आज 'या' घडामोडींवर असणार नजर -
- माजी केंद्रीय मंत्री तथा अखिल भारतीय काँग्रेस समितीचे गोव्यातील निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम हे २५ व २६ ऑगस्ट रोजी आपल्या पहिल्या गोवा दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात काँग्रेसची निवडणूक रणनीती ठरण्याची शक्यता आहे.
- राज कुंद्राच्या मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम दिलासा जामीन याचिकेवर आज होणार सुनावणी
- भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत राहिल्यानंतर भारताने लॉर्ड्सवरील सामना जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना आजपासून सुरु होणार आहे.
- मुंबई विद्यापीठाच्या UG प्रवेशांची दुसरी यादी आज जाहीर होणार आहे.
- प्रसिद्ध कास पठार आजपासून पर्यटकांसाठी खुले होणार आहे.
- नागपूर मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रावर आज लसीकरण सुरू राहणार आहे.
- आज अभिनेत्री डेजी शहा हिचा वाढदिवस
कालच्या महत्वाच्या बातम्या -
रायगड - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयीच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर त्यांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर महाड न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरु होती. ही सुनावणी नुकतीच आटोपली आहे. न्यायालयाने राणेंना 15 हजार रुपयांचे वैयक्तिक जातमुचलक भरण्यासाठी जामीन मंजूर केला आहे. दरम्यान जामीन मंजूर करताना न्यायालयाने राणेंना काही अटी घातल्या आहेत. त्यांना 31 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी उपस्थित राहावे आणि भविष्यात अशा प्रकारचा गुन्हा करणार नाही असे न्यायालयाने सांगितल्याचे नारायण राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी सांगितले आहे.सविस्तर वाचा
रत्नागिरी - केंद्रीय मंत्री नारायण राणेंना आकसापोटी अटक करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. ते म्हणाले, की, जन आशिर्वाद यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत होता. त्याच्या असूयपोटी नारायण राणे यांच्यावर कारवाई करण्यात आले. पोलिसी प्रशासनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षकांनी काढलेली नोटीस चुकीची आहे. भाजप कार्यकर्ते प्रचंड आक्रमक आहेत. पक्षाची संस्कृती पाहता राडेबाजी करणार नाही. मात्र, आव्हान दिले तर कार्यकर्ते खपवून घेणार नाहीत. महाड कोर्टात नेमके काय होते ते पाहून निर्णय घेऊ, वरिष्ठांशी बोलून पुढील निर्णय घेऊ. आकसापोटी कारवाई करण्यात आलेली आहे.सविस्तर वाचा...
नवी दिल्ली - केंद्र सरकारने जाहीर केलेली नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन म्हणजे कायदेशीर आणि संघटित लूट असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. काही दशकांमधून तयार केलेली अमूल्य सार्वजनिक संपत्ती ही काही निवडक हातात दिली जात आहे.सविस्तर वाचा...
मुंबई - शिक्षण क्षेत्रात आपले भविष्य घडवण्यासाठी तयार असलेल्या भावी शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणार्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २०२१साठी ऑनलाइन अर्ज भरण्यास ५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे.सविस्तर वाचा...
पुणे - पुण्यातून खुनाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आरोपीने बुधवार पेठेतील त्याच्या प्रेयसीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या शरीराचे तुकडे करून बॅगेत भरून त्या बॅगा लवासा परिसरातील निर्जन भागात फेकून दिल्या. संबंधित तरुणी मिसिंग असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास केला असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी तरुणाला अटक केली आहे.सविस्तर वाचा...
नांदेड - मराठा-ओबीसी दलित राजकारण करुन देश विभाजनमुख्यमंत्री करण्याचा डाव भाजपने आखला आहे. आगामी काळामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा काँग्रेस पक्षाचा होईल, असा ठाम विश्वास प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेस पक्षाच्यावतीने स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त नांदेड येथील कुसुम सभागृहात 'व्यर्थ न हो बलिदान-चलो बचाए संविधान' या कार्यक्रमानिमित्त स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पटोले बोलत होते.सविस्तर वाचा...
रत्नागिरी - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आज रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नारायण राणे यांच्याविरोधात नाशिक, महाड, पुण्यातील चतु:शृंगी पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -