ETV Bharat / bharat

आता तरी लावा मास्क... कोरोना बाधित गावात एकटे ठाकूरच ठरले हीरो - Thorang village of Lahaul Spiti

हिमाचल प्रदेश मधील एकाने कोरोना नियमांचे पालन करून स्वत:ला कोरोना मुक्त ठेवले आहे. अख्खा गाव कोरोना बाधित असताना भूषण ठाकूर या व्यक्तीने कोरोनाला स्वत:जवळ देखील फिरकू दिले नाही.

कोरोना बाधित गावात एकटा व्यक्ती ठरला हीरो

author img

By

Published : Nov 21, 2020, 9:24 PM IST

Updated : Nov 21, 2020, 9:31 PM IST

शिमला - जगभरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नाही, त्यातच सर्वच जण कोरोना लसीची वाट पाहात आहेत. कारण या महामारीपासून सुटका मिळाली पाहिजे. अशा परिस्थितीत हिमाचल प्रदेशमधील लाहौल स्पीति येथील थोरंग गावातील एका व्यक्तीने कोरोना लसीशिवाय त्यावर मात करता येऊ शकते हे दाखवून दिले आहे. ४३ नागरिकांच्या थोरंग गावातील भूषण ठाकूर ही एकमेव व्यक्ती कोरोना निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे केवळ मास्क आणि सामाजिक अंतराने कोरोनाला दूर ठेवणे शक्य होत असल्याचे उदाहरण भूषण ठाकूर यांनी दाखवून दिले आहे.

कोरोना बाधित गावात एकटे ठाकूरच ठरले हीरो

म्हणून त्यांचा अहवाल निगेटिव्ह-

थोरंग गावातील भूषण ठाकूर यांना सोडून गावातील सर्वच 42 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. गावात सर्वचजण कोरोना बाधित असताना देखील कोरोनाचा विषाणू ठाकूर यांना धोका पोहोचवू शकला नाही. विशेष म्हणजे भूषण ठाकूर यांच्या घऱातील सहा व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र एकमेव भूषण ठाकूर यांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामागचे एकमेव कारण म्हणजे गावत सरकारने कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी जी नियमावली घालून देण्यात आली होती, त्या नियमांचे भूषण ठाकूर काटेकोरपणे पालन करत होते. ठाकूर हे नियमितपणे मास्कचा वापर करत होते, तसेच सोशल डिस्टेंसिंगचे पालन करणे, सॅनिटायझरचा वापर करून काळजी घेत होते.

कोरोनाला सहजतेने घेऊ नका-

भूषण ठाकूर यांचे म्हणणे आहे की, माझा कोरोना अहवाल निगेटिव्ह आलाही असेल, मात्र कोरोनाला सहजतेने घेण्याची चूक केली नाही पाहिजे. ते घरात स्वंतत्र खोलीत रहात होते आणि दिवसा कोणालाही भेटत नसत. आणि शेतात जाऊन आपले काम करतात. घरातील सर्वच व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर ते त्याच्यापासून अलिप्त रहात होते, तसेच स्वत:चे जेवण स्वत: बनवत होते.

कोरोना नियमांचे पालन हाच उपाय-

डॉक्टरांचा देखील हाच अंदाज आहे, की भूषण ठाकूर यांनी कोरोनाच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन केले, त्यामुळेच त्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली राहिली आहे. त्यामुळे त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. सध्या डॉक्टरांचे पथक गावातील कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करत आहे.

सुरुवातीला गावातील पाच लोकांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर बाकीच्या लोकांनी स्वेच्छेने कोरोनाची चाचणी करून घेतली. त्यात भूषण ठाकूर यांच्या व्यतिरिक्त संपूर्ण गाव कोरोना पॉझिटिव्ह आले. या गावात १०० ग्रामस्थ राहतात. मात्र, सध्या बर्फवृष्टी सुरू झाल्याने काही जण कुल्लू मध्ये वास्तव्यास गेले आहेत.

Last Updated : Nov 21, 2020, 9:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.