ETV Bharat / bharat

आज शरद पवार अन् युवराज सिंह यांचा वाढदिवस... वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर - शरद पवार वाढदिवस

वाचा काल आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Dec 12, 2021, 6:42 AM IST

  • आज 'या' घडामोडींवर असणार नजर -
  1. केंद्रीय मंत्री भारती पवार या एक दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत.
  2. शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. शनिवारी शरद पवार यांच्या भाषणांवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे.
  3. क्रिकेटर युवराज सिंहचा आज 39 वा वाढदिवस आहे.
  4. अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांची आज जयंती आहे.
  • कालच्या महत्वाच्या बातम्या -
  1. हरिद्वार - सीडीएस बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. या अपघातामागे काही काही षडयंत्र आहे, असे मत योगगुरू बाबा रामदेव यांनी व्यक्त केले आहे. ( Baba Ramdev On CDS Bipin Rawat Death ) बाबा रामदेव यांनी आज पतंजली योगपीठात कन्या गुरुकुलमच्या भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सविस्तर वाचा...
  2. मुंबई - आम्ही आलो तर जमावबंदी, राहुल गांधी आले तर 144 लावाल का? असा सवाल एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) विचारला आहे. एमआयएमने (MIM) औरंगाबाद ते मुंबई तिरंगा रॅली (Aurangabad to Mumbai Tiranga Rally) आज काढली होती. त्यानंतर झालेल्या सभेत ओवैसी बोलत होते. 'थ्री इन वन' सरकार मुस्लिम आरक्षण (Muslim Reservation) विसरले आहे. शिवसेना राष्ट्रवाद विसरली का? असा प्रश्न असदुद्दीन ओवैसी यांनी विचारला आहे. तसेच महाराष्ट्रातील 83 टक्के मुसलमान नागरिकांकडे जमिनी नाहीत, असे ओवैसी म्हणाले. सविस्तर व्हिडिओ पाहा ...
  3. मुंबई - एमआयएम ( AIMIM ) पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी ( Asaduddin Owaisi ) यांनी राज्यातील मुस्लिमांना आरक्षण मिळावे या मागणीसाठी चांदिवली येथे तिरंगा रॅली काढत सभेचे आयोजन केले होते. मुंबईत कलम 144 लागू करण्यात आले आहे. यवरुन ओवैसी यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. काँग्रेसचे राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांच्या मुंबई दौऱ्यावेळीही हे ठाकरे सरकार कलम 144 लावणार का, असा सवाल उपस्थित केला. पुढे म्हणाले, राहुल गांधी येतील तेव्हा ओमायक्रॉनची ( Omicron ) चर्चा होणार नाही. केवळ सत्तेची चर्चा होईल. आमच्या रॅलीवेळी मात्र ओमायक्रॉनची चर्चा होते व कलम 144 लागू होते, अशी टीका ओवेसी यांनी केली. सविस्तर वाचा ...
  4. मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 1988 ते 1996 दरम्यान त्यांनी केलेल्या भाषणांपैकी निवडक 61 भाषणांचे 'नेमकचि बोलणें' हे पुस्तक शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ( Sharad Pawar birthday ) प्रकाशित करण्यात ( Sharad Pawar Speech Book Published ) आले. लेखक सुधीर भोंगळे यांनी शरद पवार यांच्या सर्व भाषणात आपल्याकडे संग्रहित करून ठेवली आहेत. त्या भाषणांपैकी 61 भाषणांचा पहिला खंड प्रकाशित करण्यात आला आहे. साहित्यिक रंगनाथ पठारे आणि खासदार संजय राऊत यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. सविस्तर वाचा ...
  5. हैदराबाद : १२ डिसेंबरच्या संध्याकाळी आकाशात एक दुर्मिळ खगोलीय घटना पाहायला मिळणार आहे. सूर्यमालेतील सहा ग्रह लोकांना एका सरळ रेषेत पाहता येणार आहेत. चांगली गोष्ट म्हणजे सूर्यास्तानंतर लोक ते स्वतःच्या डोळ्यांनी किंवा छोट्या दुर्बिणीनेही पाहू शकतील. यासाठी मोठ्या दुर्बिणीची गरज भासणार नाही. खगोल शास्त्रज्ञांनी या दुर्मिळ खगोलीय घटनेचे वर्णन ग्रहांची युती (parade of planets) म्हणून केले आहे. सविस्तर वाचा ...
  6. सिंधुदुर्ग - व्हेल माशाच्या महागड्या उलटीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सिंधुदुर्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ( Sindhudurg police crime branch ) गोव्यातील तिघांना व्हेलच्या उलटीची वाहतूक करताना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तब्बल पाच कोटी रुपयांची उलटी जप्त करण्यात ( Ambergris seized in Sindhudurg ) आली आहे. ही कारवाई शनिवारी बांदा गांधी चौक येथे करण्यात आली. सविस्तर वाचा ...
  7. मुंबई - एआयएमआयएम पक्षाच्या वतीने शनिवारी मुंबईत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. मोठ्या विरोधानंतरही आज चांदीवली येथे सभा रॅली पार पडली. ( MIM Tiranga Rally ) यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी पोलिसांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे. नवी मुंबईजवळ तिरंगा रॅली पोहचल्यावर पोलिसांनी दिलेली वागणूक चुकीची होती. मी खासदार आहे का दहशतवादी? असा प्रश्न इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला. तसेच पोलिसांनी मुंबईला जाण्यासाठी गाड्यांवरील तिरंगा झेंडा काढण्यास सांगितल्याचा आरोप जलील यांनी केला. ( MP Imtiyaz Jaleel in Tiranga Rally Mumbai ) सविस्तर वाचा ...
  • जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -
  1. 12 डिसेंबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आज प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
  2. VIDEO : 12 डिसेंबर राशीभविष्य - कसा असेल तुमचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य
  3. साप्ताहिक राशीभविष्य : 12 डिसेंबर ते 18 डिसेंबर : कसा असेल तुमचा हा आठवडा? जाणून घ्या आचार्य पी खुराणा यांच्याकडून

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.