ETV Bharat / bharat

फेसबुककडून तालिबानचे समर्थन करणाऱ्या पोस्ट व अकाउंटवर बंदी

तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. सध्या जगाची नजर अफगाणिस्तानवर खिळली आहे. दरम्यान फेसबुकने म्हटले आहे, की सोशल मीडिया साईटवर तालिबान व त्यांच्या समर्थनार्थ असणारी सर्व सामुग्री प्रतिबंधित केली आहे. कारण फेसबुक तालिबानला दहशतवादी संघटना मानते.

author img

By

Published : Aug 17, 2021, 6:56 PM IST

facebook
facebook

लंडन - सोशल मीडिया कंपनी फेसबुकने म्हटले आहे, की साईटवरून तालिबान व त्यांच्या समर्थनार्थ असणाऱ्या पोस्ट व सामुग्री हटविण्यात आली असून त्यावर बंदी घालण्यात आली आहे. कारण फेसबुक तालिबानला दहशतवादी संघटना मानते.

कंपनीने म्हटले आहे, की तालिबानशी संबंधित सामुग्रीवर लक्ष ठेवण्यासाठी व त्या पोस्ट हटविण्यासाठी त्यांच्याकडे अफगाण विशेषज्ञांची एक टीम आहे. गेल्या अनेक वर्षापासून तालिबान आपले संदेश प्रसारीत करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत आला आहे.

फेसबुकच्या प्रवक्त्यांनी बीबीसीला सांगितले, की तालिबान संघटनेवर अमेरिकी कायद्यांतर्गत बंदी घातलेली दहशतवादी संघटना आहे. त्यामुळे आम्ही या संघटनेवर बंदी लादली आहे. त्यामुळे तालिबान द्वारे किंवा तालिबानच्या समर्थनार्थ निर्माण खाते हटवले जातील व त्यांचे कौतुक, समर्थन व प्रतिनिधित्व करणाऱ्यांवर बंदी लादली जाईल.

प्रवक्त्यांनी सांगितले, की आमच्याकडे अफगानिस्तानमधील विशेषज्ञांची टीम आहे. जी दरी आणि पश्तो भाषा समजते आणि त्यांनी स्थानिक संदर्भ माहिती आहेत. ते फेसबुकवर पोस्ट होणारी माहितीची शहानिशा करण्याबरोबरच आमची मदत करत आहे. कंपनीने म्हटले आहे, की आम्ही आंतरराष्ट्रीय समुहाच्या नियमांचे पालन करतो.

फेसबुकने म्हटले आहे, की हेच धोरण फेसबुकच्या अधिपत्याखालील अन्य माध्यामांमध्ये जसे इंस्टाग्राम आणि व्हाट्सअॅपबाबतही लागू राहील. वृत्त आहे, की तालिबान संवादासाठी व्हॉटसअॅप वापरत आहे. तर व्हॉट्सअॅपवर तालिबानशी संबंधित अकाउंट मिळाले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.