जम्मू-काश्मीर - दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील काशु चित्रगाममध्ये सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाल्याची माहिती पुढे आली आहे. स्थानिक पोलीस आणि सैन्याने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.
दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून एक अतिरेकी ठार झाला आहे. दरम्यान, या भागातील काशु चित्रगाम परिसरात काही दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सैन्याने या परिसरात शोधमोहिम राबवली. यावेळी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे.