कच्छ (गुजरात) Impact of Attack on a Cargo Ship : एमव्ही केम प्लूटो या व्यापारी मालवाहू जहाजाला नुकतीच हिंदी महासागरात आग लागली होती. इराणच्या ड्रोन हल्ल्यामुळं जहाजाला आग लागल्यानं एकच खळबळ उडाली होती. याआधी भूमध्य समुद्रात दहशतवादी गटांकडून जहाजांवर हल्ले झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशा घटनांमुळं व्यवसायासह इतर कामांनाही धक्का बसू शकतो.
कसा परिणाम होतो : भारतीय जलक्षेत्रात कार्यरत असलेली बंदरं मोठ्या संख्येनं जहाजं हाताळतात. त्यातून दररोज लाखो टन मालाची वाहतूक करण्यात येते. मालवाहू जहाजांवर हल्ले होण्याचं प्रमाण वाढल्यास, बंदरातून होणाऱ्या आयात-निर्यात उपक्रमांवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. तसंच इतर उपक्रमांवरही परिणाम होऊ शकतो. जहाजावरील हल्ल्यांमुळं बंदरातील कामकाजावर परिणाम होऊ शकतो. जहाजांवर झालेल्या हल्ल्यांमुळे बंदरातील मालवाहू जहाजांच्या वाहतुकीवर आणि करोडो रुपयांच्या व्यापारावर परिणाम होऊ शकतो.
आयात-निर्यातीवर परिणाम : मुंद्रा अदानी बंदराचे जनसंपर्क अधिकारी जयदीप शाह यांनी सांगितलं की, सध्या कच्छमधील मुंद्रा येथील अदानी बंदरातील जहाजांवर हल्ले होण्याचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे नियमितपणे काम चालू राहते. दररोज अंदाजे 30 ते 38 जहाजांची आवक-जावक सुरू असते. भविष्यात जहाजांवर हल्ल्यांची संख्या वाढल्यास, देशाच्या आयात-निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. याशिवाय 157 दशलक्ष मेट्रिक टन माल आणि कोट्यावधींच्या व्यापारावरही परिणाम होऊ शकतो.
जहाजावर कसा झाला होता ड्रोन हल्ला? : 19 डिसेंबर रोजी एमव्ही केम प्लूटो हे व्यापारी मालवाहू जहाज सौदी अरेबियातून भारताच्या दिशेनं निघाले होतं. ते 25 डिसेंबरला मंगळुरुला पोहोचणार होतं. र 23 डिसेंबर रोजी भारतीय तटरक्षक दलाच्या मुंबई बचाव पथकाला जहाजाच्या अपघाताची माहिती मिळाली. त्यामुळं भारतीय तटरक्षक दलाच्या पथकाकडून जहाजावर बचावकार्य करण्यात आलं. अमेरिकेच्या दाव्यानुसार एमव्ही प्लूटो व्यापारी मालवाहू जहाजावरील आग ही इराणच्या ड्रोन हल्ल्यामुळे लागली होती. या व्यापारी मालवाहू जहाजात 20 भारतीय आणि 1 व्हिएतनामी कर्मचारी होते. भारतीय तटरक्षक सागरी समन्वय केंद्राने (एमआरसीसी) जहाजाच्या एजंटशी संपर्क साधला. कथित हल्ल्यात मालाचं कोणतंही नुकसान झालं नसल्याची खात्री करण्यात आळी. जहाजावरील आग चालक आणि नौदलाच्या जवानांनी विझवली.
हेही वाचा :