आज 'या' बातम्यांवर असेल नजर -
- आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद गोव्यात नौदलाच्या कार्यक्रमात सहभागी होणार
- शिक्षकांच्या मुद्यावरून आज भाजपाचे राज्यव्यापी आंदोलन
- मेघोली धरण अपघातासंदर्भात आज शेतकऱ्यांचे नागपूरमध्ये आंदोलन
- आज राज्यात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता
कालच्या महत्त्वाच्या बातम्या -
मुंबई - महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्याचे दिसून येत आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयाने लुकआऊट नोटीस जारी केल्याची माहिती ज्येष्ठ वकील जयश्री पाटील यांनी दिली आहे. जयश्री पाटील यांनीच सुरुवातीला अनिल देशमुख यांच्या विरोधात हायकोर्टामध्ये धाव घेतली होती. त्यानंतर 100 कोटी वसुली प्रकरणात सीबीआयने देशमुख यांच्या विरोधात कारवाई केली होती. सविस्तर वाचा....
मुंबई - एकीकडे कोरोना, टाळेबंदीमुळे महापालिकेचे आर्थिक गणित बिघडले असताना पेंग्विनवर पुढील तीन वर्षासाठी 15 कोटींचा खर्च केला जाणार आहे, तशी निविदा पालिकेने काढण्यात आली आहे. हा कोट्यवधीचा खर्च का केला जात आहे, असा प्रश्न पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी उपस्थित केला आहे. तसेच काढण्यात आलेली निविदा रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यावर खर्चाबाबत नक्की तोडगा काढला जाईल. मात्र, पेंग्विनबाबत तडजोड केली जाणार नाही, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे. सविस्तर वाचा...
सांगली - राष्ट्रवादीचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या परिक्रमा आंदोलनावर प्रश्न उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांना 2019 प्रमाणे अधिकची मदत देण्याचा निर्णय 27 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांनी घेतलेला असताना आंदोलन, परिक्रमा करण्याची आवश्यकता नव्हती, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. ते सांगली मध्ये बोलत होते. सविस्तर वाचा...
सोलापूर - अहोरात्र कष्ट घेऊन आपल्या मालकाचे ओझ खांद्यावर घेऊन शेतकामात मदत करणाऱ्या बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे अर्थात 'बैल पोळा'. मात्र, सोलापूरातल्या माढा तालुक्यात फक्त पोळ्यालाच नाही, तर रोज बैलाची पुजा केली जाते. येथील रिधीरे गावच्या धनाजी भानुदास गायकवाड या शेतकऱ्यांने आपल्या मृत्यू झालेल्या लाडक्या बैलाची शेतात समाधी बांधली आहे. ते रोज या समाधीचे दर्शन घेतात. तसेच दरवर्षी हे कुटूंब बैलाची पुण्यतिथी देखील साजरी करताच. सविस्तर वाचा...
पणजी - नौदलाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज (रविवारी) गोव्यात दाखल झाले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांचे दाबोलीम विमानतळावर स्वागत केले. त्यांच्यासोबत राज्यपाल इ श्रीधरन पिल्लई, प्रोटोकॉल मंत्री म्हाव्हीन गुडीन्हो, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत उपस्थित होते. वायू सेनेच्या विशेष विमानाने राष्ट्रपती गोवा विमानतळावर दाखल झाले. पुढे विशेष हेलिकॉप्टरने बांबोलीम हेलिपॅडवर दाखल झाल्यावर त्यांचा ताफा दोना पावला येथील राजभवनकडे दाखल झाला. सविस्तर वाचा...
जाणून घ्या आजचे राशीभविष्य -