ETV Bharat / bharat

World Cup 2023 : पाकिस्तान संघाची कामगिरी निराशाजनक; रोहित शर्मावर मुश्ताक मोहम्मद यांनी उधळली स्तुतीसुमने

भारतीय क्रिकेट संघाचा परंपरागत शत्रू असलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाचा शनिवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर भारतीय संघानं दारुण पराभव केला. मात्र पाकिस्तान संघाच्या पराभवानंतर माजी खेळाडूंनी पाकिस्तान संघावर टीका केली. पाकिस्तान संघाचे माजी खेळाडू मुश्ताक मोहम्मद यांनी पाकिस्तानी संघावर टीका केली असून रोहित शर्मावर स्तुतीसुमने उधळली आहेत. ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी संजीब गुहा यांच्याशी त्यांनी पाकिस्तानी संघाच्या खराब कामगिरीवर भाष्य केलं.

World Cup 2023
पाकिस्तान संघाचा माजी खेळाडू मुश्ताक मोहमद
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 17, 2023, 8:38 AM IST

Updated : Oct 17, 2023, 9:48 AM IST

कोलकाता World Cup 2023 : भारताचा परंपरागत स्पर्धक असलेल्या पाकिस्तान संघासोबत शनिवारी झालेल्या विश्वचषकातील महासंग्रामात पाकिस्तानच्या संघानं सपशेल शरणागती पत्करली. त्यामुळे पाकिस्तानी माजी खेळाडूंकडून पाकिस्तानी संघावर टीका करण्यात येत आहे. भारत पाकिस्तान संघातील झालेल्या या सामन्यात भारतीय संघानं विजयी घोडदौड सुरूच ठेवली आहे. मात्र अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी मैदानात झालेल्या या सामन्यात रंगत न आल्यानं क्रीडाप्रेमींची निराशा झाली आहे. याबाबत पाकिस्तान संघाचे माजी खेळाडू मुश्ताक मोहम्मद यांनी ईटीव्ही भारतसोबत खास बातचीत केली.

पराभवासाठी पाकिस्तानचे खेळाडू जबाबदार : पाकिस्तानचा माजी खेळाडू मुश्ताक मोहम्मद यांनी पाकिस्तानच्या संघावर टीका केली आहे. पराभवाला पाकिस्तानचे खेळाडू जबाबदार असल्याचं मुश्ताक मोहम्मद यांनी यावेळी स्पष्ट केलं. पाकिस्ताननं आपला पराभव घडवून आणला असल्याचं मुश्ताक मोहम्मद यांनी नमूद केलं. दोन फलंदाज बाद झाल्यानंतर 155 धावा होत्या, मात्र त्यानंतर खेळाडूंनी बेजबाबदार फटके मारल्याचं मुश्ताक मोहम्मद यांनी सांगितलं. भक्कम स्थितीत असलेला संघ 191 धावांवर बाद झाल्यानं आपण निराश झाल्याचं मुश्ताक मोहम्मद यांनी यावेळी नमूद केलं.

रोहित शर्माची कूटनीती सरस ठरली : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं जोरदार प्रदर्शन करत हा विजय संपादन केला आहे. पाकिस्तानी संघाच्या खराब कामगिरीचं श्रेय रोहित शर्माला दिलं पाहिजे असंही मुश्ताक मोहम्मद यांनी यावेळी सांगितलं. रोहित शर्मानं केलेल्या जोरदार खेळामुळेचं पाकिस्तानचा दारुण पराभव झाल्याचं मुश्ताक मोहम्मद यांनी यावेळी स्पष्ट केलं.

पाकिस्तान संघाची गोलंदाजी सामान्य, कामगिरी निराशजनक : पाकिस्तानचे माजी खेळाडू मुश्ताक मोहम्मद यांनी पाकिस्तानच्या संघावर चांगलीच टीका केली. भारत पाकिस्तान संघात झालेल्या सामन्यात पाकिस्तान संघाची देहबोली कमकुवत असल्याचं स्पष्ट होत होतं. पाकिस्तान संघाची गोलंदाजी सामान्य वाटत होती, तर कामगिरी निराशाजनक असल्याचं मुश्ताक यांनी यावेळी स्पष्ट केलं. पाकिस्तानच्या संघाचा आगामी सामना 20 ऑक्टोबरला चिन्नास्वामी मैदानात ऑस्ट्रेलियाच्या संघासोबत होणार आहे. त्यामुळे या सामन्यात पाकिस्तानच्या संघानं चांगला खेळ करावा, अशा शुभेच्छाही मुश्ताक यांनी दिल्या आहेत. मुश्ताक सध्या युनायटेड किंग्डममधील बर्मिंघम इथं राहत आहेत. ते सध्या 80 वर्षांचे आहेत. प्रकृती अस्वाथ्यामुळे मुश्ताक मोहम्मद सध्या क्रीडा क्षेत्रात सक्रिय नाहीत.

पाकिस्तानच्या संघावर माजी खेळाडूंची टीका : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी मैदानावर झालेल्या भारत पाकिस्तान संघाच्या सामन्यात पाकिस्तानच्या संघानं सपशेल शरणागती पत्करली. भारतीय संघानं पाकिस्तानच्या संघावर सहज मात करत विजय संपादन केला. मात्र यामुळे पाकिस्तानच्या संघावर पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी मोठी टीका केली आहे. माजी खेळाडू वसीम अक्रम, वकार युनूस आदी दिग्गज खेळाडूंनी पाकिस्तानच्या संघावर टीका केली.

हेही वाचा :

  1. Cricket World Cup २०२३ : हिटमॅननं मोडला षटकारांचा आणखी एक रेकॉर्ड, गोलंदाजीत बुमराहची कमाल
  2. Cricket World Cup २०२३ : हार्दिक पांड्याची मॅजिक ट्रिक अन् विराट कोहलीनं घातली चुकीची जर्सी!

Last Updated : Oct 17, 2023, 9:48 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.