ETV Bharat / bharat

शरद पवार यांच्या भाषणाच्या पुस्तकाचे प्रकाशन ...वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर

वाचा काल आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Dec 11, 2021, 6:55 AM IST

Updated : Dec 11, 2021, 2:49 PM IST

  • आज 'या' घडामोडींवर असणार नजर -
  1. शरद पवार यांच्या भाषणाच्या पुस्तकाचे प्रकाशन वरळी येथील नेहरू सेंटर येथे सकाळी 11 वाजता होणार आहे.
  2. पादचाऱ्यांची सुरक्षितता आणि त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी लक्ष्मी रस्त्यावर वॉकिंग प्लाझा (लक्ष्मी रोड ओपन स्ट्रीट मॉल) हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
  3. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत पुणे दौऱ्यावर असून ते पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील संघटनात्मक बैठकांमध्ये आढावा घेणार आहेत.

  • कालच्या महत्वाच्या बातम्या -
  1. मुंबई - ओमायक्रॉन कोरोनाच्या नव्या उत्परिवर्तित प्रकारच्या विषाणू संसर्गाचा रुग्ण मुंबईत सापडल्याने चिंता वाढलेली असताना धारावीसारख्या गजबजलेल्या झोपडपट्टीत टांझानिया येथून आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. या प्रवाशाचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंग चाचणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. या चाचण्यांचा अहवाल आला असून या प्रवाशाला ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग ( Omicron Patient in Dharavi ) झाल्याचे समोर आल्याची माहिती पालिकेच्या जी नॉर्थ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. त्यामुळे पुन्हा आता मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे. या रुग्णावर पालिकेच्या सेव्हनहिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सविस्तर वाचा...
  2. नवी दिल्ली - तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झालेल्या भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत (Gen Bipin Rawat) आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत (Madhulika Rawat) यांच्या पार्थिवावर संपूर्ण लष्करी इतमामात (Last Rites with full military honours) अंत्यसंस्कार (General Bipin Rawat last rites ) करण्यात आले. यावेळी लष्कराकडून रावत यांना 17 तोफांची सलामी देण्यात आली. दिल्लीतील ब्रार स्क्वायर (Barar Square) स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सीडीएस जनरल बिपिन रावत (Gen Bipin Rawat) यांच्या पार्थिवाला त्यांची मोठी मुलगी कृतिका हिने तर मधुलिका रावत यांच्या पार्थिवाला छोटी मुलगी तारिणी हिने मुखाग्नि दिली. यावेळी त्यांना 17 तोपांची सलामी देण्यात आली तर 800 जवान उपस्थित होते. यावेळी रावत यांचे कुटूंबीय व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सविस्तर वाचा ...
  3. मुंबई- एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे ( NCB Zonal Director Sameer Wankhede ) यांच्या कुटुंबीयांबाबत यापुढे कोणतेही विधान करणार नाही, अशी हमी आज (दि.10) शुक्रवार अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात बिनशर्त माफी ( Unconditional apology of Nawab Malik ) मागितली आहे. सविस्तर वाचा ...
  4. मुंबई - राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या काही दिवसात 1 हजाराहुन कमी रुग्ण आढळून येत आहेत. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. आज शुक्रवारी 695 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 631 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.72 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे. सविस्तर वाचा ...
  • जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -
  1. 11 डिसेंबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आज मानसिक तणावापासून मुक्तता मिळेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
  2. VIDEO : 11 डिसेंबर राशीभविष्य - कसा असेल तुमचा दिवस?जाणून घ्या आजचे राशीभविष्य
  3. आजची प्रेरणा : दिवसाची सुरुवात करा गीतेतील प्रेरक विचारांनी

Last Updated : Dec 11, 2021, 2:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.