अमरावती ( आंध्र प्रदेश ) - काही लोक सहज पैसे मिळवण्याच्या आशेने अवैध उत्खनन आणि खनिज संपत्तीची तस्करी ( smuggling of mineral resources ) करून जंगले नष्ट करत आहेत. तर काही लोक गुप्त खजिन्याच्या आशेने प्राचीन वास्तू नष्ट करत आहेत. नुकतीच, आंध्र प्रदेशातील एनटीआर जिल्ह्यातील 1880 मधील बांधलेल्या वास्तू गुप्त खजिन्यासाठी पाडल्याची ( Iron Core Mills destroyed ) धक्कादायक माहिती समोर आली आहे.
एनटीआर जिल्ह्यातील कोंडापल्ली अभयारण्यात अवैध उत्खनन ( Excavations In Kondapalli Reserve Forest ) सुरू आहे. गुप्त खजिन्यासाठी उत्खनन केले जात असल्याचा वन अधिकाऱ्यांना संशय आहे. अधिकार्यांनी बेनी आयर्न कोअर मिल्सजवळील खाडीवर 7 किमी काही लोकांनी उत्खनन ( excavations for gold in forest ) केले आहे. 1880 मध्ये ब्रिटीश राजवटीत बांधलेल्या आयर्न कोअर मिल्सची काही लोकांनी तोडफोड केली आहे.
उत्खननात 10 जणांची टोळी आली असावी- काही गुंडांनी सुमारे 50 फूट खोल खड्डा खोदला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना एक प्राचीन विहीरही खोदलेली आढळली. या परिसरात सोन्याचा आणि हिऱ्यांचा मोठा खजिना असल्याची अफवा आहे. त्यामुळे गुप्तखजिना मिळण्याच्या आशेने बिनदिक्कतपणे उत्खनन करण्यात आले. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच गुंड पळून गेले. अधिकाऱ्यांना जंगलात काठ्यांनी बनवलेली शिडी सापडली. वनाधिकाऱ्यांनी शिडी नष्ट केली आहे. उत्खननात 10 जणांची टोळी आली असावी, असा वनाधिकाऱ्यांचा अंदाज आहे. उत्खनन करणाऱ्यांना पकडण्यासाठी कारवाई करणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा-OMICRON BA4 : ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटचा भारतात प्रवेश.. 'या' ठिकाणी आढळला पहिला रुग्ण
हेही वाचा-भारत पाकिस्तान फाळणीत वेगळे झालेल्या बहिण-भावांची 75 वर्षानंतर भेट