आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी ज्यांच्यावर असेल देशाची नजर -
पंतप्रधान नरेंद्र मोदी इटली दौऱ्यावर.. G-20 शिखर परिषदेला राहणार उपस्थित
नवी दिल्ली - पंतप्रधान मोदींच्या रोम दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. मोदी आज G-20 शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत आणि संबोधितही करणार आहेत. याचबरोबर पंतप्रधान मोदी इंडोनेशियाचे राष्ट्रपती, फ्रान्सचे राष्ट्रपतींची देखील भेट घेणार आहेत. सिंगापूरच्या पंतपध्रानांशी देखील मोदींची भेट होणार आहे. या सर्व नेत्यांबरोबर पंतप्रधान मोदी जागतिक, आर्थिक, राजकीय व करोना महामारीबाबत स्वतत्रपणे द्विपक्षीय चर्चा करतील.
आज भारत-न्यूझीलंड लढत.. टीम इंडियासाठी आज करो या मरोची स्थिती
हैदराबाद - पाकिस्तानकडून मिळालेल्या पराभवानंतर आज होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारतासाठी करो या मरोची स्थिती आहे. विराट कोहलीच्या कर्णधारपदाच्या कारकीर्दीतील ही सर्वात आव्हानात्मक कसोटी आहे. त्यामुळे रविवारी, ३१ ऑक्टोबरला होणाऱ्या भारत-न्यूझीलंड यांच्यातील ‘अव्वल-१२’ फेरीच्या लढतीला उपांत्यपूर्व सामन्याचे महत्त्व प्राप्त झाले आहे.
स्टॅच्यू ऑफ यूनिटीवर आयोजित राष्ट्रीय एकता दिवस समारंभात गृहमंत्री अमित शाह होणार सामील
गांधीनगर - गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्यातील स्टॅच्यू ऑफ यूनिटीजवळ आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय एकता दिवस समारंभात आज गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी इटली दौऱ्यावर असल्याने अमित शाह या कार्यक्रमात सामील होणार आहेत.
गोरखपूरमध्ये आज प्रियंका गांधींची प्रतिज्ञा रॅली -
अलाहाबाद - गोरखपूरमध्ये राहुल गांधी यांची खाट सभा झाल्यानंतर आज प्रियंका गांधींची प्रतिज्ञा यात्रा रॅली आयोजित केली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. आगामी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
महागाई व इंधन दरवाढीविरोधात आज युवासेनेकडून राज्यभरात केंद्र सरकारविरोधात आंदोलन
मुंबई - वाढती महागाई व इंधन दरवाढीविरोधात आज राज्यभरात युवा सेनेकडून आंदोलन करण्यात येणार आहे. आपल्या आंदोलनातून केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात येणार आहे.
कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
बंगळुरू - कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांचे शुक्रवारी वयाच्या 46 व्या वर्षी निधन झाले. पुनीत राजकुमार यांच्या पार्थिवार आज कांतीरवा स्टेडियमवर अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, दिवंगत अभिनेत्याची मुलगी दिल्लीहून बंगळुरूला पोहोचली आहे. व्यायामशाळेत व्यायाम करत असताना 46 वर्षीय पनीतला हृदयविकाराचा झटका आला, त्याला तातडीने विक्रम रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.
काल दिवसभरातील महत्वाच्या बातम्या -
समीर वानखेडे अनुसूचित जातीचेच!, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या उपाध्यक्षांची प्रतिक्रिया
मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबई झोन डायरेक्टर समीर वानखेडे यांनी शनिवारी मुंबईत अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची भेट घेतली. त्यांनी त्यांच्याकडे एक तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यांनी स्वतःवरील धर्मांतराच्या आरोपांवर आपले मत उपाध्यक्षाना सांगितले. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर धर्मांतराच्या विरोधात आरोप लावले होते त्यासंदर्भात समीर वानखडे यांनी आयोगापुढे आपली बाजू मांडली आहे.
वाचा सविस्तर - समीर वानखेडे अनुसूचित जातीचेच!, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या उपाध्यक्षांची प्रतिक्रिया
दिवाळीच्या तोंडावर पावसाचे सावट; कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात विजाच्या कडकडाटात पाऊस!
मुंबई - मोसमी पाऊस परतला असला तरी हवामानात झालेल्या बदलामुळे दिवाळीत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. 2 नोव्हेंबरनंतर पुढील चार ते पाच दिवस पावसाची स्थिती असेल, असेही हवामान विभागाने सांगितले आहे.
वाचा सविस्तर - दिवाळीच्या तोंडावर पावसाचे सावट; कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात विजाच्या कडकडाटात पाऊस!
कोरोनामुळे वाढलेले सायको सोशल प्रॉब्लेम ठरत आहेत वाढत्या आत्महत्याचे कारण
पुणे - कोरोनाने केवळ शारीरिक आरोग्यावरच परिणाम केला, असे नसून मानसिक आरोग्यावरही परिणाम केला आहे. कोराना विषाणूमुळे आरोग्याच्या समस्या कमी, परंतु मानसिक आणि सामाजिक समस्या, म्हणजेच 'सायको सोशल प्रॉब्लेम' अधिक वाढले आणि हे वाढत्या आत्महत्याचे महत्वाचे कारण असल्याचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. निकेत कासार यांनी सांगितले.
वाचा सविस्तर - कोरोनामुळे वाढलेले सायको सोशल प्रॉब्लेम ठरत आहेत वाढत्या आत्महत्याचे कारण
भाजप नेत्याने आदिवासी महिलेला डांबून ठेवले होते, मंत्री नवाब मलिक यांचा नवा आरोप
नागपूर - भाजपच्या एका नेत्याने जामनेर येथील आदिवासी महिलेला मुंबईत स्वतःच्या घरात डांबून ठेवले, नंतर तिला सोडले आणि जेव्हा ती परत गावात गेली तेव्हा तिच्या पतीने आत्महत्या केली. ही जामनेरची घटना आहे, असा गंभीर आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नाव न घेता केला. सामान्य घरातील मुली पळवून स्वतःच्या घरात ठेवणारा तो नेता कोण? याचाही खुलासा अधिवेशनात होणार, असा इशारा नवाब मलिक यांनी केला आहे. गोंदियाहून ते मुंबईसाठी निघाले होते, दरम्यान नागपूर विमानतळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
वाचा सविस्तर - भाजप नेत्याने आदिवासी महिलेला डांबून ठेवले होते, मंत्री नवाब मलिक यांचा नवा आरोप
31 ऑक्टोबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांच्या घरात आज नांदेल सुख शांती; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य
जाणून घ्या संपूर्ण राशिभविष्य - 31 ऑक्टोबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांच्या घरात आज नांदेल सुख शांती; जाणून घ्या आजचे राशीभविष्य