ETV Bharat / bharat

आज नागपंचमी, वाचा टॉप न्यूज.. - सोलापूर संचारबंदी

काल आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल. ईटीवी भारत विशेष बातम्या व एक्सप्लेनरविषयी जाणून घ्या..

etv bharat top news
etv bharat top news
author img

By

Published : Aug 13, 2021, 6:22 AM IST

  • आज या घडामोडींवर असणार नजर

आज नागपंचमी आहे. या दिवशी नागदेवतेची पुजा केली जाते.

सोलापूर - जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दहा दिवसाची संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीला व्यापारी वर्गातून तीव्र विरोध होत आहे. दरम्यान, सोलापूर येथे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व व्यापाऱ्यांची बैठक झाली आहे. मात्र, या बैठकीमध्ये कोणताही तोडगा न निघाल्यामुळे बैठक निष्फळ ठरली. नागपंचमीच्या मुहूर्तावर पंढरपूरमध्ये संचारबंदीवरून प्रशासन व व्यापाऱ्यांमध्ये आज संघर्ष होण्याची शक्यता आहे.

मुंबई - कोरोना विषाणू प्रतिबंध लसीकरण मोहिमेंतर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर आज 13 ऑगस्ट 2021 असे दोन दिवस लसीकरण बंद राहणार, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

नागपूर - नागपूर पोलीस दलात कार्यरत महिला उपनिरीक्षक मंगला हरडे 'कोण होणार करोडपती'च्या हॉट सीटवर पोहचल्या आहेत. त्या नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागात कार्यरत आहेत. आज १३ ऑगस्ट रोजी त्या करोडपतीचा खेळ खेळणार आहेत.

शिर्डी (अहमदनगर) - श्री साईबाबा संस्थान, नाट्य रसिक मंच आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. साईसच्चरित पारायण सोहळा आरंभ झाला. कोविडच्या पार्श्वभूमीवर हे पारायण आभासी पद्धतीने होत आहे. ९ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट याकालावधीत हा पारायण सोहळा होत आहे. त्यानुसार आजही सोहळा होणार आहे.

  • कालच्या महत्वाच्या बातम्या

परभणी - 'कोरोना' रुग्णांची संख्या कमी झालेल्या जिल्ह्यांमध्ये महाविद्यालये सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज परभणीत सांगितले. या संदर्भात त्यांनी परभणी जिल्हा प्रशासनाला जिल्ह्यातील 'कोरोना' परिस्थितीचा अहवाल पाठविण्यास सांगितला आहे. तर, राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकसारखी परिस्थिती नसल्याने त्या त्या जिल्ह्याचा आढावा घेऊनच त्या ठिकाणी पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा कमी क्षमतेने महाविद्यालये सुरू करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. सविस्तर वाचा..

ठाणे - माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या डोकेदुखीत आणखी वाढ झाली आहे. त्यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. सविस्तर वाचा..

मुंबई - मुंबईत कोरोना विषाणूचा प्रसार कमी होत असतानाच डेल्टा प्लस व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या ११ वर गेली आहे. मुंबईत आढळून आलेल्या डेल्टा प्लस रुग्णांपैकी एका ६३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तिच्या मृत्यूनंतर जिनोमिक सिक्वेन्सिंग चाचण्याचे अहवाल आले असून त्यात तिला डेल्टा प्लसची लागण झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, या महिलेला लसीचे दोन डोस देण्यात आले होते. डेल्टा प्लसचा हा मुंबईतील पहिला मृत्यू आहे. सविस्तर वाचा..

अहमदनगर - ट्विटर हे आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले समाजमाध्यम आहे. सत्तेच्या दबावाला बळी पडून ट्विटरने आपल्या भूमिका ठरवू नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून आम्हाला जे विचार स्वातंत्र्य दिले आहे त्याची ही मुस्कटदाबी आहे, असे म्हणत ट्विटरच्या कारवाईचा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निषेध केला. त्याचबरोबर, लोकशाहीच्या हितासाठी आवाज उठवत राहू, लढू आणि संघर्ष करू, असे देखील ते म्हणाले. सविस्तर वाचा..

मुंबई - शहरी भागातील आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीच्या शाळा 17 ऑगस्टपर्यंत सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिल्यामुळे शालेय शिक्षण विभागाचा गोंधळ उडालेला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले, की विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षेला आम्ही प्राधान्य दिले आहे. शाळा सुरू करण्याबाबत सरकारमध्ये कुठलाही मतभेद नाही. शिक्षण सचिवांनी आमचा सूचना अहवाल टास्क फोर्सकडे पाठवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्स आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. सविस्तर वाचा..

नवी दिल्ली - राज्यसभेच्या गोंधळानंतर केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये वादविवाद सुरू झाले आहेत. राज्यसभेच्या गोंधळाबाबत पुरुष मार्शलने सुरक्षा सेवेच्या संचालकांना लिहिलेल्या पत्रात खासदार इलामरन करीम, अनिल देसाई आणि इतरांची नावे लिहिली आहेत. सविस्तर वाचा..

  • जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -

'या' राशीवाल्यांना आज पत्नीकडून चांगल्या बातम्या मिळतील. वाचा...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.