नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई)ने दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. यानुसार, १३ ते १६ मे दरम्यान कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. रमजान ईदमुळे हा बदल करण्यात आल्याची माहिती सीबीएसईने दिली. चार मे पासून बोर्डाची परीक्षा सुरू होणार आहे.
बारावीच्या वेळापत्रकात हा बदल..
जुन्या वेळापत्रकामध्ये १२वीचा फिजिक्स (भौतिकशास्त्र) विषयाचा पेपर १३ मे रोजी होणार होता. मात्र, नव्या वेळापत्रकानुसार आता तो ८ जूनला होणार आहे. तर १ जूनला होणारा गणिताचा पेपर आता ३१ मे रोजी होणार आहे. तसेच, ३ जूनला होणारा वेब अॅप्लिकेशनचा पेपर २ जूनला, तर २ जूनला होणारा भुगोलाचा पेपर आता ३ जूनला होणार आहे.
दहावीच्या वेळापत्रकात झाला हा बदल..
जुन्या वेळापत्रकानुसार २१ मे रोजी होणारा गणिताचा पेपर आता २ जूनला होणार आहे. तर १३ मे रोजी होणारा फ्रेंच भाषेचा पेपर आता १२ मे रोजी होणार आहे. यासोबतच, १५ मे रोजी होणारा विज्ञानाचा पेपर आता २१ मे रोजी होणार आहे. तर, संस्कृत विषयाचा पेपर २ जूनऐवजी आता ३ जूनला होणार आहे.
हेही वाचा : 'महाराष्ट्रातील जमीनीचा वाद मिटला नाही; तर बुलेट ट्रेनच्या गुजरातमधील भागाचे काम अगोदर सुरू करणार'