ETV Bharat / bharat

आज राज्यभरात विशेष ग्रामसभा आणि... वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर - todays news

काल आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

टॉप न्यूज
टॉप न्यूज
author img

By

Published : Nov 16, 2021, 5:56 AM IST

आज 'या' घडामोडींवर असणार नजर -

  • आज राज्यभरात विशेष ग्रामसभा

मतदार नोंदणी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या याद्यांमधील त्रृटी दूर करून त्रुटी विरहित याद्या करण्यासाठी राज्यभर १६ नोव्हेंबरला थेट ग्रामसभा होणार आहे. नव्याने यादीत समाविष्ट झालेल्या याद्यांचे चावडी वाचन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला असून ग्रामसभेत यादीला मान्यता मिळाल्यानंतरच अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार 'पूर्वांचल एक्सप्रेस वे’चे लोकार्पण

उत्तर प्रदेशातील नऊ जिल्ह्यांना जोडणार्‍या आणि राज्यात आर्थिक विकासाला गती देणार्‍या ‘पूर्वांचल एक्सप्रेस वे’चे लोकार्पण आज रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. विशेष म्हणजे, या महामार्गावर भारतीय वायुदलासाठी धावपट्टी तयार करण्यात आली असून लोकार्पणप्रसंगी भारतीय वायुदलातर्फे ‘एअर शो’चे आयोजन करण्यात येणार आहे.

  • राज्यात आज मध्यम पावसाची शक्यता

हवामान शास्त्रज्ञ के. एस. होसळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 ते 19 नोव्हेंबरपर्यंत राज्यात काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पुढील तीन ते चार दिवस ढगाळ वातावरण राहून मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यात 15 नोव्हेंबर रोजी पाऊस पडेल. तर 16 नोव्हेंबर रोजी उस्मानाबादमध्ये पाऊस पडेल. 17 नोव्हेंबर रोजी लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, अशी शक्यता मराठवाड्यातील हवामान तज्ज्ञ डॉ. के. के. डाखोरे यांनी व्यक्त केली आहे.

  • विधान परिषदेच्या ६ जागेसाठी आज अधिसूचना जाहीर होणार

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ५ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून रिक्त होणाऱ्या ६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर. निवडणुकीची अधिसूचना आज १६ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध होणार. संबंधित जिल्हे अथवा विभागामध्ये तत्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू.

कालच्या महत्वाच्या बातम्या -

नाशिक - त्रिपुरात अनुचित घडले म्हणून महाराष्ट्रात असे घडणे योग्य नाही. राज्यातील काही मोजक्या भागात या घटना घडल्या आहेत. तीन-चार राज्यांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हे जाणीवपूर्वक केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP president Sharad Pawar) यांनी भाजपचे नाव न घेता केला आहे. ते पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलत होते.सविस्तर वाचा...

मुंबई - कांजूरमार्ग येथील अवजड औद्योगिक वसाहतीमध्ये आग लागली आहे. सॅमसंग सर्व्हिस सेंटरमध्ये ही भीषण आग लागली आहे. या ठिकाणी इलेक्ट्रॉनिकस वस्तू तसेच लाकडी सामान अशा अनेक वस्तूंचे गोदाम आहेत. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. आग लागताच या ठिकाणचे कर्मचारी बाहेर पडले आहे. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.सविस्तर वाचा...

अमरावती - अमरावती शहरात तणाव (amravati violence) निर्माण केल्या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या माजी पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे, महापौर चेतन गावंडे यांसह भाजपच्या (bjp) एकूण 14 जणांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे.सविस्तर वाचा...

अमरावती - राज्य परिवहन एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे. या मागणीसाठी एसटी कर्मचारी (ST workers strike) मागील पाच ते सहा दिवसांपासून राज्यभर आंदोलन करत आहे. त्यामुळे आपल्या एसटीचे चाके थांबले आहे. तर दुसरीकडे एसटीची चाके थांबल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची लूट होत आहे. मात्र एसटी डेपो परिसरात व्यवसाय करून उपजीविका भागवणाऱ्या व्यावसायिकांवरही (ST workers strike impact) या संपामुळे उपासमारीची वेळ आली आहे.सविस्तर वाचा...

गडचिरोली - गडचिरोली पोलीस दलाने (Gadchiroli Police) केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पालकमंत्री एकनाथ शिंदे (minister eknath shinde) यांनी जिल्हा नियोजन मधील निधीतून 51 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा आज गडचिरोली येथे केली. पोलिसांचे मनोबल वाढावे व त्यांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी या निधीचा निश्चितच त्यांना फायदा होईल, असे ते यावेळी म्हणाले.सविस्तर वाचा...

मुंबई - राज्य सरकारच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (maharashtra winter session 2021) येत्या ७ डिसेंबर २०२१ पासून नागपूर येथे प्रस्तावित आहे. मात्र, विविध कारणांमुळे हे अधिवेशन पुढे ढकलले जाण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले असून, त्याच्या स्थळाबाबत अद्याप निश्चिती नाही.सविस्तर वाचा...

हैदराबाद - रचकोंडा पोलिसांनी (Rachakonda Police) आंतररराज्य ड्रग रॅकेट (inter state drug peddlers) चालविणाऱ्या पेडलरला अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 3 कार आणि 1,240 गांजा जप्त केला आहे. या गांजाची किंमत 2 कोटी रुपयांहून अधिक आहे. रचकोंडा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली आहे. आरोपी हे विशाखापट्टणममधील सिलेरूमधून महाराष्ट्रात गांजा नेणार होते, अशी माहिती रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत (Rachakonda CP Mahesh Bhagwat) यांनी पत्रकार परिषदेत दिली.सविस्तर वाचा...

मुंबई - क्रूझ पार्टी प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Shah Rukh Khan's son Aryan Khan)ला अटक करण्यात आले होते. आर्यन खान (Aryan Khan) या प्रकरणातील सोडण्यासाठी 25 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती, असा गौप्यस्फोट प्रभाकर साईल (Prabhakar Sail) यांनी केला होता. त्यामध्ये सॅम डिसोझा यांचे नाव समोर आले होते. त्यानंतर आज क्रूझ शिप अंमली पदार्थ प्रकरणी (Cruise ship drug case) सॅम डिसोझा (Sam D'Souza) सोमवारी मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकासमोर (SIT) हजर झाला. या प्रकरणात डिसोझाचे नाव पेमेंटच्या आरोपात पुढे आले होते.सविस्तर वाचा...

जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -

16 नोव्हेंबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आजचा दिवस मध्यम फलदायी आहे ; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

आजची प्रेरणा : दिवसाची सुरुवात करा गीतेतील प्रेरक विचारांनी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.