नवी दिल्ली - पति-पत्नीच्या नात्याला आणखीन दृढ करण्यासाठी ज्याप्रमाणे वटपौर्णिमेचे महत्त्व असते, त्याचप्रमाणे उत्तर भारत आणि भारतातील इतर काही भागांमध्ये करवा चौथ साजरा केला जातो. कार्तिक महिन्याच्या कृष्णपक्षातील चतुर्थीचा दिवस महिलांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. या दिवशी संपूर्ण दिवस निर्जळी उपवास करुन रात्री चंद्रदर्शन केल्यानंतर हा उपवास सोडला जातो.
ज्योतिषाचार्य अनिश व्यास सांगतात, की यंदाचा करवा चौथ हा दिवस 24 ऑक्टोंबर रोजी आला आहे. करवा चौथची पूजा रोहणी नक्षत्रामध्ये होत असून हा योग तब्बल पाच वर्षांनंतर आला आहे. तसेच आज रविवार असल्याचे सुर्यदेवाची ही कृपा यावर आहे. करवा चौथ व्रतामध्ये चंद्राची पूजा केली जाते. असे मानले जाते की या व्रतामध्ये चंद्राची पूजा केल्यास विवाहित जीवन सुखी होते आणि पतीचे आयुष्य दीर्घ होते. त्यामुळे विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात.
यावर्षी म्हणजेच 2021 मध्ये करवा चौथ व्रताच्या दिवशी एक शुभ आणि विशेष योगायोग तयार होत आहे. करवा चौथला चंद्र रोहिणी नक्षत्रात उगवेल. हे नक्षत्र धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत शुभ मानले जाते. चंद्र या नक्षत्राचा स्वामी असून चंद्राच्या दर्शनाने मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. चंद्रदर्शन इच्छित परिणाम देते. यावेळी करवा चौथवर चंद्र रात्री 8.7 वाजता बाहेर येईल. अशा स्थितीत उपवास करणाऱ्या महिलांना यावेळी चंद्रदर्शन होऊ शकते. त्याचबरोबर स्त्रिया चंद्राच्या दर्शनानंतरच उपवास सोडतील.
करवा चौथच्या दिवशी उपवास करणाऱ्या स्त्रियांनी लाल रंगाचे कपडे घातले तर त्यांना त्यांच्या पतीचे आयुष्यभर प्रेम मिळते, असे म्हटलं जातं. लाल रंग हा उबदारपणाचे आणि प्रेमाचे प्रतीक आहे. लाल रंगात महिला अधिक सुंदर आणि आकर्षक दिसतात. आज निळे, तपकिरी आणि काळे कपडे घालू नका, कारण ते अशुभतेचे प्रतीक आहे.
करवा चौथ शुभ मुहूर्त -
- करवा चौथ व्रत 24 ऑक्टोबर 2021
- चतुर्थी तिथी सुरू - 24 ऑक्टोबर 2021 सकाळी 03:01 वाजता
- चतुर्थी तिथी समाप्ती - 25 ऑक्टोबर 2021 रोजी 05:43 वाजता
- करवा चौथ व्रत पूजा शुभ मुहूर्त 24 ऑक्टोबर रोजी सध्याकाळी 05:43 मिनट ते 06:59 पर्यंत