ETV Bharat / bharat

आज संघ परिवाराची दोन दिवसीय अखिल भारतीय समन्वय बैठक, वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर - todays important news

काल आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

top news
top news
author img

By

Published : Sep 3, 2021, 8:31 AM IST

आज 'या' घडामोडींवर असणार नजर -

  • आज नागपुरात संघ परिवाराची दोन दिवसीय अखिल भारतीय समन्वय बैठक
  • आज महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन, ३ ते ५ सप्टेंबरदरम्यान होणार आयोजन
  • तापमान बदलासंदर्भात आज दिल्लीत महत्त्वाची बैठक; पंतप्रधान मोदी आणि मुकेश अंबानी राहणार उपस्थित
  • गणेशोत्सावानिमीत्त कोकणात जाण्यासाठी आजपासून विशेष रेल्वे सुरु होणार
  • काँग्रेस नेते पी चिदंमबरम यांची पत्रकार परिषद
  • आज विदर्भासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता

कालच्या महत्त्वाच्या बातम्या -

  • मुंबई - मंत्रालयात वर्षानुवर्षे एकाच जागी, ठाण मांडून बसलेल्या तब्बल ३०० अधिकाऱ्यांची एकाच वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेरबदली करत सर्वांना झटका दिला आहे. यामुळे मंत्रालयात मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे दाबे दणाणले आहेत. सविस्तर वाचा....
  • दिल्ली (कोल्हापूर) - मराठा आरक्षणाचा प्रश्न राष्ट्रपतींपुढे मांडून मराठा समाजाला असलेली आरक्षणाची गरज व समाजाच्या भावना राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवण्यासाठी छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवन येथे भेट घेतली. गेल्या अनेक दशकांच्या आर्थिक दारिद्रयामुळे मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मागासलेला आहे. त्यामुळे मराठा समाजास मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या समाजास आरक्षण मिळणे अत्यंत गरजेचे आहे, असे म्हणत समाजाची ही वास्तविकता राष्ट्रपतींपुढे मांडून त्यांनी या विषयात लक्ष घालावे, अशी विनंती संभाजीराजे यांनी यावेळी केली आहे. सविस्तर वाचा...
  • मुंबई - जल जीवन मिशन अंतर्गत वर्ष (२०२४)पर्यंत राज्यातील ग्रामीण भागात १ कोटी ४२ लाख ३६ हजार नळजोडण्या देण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट मोठे असले तरी हे काम आपल्याला करावेच लागेल. (२०२४)पर्यंत नळजोडण्यांचे हे उद्दिष्ट गाठण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखून त्याची सर्व यंत्रणांनी युद्ध पातळीवर अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. आज मुख्यमंत्रयांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत जलजीवन मिशन नियोजन व अंमलबजावणीच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. सविस्तर वाचा...
  • मुंबई - राज्यात गुरूवारी (२ सप्टेंबर) रोजी ४ हजार ३४२ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. बुधवारी (दि. ३ सप्टेंबर) राज्यात १८३ मृत्यूची नोंद झाली होती, आज त्यात घट होऊन ५५ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातून आज ४ हजार ७५५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के इतका असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. सविस्तर वाचा...
  • वसई - वसईच्या भुईगाव समुद्रकिनारी गुरूवारी दुपारी एक महाकाय संशयास्पद बोट आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ही बोट नेमकी कोणाची आहे किंवा त्यात असलेले नागरिक कोण आहेत याबाबतची माहिती अद्याप मिळाली नसल्याने किनारपट्टी परिसरासह वसई गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. सविस्तर वाचा...

जाणून घ्या आजचे राशीभविष्य -

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.