ETV Bharat / bharat

तोतया आयएएस अधिकाऱ्याकडून बोगस लसीकरणाचे रॅकेट; खासदाराची फसवणूक झाल्यानंतर भांडाफोड - मिमी चक्रवर्ती

आरोपी देवानजन देव याने कोलकाता मनपाचा संयुक्त असल्याचा बनाव केला होता. त्याच्या बनावाला फसून खासदार अभिनेत्री मिमी चक्रवर्ती यांनीही त्याने आयोजित केलेल्या कसबा येथे लस शिबारीत लस घेतली. पण, पुढे काय घडले, सविस्तर वाचा...

mimi chakraborty
मिमी चक्रवर्ती
author img

By

Published : Jun 23, 2021, 8:12 PM IST

कोलकाता - मुंबईमध्ये कोरोनाच्या बोगस लसीकरणाचे रॅकेट उघडकीला आल्यानंतर कोलकात्यामध्येही बोगस लशीचे रॅकेट उघडकीला आले आहे. बोगस आयएएस अधिकाऱ्याकडून हे रॅकेट चालविण्यात आले. या बोगस रॅकेटच्या माध्यमातून थेट तृणमूलच्या खासदार मिमी चक्रवर्ती यांची फसवणूक झाली. त्यानंतर या बोगस लसीकरणाच्या रॅकेटचा भांडाफोड झाला आहे.

आरोपी देवानजन देव याने कोलकाता मनपाचा संयुक्त असल्याचा बनाव केला होता. त्याच्या बनावाला फसून खासदार अभिनेत्री मिमी चक्रवर्ती यांनीही त्याने आयोजित केलेल्या कसबा येथे लस शिबारीत लस घेतली. मात्र, लसीकरणानंतरही त्यांना दुसऱ्या दिवशी प्रमाणपत्र मिळाले नाही. त्यामुळे खासदार चक्रवर्ती यांना संशय आला. चक्रवर्ती यांनी तत्काळ स्थानिक तृणमुल काँग्रेसच्या आमदार आणि मंत्री जावेद अहमद खान यांना माहिती कळविली.

हेही वाचा-धक्कादायक! कोरोनाच्या भीतीने संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या; आई-वडिलांनी मुलांसह संपवलं जीवन

महापालिकेकडून परवानगी नसताना लस कॅम्प-

आमदार जावेद अहमद खान यांनी बोगस लसीकरणाची माहिती कळविल्यानंत पोलिसांनी कोलकाता महापालिकेत चौकशी केली. तेव्हा त्यांना कसबा येथे लसीकरणाचा कॅम्प घेण्याची परवानगी देण्यात आली नसल्याचे कळाले.

हेही वाचा-अदर पूनावाला पुण्यात परतले, मोठ्या नेत्यांकडून धमक्या मिळत असल्याने सोडला होता देश

पोलीसही चक्रावले-

तपास सुरू करताच पोलीसही चक्रावून गेले. पोलिसांनी तोतया आयएएस अधिकारी देवानजन देव याला अटक केली. या आरोपीने कोलकाता महापालिकेत उपआयुक्त असल्याची थाप मारली होती. आपल्याला लसीकरणाला आमंत्रित केल्याने आपण गेलो होतो, असे खासदार चक्रवर्ती यांनी सांगितले. तृतीयपंथी आणि दिव्यांग लोकांसाठी हे लसीकरणाचे शिबीर आयोजित केल्याची माहिती दिली होती. तिथे पोहोचल्यानंतर मी स्वत: लस घेण्याचा निर्णय घेतला. ललस घेतल्यानंतरही लशीचे प्रमाणपत्र आले नाही. त्याबाबत देव यांना मोबाईल विचारले. माझ्या सहकाऱ्यांनीही त्यांना विचारले. त्यावर देव यांनी दोन-तीन दिवसांनी प्रमाणपत्र येईल, असे सांगितले. त्यामुळे माझा संशय वाढला. मी चिंतेत झाले. लोकांना आणि यंत्रणेला सांगितल्यानंतर बोगस लसीकरणाचा पर्दाफाश झाला.

हेही वाचा-अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्‍बाल कासकरला एनसीबीकडून अटक

आरोपीचे वडील माजी निवृत्त अधिकारी-

पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीचे वडील हे निवृत्त सीमा शुल्क अधिकारी आहेत. आरोपी देवला आयएएस अधिकारी होण्याची इच्छा होती. मात्र, त्याला लोकसेवा आयोग्याच्या परीक्षेत यश मिळू शकले नाहीत.

पोलिसांकडून तपास सुरू-

देव याने लस कोठून घेतली, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोलीस उपायुक्त रशीद मुनीर खान म्हणाले, की ही लस खरी आहे की नाही याबाबत तपासणी केल्यानंतरच माहिती कळू शकणार आहे. जर ही लस बनावट आढळली तर लस घेणाऱ्यांना पुन्हा लस मिळू शकणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.