ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदी करतील काशी विश्वनाथ कॉरिडोरचे उद्घाटन... वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

वाचा काल आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Dec 13, 2021, 6:55 AM IST

  • आज 'या' घडामोडींवर असणार नजर -
  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. ते काशी विश्वनाथ कॉरिडोरचे उद्घाटन करणार आहेत.
  2. सकाळी 9:30 वाजता मांजराई देवी मंदिर, माजराई येथे दिव्य काशी भव्य काशी हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व माजी आमदार योगेश टिळेकर उपस्थित राहणार आहे.
  3. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 119 वा पदवी प्रदान समारंभ होणार आहे. हा समारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत होणार आहे.
  4. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नाशिक येथे दौरा असून सकाळी 9 वाजता मनसे जनहित कार्यालयाचे उदघाटन करणार आहेत.
  5. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सायंकाळी येणार औरंगाबाद शहरात येणार असून उद्या (दि. 14) पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.
  6. अनिल देशमुख यांची आज न्यायालयीन कोठडी संपणार असून न्यायालयीन सुनावणी होणार आहे. बेल की जेल यावर आज फैसला होणार आहे.

कालच्या महत्वाच्या बातम्या -

  1. पणजी - रविवारी (दि. 12) सायंकाळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamta Banerjee In Goa) गोव्यात दाखल झाल्या असून गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Goa International Airport) त्यांचे स्वागत करण्यता आले. पुढचे दोन दिवस ममता बॅनर्जी या गोव्यात असून उद्या तृणमुल काँग्रेस (TMC) गोवा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची (TMC Candidate List For Goa Assembly Election) यादी घोषित करण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा ...
  2. मुंबई - दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्डचे वाटप तसेच घरगुती महिलांची कामगार विभागात नोंदणी करण्यात आली आहे. या कार्यक्रमात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकरही उपस्थित होते. सविस्तर वाचा ...
  3. मुंबई - जगभरात ओमायक्रॉनचे रुग्ण ( Omicron Cases ) आढळून येत आहेत. राज्यात डोंबिवली, मुंबई, पुणे आणि पिंपरी - चिंचवड येथे आतापर्यंत ओमायक्रॉनचे १७ रुग्ण आढळून आले आहेत. आज नागपूर येथे एक रुग्ण ओमायक्रॉन पॉजिटिव्ह आढळून आल्याने राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा १८ वर गेला आहे. सविस्तर वाचा ...
  4. जयपूर - मेहंगाई हटाओ रॅलीमध्ये प्रियंका गांधी यांनी (Priyanka Gandhi in Mehangai Hatao Rally) जनतेला संबोधित केले. "ठाणे सबने महारो राम राम" अशा राजस्थानी भाषेत त्यांनी भाषण सुरू केले. यासोबतच प्रियांका गांधी यांनी गेहलोत सरकारचे जोरदार कौतुक केले. 'गेहलोत सरकारने कोरोनाच्या काळात सर्वांना मदत केली. या वीरांच्या भूमीवर काँग्रेसचे सरकार आहे याचा मला अभिमान आहे,' असेही प्रियंका गांधी म्हणाल्या. सविस्तर वाचा ...
  5. मुंबई - काँग्रेस आघाडी सरकारने २०१४ साली मुस्लीम समाजाला (Muslim Reservation) महाराष्ट्रात ५ टक्के आरक्षण दिले होते. या निर्णयास मुंबई हाय कोर्टानेही (Bombay High Court) मान्यता दिली होती. परंतु, त्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपाच्या देवेंद्र फडणवीस सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही. मुस्लीम आरक्षणासाठी काँग्रेस पक्ष संघर्ष करताना एमआयएमचे दोन आमदार विधानसभेत होते. परंतु पाच वर्षे हे आमदार मुस्लीम आरक्षणावर गप्प का बसले ? फडणवीस सरकारला कधीही जाब का विचारला नाही? असा घणाघाती आरोप माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आरीफ मोहम्मद नसीम खान यांनी केला आहे. सविस्तर वाचा ...
  6. नागपूर- राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरमध्ये ओमायक्रॉनच्या पहिल्या रुग्णाची नोंद (First Patient Of Omicron Found In Nagpur) झाली आहे. या वृत्ताला नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी (Municipal Commissioner Radhakrishnan B)यांनी दुजोरा दिला आहे. रुग्णाची जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी (Genome Sequencing Test) पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना उपचारासाठी एम्स रुग्णालयात (AIIMS Hospital Nagpur) दाखल करण्यात आले आहे. सविस्तर वाचा ...
  7. पुणे - आरोग्य विभागाच्या परीक्षांचा गोंधळ आणि त्यानंतर पेपर फुटी पराक्रम आणि त्यानंतर पेपर फोडणाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर आता पुणे सायबर पोलिसांनी आज (रविवारी) होणाऱ्या म्हाडाच्या परीक्षेचा पेपर ( MHADA Paper Leak Case ) फोडणाऱ्या सहा जणांना अटक ( Six People Arrested ) केली आहे. त्यामुळे या आठवड्यात होणाऱ्या म्हाडाच्या सर्व परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या सर्व आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता ( Police Commissioner Amitabh Gupta ) यांनी दिली आहे. सविस्तर वाचा ...
  8. बुलडाणा - सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील मकाई साखर कारखाना ( Makai Sakhar Karkhana Case ) येथे काही कार्यकर्ते व शेतकरी ( Swabhimani Shetkari Sanghatana ) एफआरपीचे पैसे मागण्यासाठी गेले होते. दरम्यान साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल ( Chairman Digvijay Bagal ) यांनी मारहाण करत त्यांना बाहेर काढून दिले. यावर रविकांत तुपकर चांगलेच भडकले व उद्या आपण सोलापूरला जाणार आहोत. त्या मस्ती चढलेल्या दिग्विजय बागलची जिरवायला जात आहोत. शेतकऱ्यावर हात उचलणाऱ्याचे हात कलम करू, असा इशारा यावेळी रविकांत तुपकारानी ( Ravikant Tupkar ) दिला. तसेच त्या साखर कारखान्याला गाळप करण्याचा परवाना नाही तरी बेकायदेशीर गाळप सुरू आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांचे एफआरपीचे साडेसहा कोटी रुपये बुडविले, असे कारनामे कोणाच्या भरवशावर करत आहात? असा सवालही तुपकरांनी केला आहे. सविस्तर वाचा ...
  9. माथेरान (रायगड) - रविवारी सकाळी माथेरानमधील इंदिरानगर येथे एका घरामध्ये चालवल्या जाणाऱ्या लॉजिंगमध्ये महिलेचा शिर कापलेला मृतदेह आढळून आला. निर्वस्त्र असलेल्या या मृतदेहासोबत कोणतीही वस्तू, तसेच बॅग, ओळखपत्र नव्हते. त्यामुळे, या प्रकरणाची गुंतागुत वाढली असून माथेरानमध्ये औरंगाबादच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. सविस्तर वाचा ...
  • जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -
  1. 13 डिसेंबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आज मानसिक सुख मिळेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
  2. VIDEO : 13 डिसेंबर राशीभविष्य - कसा असेल तुमचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.