नवी दिल्ली : काल त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. आता 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. मतदानानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. एक्झिट पोलनुसार त्रिपुरामध्ये भाजपचे सरकार पुन्हा येऊ शकते. इंडिया टुडे आणि अॅक्सिस माय इंडियाच्या मते, या राज्यांमध्ये काय परिस्थिती आहे, हे जाणून घ्या.
त्रिपुरामध्ये भाजपची वापसी : त्रिपुरामध्ये भाजपला 36 ते 45 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर डाव्या आघाडीला 6 ते 11 जागा मिळण्याचा अंदाज आहे. येथे काँग्रेस पक्षाची डाव्यांशी युती आहे. टीएमपीला 9 ते 11 जागा मिळू शकतात. टीएमपीचा म्हणजेच टिपरा मोथाला 20 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. टिपरा यांनी निवडणुकीपूर्वी सर्व पक्षांना इशारा दिला होता. टिपरा आणि भाजपमध्ये युतीबाबत बोलणी सुरू होती, मात्र युती होऊ शकली नाही.
मेघालयात कोणालाच बहुमत नाही : मेघालयात 60 जागा आहेत. येथे एनपीपीला 18 ते 24 जागा मिळू शकतात. भाजपला 4 ते 8 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 6 ते 12 जागा मिळू शकतात. तर इतरांना 4 ते 8 जागा मिळू शकतात. नागालँडमध्ये विधानसभेच्या 60 जागा आहेत. येथे एनपीपी आणि भाजप युतीला 38 ते 48 जागा मिळू शकतात. काँग्रेसला 1 ते 2 जागा मिळू शकतात. नागालँडमध्येही भाजपचे आघाडी सरकार बनू शकते. एक्झिट पोल योग्य ठरले तर त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजपचे सरकार बनू शकते. दुसरीकडे, मेघालयात कोणत्याही पक्षाला बहुमत मिळताना दिसत नाही.
झी न्यूज - मॅट्रिक्स : झी न्यूज - मॅट्रिक्सने भाकीत केले आहे की, भाजप - एनडीपीपी (नॅशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी) युती नागालँडमधील 60 जागांपैकी 35 - 43 जागा जिंकेल. त्याचप्रमाणे टाईम्स नाऊने एनडीपीपी साठी 27 - 33 जागा, भाजपला 12 - 16 जागा आणि एनपीएफ साठी 4 - 8 जागांचा अंदाज वर्तवला आहे. कॉनराड संगमा यांच्या एनपीपीला मेघालयात 21 - 26 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. राज्यात तो सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येण्याची शक्यता आहे. तसेच तृणमूलला 8 - 13 आणि भाजपला 6 - 11 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
टाइम्स नाऊ - ईटीजी : टाइम्स नाऊ - ईटीजी एक्झिट पोलनुसार, त्रिपुरामध्ये भाजप आघाडीला 24 जागा मिळतील, डाव्या - काँग्रेस आघाडीला 21 जागा मिळतील आणि टिपराला त्रिपुरामध्ये 14 जागा मिळतील. टाईम्स नाऊ - ईटीजीनुसार, मेघालयमध्ये एनपीपी 18 - 26 जागांसह आघाडीवर आहे, तर तृणमूल आणि युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी (UDP) 8 - 14 जागा जिंकण्याची अपेक्षा आहे. भाजपला 3 - 6 जागा मिळतील. विशेष म्हणजे टाइम्स नाऊ - ईटीजी रिसर्चने त्रिशंकू असेंब्लीची भविष्यवाणी केली आहे.
इंडिया न्यूज - जन की बात : इंडिया न्यूज - जन की बातच्या अंदाजानुसार, त्रिपुरामध्ये भाजपला 29 - 40 जागा मिळतील, तर काँग्रेस - डाव्या आघाडीला 9 - 16 जागा मिळू शकतात. टीएमपीला 10 - 14 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारीला मतदान झाले होते, तर काल मेघालय आणि नागालँडमध्ये निवडणुका झाल्या. मेघालयमध्ये, राज्यातील 59 विधानसभा मतदारसंघातील 3,419 मतदान केंद्रांवर मतदान झाले, तर नागालँडमध्ये 60 पैकी 59 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान झाले.
हेही वाचा : Manish Sisodia to CBI Remand : मनीष सिसोदियांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी; दिल्लीतील राजकीय वातावरण तापले