आज 'या' घडामोडींवर असणार नजर -
1) संभाजी ब्रिगेडचा आज कार्यकर्ता महामेळावा
मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेण्यासाठी तसेच, येणाऱ्या निवडणुकांबाबत निर्णायक दिशा ठरविण्यासाठी संभाजी ब्रिगेडचा आज मुंबईतील रंगशारदा सभागृहात कार्यकर्ता महामेळावा होणार आहे.
२) भाजपकडून पत्रकार परिषद
आज भाजपकडून पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी शिवसेनेचा विरोध केला जाण्याची शक्यता.
३) किरीट सोमैया आज अमरावतीत
४) माजी गृहमंत्री अनिल देशमुख चांदीवाल आयोगासमोर योण्याची शक्यता
अनिल देशमुख यांना चांदीवाल आयोगाने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. आज ते आयोगासमोर चौकशीला येण्याची शक्यता.
५) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री मुंबई दौऱ्यावर
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज मुंबई दौऱ्यावर (Mumbai visit) असणार.
कालच्या महत्वाच्या बातम्या -
मुंबई - ओमिक्रॉनची धास्ती असली तरी राज्य सरकारने पहिलीपासूनचे वर्ग सुरू करण्याचा घेतला आहे. १ डिसेंबरपासून राज्यातील प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने ( Maharashtra education department on schools to reopen ) घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेतली जाणार आहे. त्याबाबत कडक नियमावलीचे पालन करण्याची सूचना शालेय शिक्षण विभागाने शाळांना दिली आहे. सविस्तर वाचा...
मुंबई - राज्यात सोमवारी (दि. 29) 536 नव्या कोरोना रुग्णांची ( Corona Update ) नोंद झाली आहे. तर काल 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 853 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.7 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे. सविस्तर वाचा...
मुंबई - राज्य सरकारला दोन वर्ष पूर्ण ( Two Years to the State Government ) झाली आहेत. या काळात सरकारला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला असला तरीही सरकारचा आलेख चढता असून विरोधकांनी त्याची काळजी करू नये, विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी सरकार हलणार नाही हे नक्की, असा विश्वास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Housing Minister Jitendra Awhad ) यांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडी सरकारला ( Mahavikas Aghadi Government ) दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ईटीव्ही भारतने त्यांच्याशी साधलेला खास संवाद. पाहा व्हिडिओ..
मुंबई - देशभरात आक्रमक वक्तृत्त्व शैलीसाठी ओळखले जाणारे शिवसेना खासदार संजय राऊत आज मुलीच्या लग्नाच्या पाठवणीच्या वेळी भावुक होताना दिसले. सर्वसामान्य घरात ज्याप्रमाणे पाठवणीवेळी जसे वातावरण होते तसेच वातावरण यावेळी होते. मुलीच्या लग्नात राऊत यांनी नृत्यही केलं. यानंतर पाठवणीच्यावेळी मात्र बापाचे हृदय भरून आले. भल्याभल्या राजकारण्यांना घाम फोडणारे राऊत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. ( Sanjay Raut Emotional During Daughter Marriage ) त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले आणि त्यांनी स्वतःहून मुलगी पूर्वशी हिचा हात पकडून पाठवणी केली. ( Sanjay Raut Daughter Marriage ) सविस्तर वाचा..
नाशिक - ओमिक्रॅान विषाणुचा धोका लक्षात घेता नाशिकमध्ये होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. साहित्य संमेलनात येणाऱ्या रसिकांना लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवावे लागणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली. नाशिकमध्ये 3 ते 5 डिसेंबर रोजी होणार आहे. सविस्तर वाचा..
जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -
30 नोव्हेंबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आजचा दिवस आरोग्यमय ठरेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य