१) एसटीच्या या कर्मचाऱ्यांवर आजपासून मेस्मा अंतर्घत कारवाईची निर्णय
मुंबई - राज्यात अजूनही एसटी कर्मचारी संपावर (ST Workers Strike) आहेत. याबाबत आज एसटी अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. जे एसटी कर्मचारी कामावर येऊ इच्छित आहेत मात्र त्यांना इतर कर्मचारी कामावर जाण्यापासून अडवत आहेत, अशा कर्मचाऱ्यांवर उद्यापासून (4 डिसेंबर) मेस्मा कायद्यांतर्गत कारवाई (Action against ST employees Under Mesma) करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांनी दिली.
२) मराठी साहित्या संमेलनाचा आज दुसरा दिवस
नाशिकमध्ये मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. हे संमेलन ३ ते ५ डिसेंबरपर्यंत आहे. आज संमेलनाचा दुसरा दिवस आहे.
कालच्या महत्वाच्या बातम्या -
नाशिक - साहित्यिकांनी जनतेच्या प्रश्नावर बोलले पाहिजे. जनतेला हवे ते लिहिले पाहिजे. साहित्यिकांनो, तुम्ही राजकीय पुढार्यांचे गुलाम न होता ( Javed Akhtar Advice to writers in Nashik ) देशाशी इमानदारी ठेवावी, असे परखड मत ज्येष्ठ विचारवंत व गीतकार जावेद अख्तर यांनी मांडले आहे. ते भुजबळ नाॅलेज सिटी येथे शुक्रवारी ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ( Javed Akhtar as Guest in Sahitya Sanmelan ) उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सविस्तर वाचा..
मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या (Covid Patient) आटोक्यात आहे. गेल्या काही दिवसांत 1 हजाराच्या दरम्यान रुग्ण (Corona Update) आढळून येत आहेत. त्यात गेल्या काही दिवसांत घट झाली आहे. आज शुक्रवारी 664 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 915 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.71 टक्के, तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे. सविस्तर वाचा..
मुंबई - राज्यात अजूनही एसटी कर्मचारी संपावर (ST Workers Strike) आहेत. याबाबत आज एसटी अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. जे एसटी कर्मचारी कामावर येऊ इच्छित आहेत मात्र त्यांना इतर कर्मचारी कामावर जाण्यापासून अडवत आहेत, अशा कर्मचाऱ्यांवर उद्यापासून (4 डिसेंबर) मेस्मा कायद्यांतर्गत कारवाई (Action against ST employees Under Mesma) करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांनी दिली. सविस्तर वाचा..
मुंबई - विधानसभेच्या अध्यक्षपदाची (Assembly Speaker Election) निवड डिसेंबर महिन्यात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनातच (Winter Session 2021) होईल व अध्यक्ष काँग्रेस पक्षाचाच होईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress President Nana Patole) यांनी स्पष्ट केले आहे. ते आज मुंबईत बोलत होते. 22 ते 28 डिसेंबर दरम्यान मुंबईत हे हिवाळी अधिवेशन होणार आहे. सविस्तर वाचा..
मुंबई - अत्यावश्यक सेवेकरी आणि त्यांनतर काेराेनाच्या दाेन लसमात्रा घेतलेल्या प्रवाशांनाच उपनगरीय लाेकलने प्रवास करण्याची मुभा असल्याने विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या माेठी आहे. मध्य रेल्वेवर (Central Railway ) गेल्या आठ महिन्यात विना तिकिट प्रवाशांकडून १२३ काेटी ३१ लाखांचा दंड वसूल केला आहे. याशिवाय प्रवासादरम्यान काेराेना प्रतिबंधक नियमांचे पालन न करणाऱ्या २४ हजार ९४४ प्रवाशांना पकडून ४१ लाख २८ हजारांचा दंड आकारला आहे. सविस्तर वाचा..
मुंबई - वरळी येथे मंगळवारी झालेल्या सिलेंडर स्फोटातील ( Standing committee on Gas cylinder blast in worli ) घटनेचे स्थायी समितीच्या बैठकीत पडसाद उमटले आहेत. स्फोटातील जखमी बालकावर उपचार करण्यात हलगर्जीपणा ( Nayar hospital negligence case ) झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी दोषी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थायी समितीत करण्यात आली आहे. सविस्तर वाचा..
जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -
VIDEO : 04 डिसेंबर राशीभविष्य - कसा असेल तुमचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य
4 डिसेंबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आज नोकरीत लाभ होतील; जाणून घ्या आजचे राशीभविष्य