 3 तासांनंतर त्याच्याशी संपर्क साधला. त्याचवेळी त्याने सांगितलेल्या लोकेशनवर गेल्यावर अगस्त्य तिथे सापडला नाही. त्याचे स्थान पुन्हा पुन्हा बदलू लागले. घटनास्थळी गाडीचे चाक ओढल्याच्या खुणाही आहेत. दुचाकी 300 च्या वेगाने चालवल्याने अपघातात अगस्त्यचा मृत्यू झाला, तर त्याच्या डोक्याला दुखापत कशी झाली असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. दुचाकीचे किरकोळ नुकसान झाले असून या वेगाने दुचाकी चालवली तर अपघात झाल्यास शरीराच्या इतर भागांनाही दुखापत होऊन दुचाकीचे तुकडे होत असल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे.

अगस्त्यच्या मित्रांना बोलावले चौकशीसाठी : याप्रकरणी ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक पलाश बन्सल यांनी अगस्त्यच्या कुटुंबीयांनी हत्येची शक्यता व्यक्त केली आहे. असे काही प्रश्नही आहेत, ज्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर कुटुंबाच्या वतीने चौकशीची मागणी करण्यात आली आहे. त्या आधारे गुन्हा दाखल करून या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. अगस्त्यसोबत असलेल्या इतर चार दुचाकीस्वारांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. त्याचवेळी परिक्षेत्र अधिकारी आर के सिसोदिया यांनी अगस्त्यच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून कुटुंबीयांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला आहे. पोलिसांचे पथक या घटनेच्या तपास करत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचा चॅम्पियन : अगस्त्य हा डेहराडूनमधील चक्रता रोड कॅप्री ट्रेड सेंटरचा रहिवासी होता. अगस्त्य प्रो रायडर 1000 नावाचे यूट्यूब चॅनल चालवायचा. त्याच्या चॅनलचे लाखो सबस्क्राइबर्स होते. यासोबतच तो २०२२-२३ मध्ये हैदराबाद येथे झालेल्या पंजाब कुस्ती राष्ट्रीय स्पर्धेचा चॅम्पियन होता. बुधवारी 3 मे रोजी टप्पल परिसरात 16 लाखांची स्पोर्ट्स बाईक चालवताना अपघातात त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा - Manipur violence : मणिपूरमध्ये आदिवासी व मेईतेई समाजात दंगल, सरकारकडून शूट अ‍ॅट साईटचे आदेश जारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.