श्रीनगर - जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे पुन्हा अतिरेकी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक शुक्रवारी सकाळी झाली. यात आलमदार कॉलनी डेन्नर ईदगाह या भागात लपून बसलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या दोन अतिरेक्यांना जवानांनी कंठस्नान घातला आहे. अशी माहिती काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी ट्विटकरुन दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरमधील दानमार भागात अलामदार कॉलनी येथे सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकी दरम्यान दोन दहशतवादी ठार झाले. तर या परिसरात शोध मोहिम ही अद्याप चालूच आहे. हे दोन दहशतवादी हे स्थानिक असून त्यांचा लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले आहे. दरम्यान सकाळी बराच वेळ या भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानामध्ये चकमक सुरू होती. यावेळी या भागात लपलेल्या अतिरेक्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला आहे. दरम्यान सुरक्षा दलाच्या जवानांनी परिरसराला घेरा टाकला असून अतिरेक्यांचा शोध सुरू आहे.
सांबा आणि जम्मूमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चार संशयित ड्रोनही दिसले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
हेही वाचा - श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांचा सीआरपीएफच्या तुकडीवर हल्ला; एक जवान हुतात्मा