उरी / बांदीपोरा (जम्मू-काश्मीर) - उरी सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेला दहशतवादी ठार मारण्यात आला आहे. ता मुळचा पाकिस्तानातीलच असल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील वतनीरा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती काश्मीर पोलिसांनी एका ट्विटद्वारे दिली होती. दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्यासह अनेक साहित्य जप्त करण्यात आले आहेत.
दोन दहशतवादी ठार -
वटनीरा परिसरात दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे परिसरात घेराव घालत शोध मोहीम राबवण्यात आली. यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी पोलीस आणि सुरक्षा रक्षकांवर गोळीबार सुरू केला. यावेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. याआधी जुलै महिन्यात बांदीपोराच्या सुंबलार भागातील शोकबाबा जंगलात अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार तर, एक जवान जखमी झाला होता.'
हेही वाचा - राजस्थानमध्ये भीषण अपघातात 4 ठार, परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला