आज 'या' घडामोडींवर असणार नजर -
1) गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा मुंबईत रोड शो
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेन पटेल आज मुंबईत रोड शो करणार.
२) परिवहन मंत्र्यांची संघटनांसोबत बैठक
एसटी कर्मचाऱ्यांना दिलेल्या वेतनवाढीबाबत सांशकता आहे. ती दूर करण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी मान्यता प्राप्त संघटनांची उद्या बैठक (ST unions and Anil Parab Meeting) बोलावली आहे. बैठकीत वेतन निश्चितीबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
३) वीज ग्राहक संघटनेच्या अध्यक्षाची पत्रकार परिषद
महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप हेगडे यांची आज पत्रकार परिषद होणार आहे.
४) मुंबईत पाऊस पडण्याची शक्यता
उद्या मुंबईत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
५) राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता
लक्षद्वीप मालदीव जवळ चक्रीवादळाच्या पट्ट्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. यामुळे महाराष्ट्रात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. पावसाबरोबर वाऱ्याचा वेग ताशी ६५ किलोमीटरवर पोहोचण्याचा अंदाज असून, १ आणि २ डिसेंबरला दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीजवळ, तर २ आणि ३ डिसेंबरला उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीजवळच्या समुद्रात मच्छीमारांनी जाऊ नये, असा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
कालच्या महत्वाच्या बातम्या -
मुंबई - नेत्यापेक्षा जनता जास्त ताकदवान असते. कोणीही अजिंक्य नाही. त्यांच्या छातीचा आकार कितीही असो, असा खोचक टोला तृणमूल काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ( Mamata Banerjee Slammed PM Modi ) लगावला आहे. मुंबई दौऱ्यावर आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण केंद्रात माध्यमांशी बोलत होत्या. सविस्तर वाचा..
मुंबई - यूपीए-2 आता कुठे अस्तित्वात आहे, असा सवाल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee on congress) यांनी आज मुंबईत शरद पवार यांच्या भेटीनंतर उपस्थित केला. ममता बॅनर्जी यांच्या या विधानाला काँग्रेसने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबई - तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Mamata Banerjee met NCP chief Sharad Pawar ) यांची भेट घेतली. शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली. ही भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. देशात सध्या जी परिस्थिती आहे त्याला तोंड देण्यासाठी एक सक्षम पर्याय देण्याची गरज असल्याचे ममता बॅनर्जी यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना सांगितले. सविस्तर वाचा..
मुंबई - राज्यात आज बुधवारी 767 नव्या कोरोना रुग्णांची (New Corona Cases) नोंद झाली आहे. आज 28 रुग्णांचा कोरोनाने (Corona Patients Death) मृत्यू झाला आहे. तर 903 रुग्णांना डिस्चार्ज (Corona Discharged Patients) देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.71 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे. सविस्तर वाचा..
कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले आहे. तेव्हापासून शहरी भागासह ग्रामीण भागातील विद्यार्थांची किलबिलाट बंद होती. पहिली लाट ओसरल्यानंतर गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात नवनी ते बारावीचे वर्ग सुरू झाले होते. त्यानंतर आठवीचे वर्ग सुरू होत नाही, तोच कोरोनाची दुसरी लाट आली आणि शाळा पुन्हा बंद झाल्या. यावर्षी कोरोना नियंत्रणात आल्याने 25 जुलैपासून ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. मात्र इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग बंदच होते. अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर आजपासून पहिली ते चौथीच्या शाळेची पहिली घंटा वाजली आहे. ग्रामीण भागात सर्वत्र प्राथमिक शाळा सुरू झाल्या असल्या तरी शहरी भागातील शाळा पूर्णत सुरू झालेल्या नाहीत. पाहा व्हिडिओ..
मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांना दिलेल्या वेतनवाढीबाबत सांशकता आहे. ती दूर करण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी मान्यता प्राप्त संघटनांची उद्या बैठक (ST unions and Anil Parab Meeting) बोलावली आहे. बैठकीत वेतन निश्चितीबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सविस्तर वाचा..
जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -
VIDEO : 02 डिसेंबर राशीभविष्य - कसा असेल तुमचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य
2 डिसेंबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आज आर्थिक बाबीत फटका बसू शकतो; जाणून घ्या आजचे राशीभविष्य