ETV Bharat / bharat

Elon Musk On Fully Sustainable Earth : भविष्यातील शाश्वत उर्जेसाठी एलन मस्क करणार १० ट्रिलियनची गुंतवणूक - मास्टर प्लॅन ३

एलन मस्क यांनी आता मेक्सिको या देशात टेस्लाचे उत्पादन सुरू करणार असल्याची माहिती बुधवारी दिली आहे. यावेळी त्यांनी आपल्या मास्टर प्लॅन ३ बाबतची माहितीही दिली आहे. एलन मस्क हे टेस्लाच्या गुंतवणूकदारांना संबोधित करत होते.

Elon Musk On Fully Sustainable Earth
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 2, 2023, 1:52 PM IST

सॅन फ्रान्सिस्को : एलन मस्क यांची टेस्ला ही कार सध्या चांगलीच चर्चेत आहे. यासाठी एलन मस्क यांनी आता मेक्सिको या देशात टेस्लाचे उत्पादन सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. याबाबतचा मास्टर प्लॅन ३ मस्क यांनी घोषित केला आहे. त्यासाठी एलन मस्क यांनी पारंपरिक जीवाश्म इंधनाला पर्याय म्हणून भविष्यातील शाश्वत उर्जेसाठी १० ट्रीलियन गुंतवणूक करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. टेक्सास येथील ऑस्टीनमधील गिगाफॅक्टरी येथे टेस्लाच्या गुंतवणूकदारांना संबोधित करताना एलन मस्क हे बोलत होते. मात्र यावेळी एलन मस्क यांनी नवीन ईलेक्ट्रीक कारची घोषणा केली नाही.

पृथ्वीवर शाश्वत उर्जेचा स्त्रोत : एलन मस्क यांनी बुधवारी टेस्लाच्या गुंतवणूकदारांच्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यांनी टेस्लाच्या गुंतवणूकदारांना संबोधित केले. या कार्यक्रमात त्यांनी आपल्या टेस्लाच्या मास्टर प्लॅन ३ बाबतची माहिती उपस्थित गुंतवणूकदारांना दिली. भविष्यात टेस्ला शाश्वात उर्जेसाठी १० ट्रीलियनची गुंतवणूक करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आपण करत असलेली गुंतवणूक ही जागतिक अर्थव्यवस्थेच्या तुलनेत जास्त नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यासह पृथ्वीवर शाश्वात उर्जेचे स्त्रोत उपलब्ध आहेत. त्यामुळे जीवाश्म इंधनाचा वापर टाळायला हवा असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी उर्जेचा वापर कमी करण्यासाठी नवीन इलेक्ट्रीक कारचे उत्पादनावरही त्यांनी भाष्य केले.

नैसर्गिक अधिवास जोपासणार : पृथ्वीवर शाश्वत उर्जेची अनेक साधने उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण पारंपरिक उर्जास्त्रोतांवर अवलंबून राहता कामा नये, असे एलन मस्क म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्याला शाश्वत उर्जास्त्रोत उपलब्ध असल्याने पृथ्वीवरील नैसर्गिक अधिवास नष्ट करण्याची गरज नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यासह त्यांनी आपल्याला थंडीत राहण्याची वा उघड्यावर राहण्याची गरज नसल्याचेही सांगितले. त्यासाठी फक्त आपल्याला नैसर्गिक उर्जेचा वापर करायचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पायाभूत सुविधेसाठी शाश्वत उर्जा : एलन मस्क यांनी यावेळी शाश्वत उर्जेला गती देऊन जगाचा विकास साधला जाऊ शकतो. त्यासाठी वारा आणि सौर उर्जेचा वापर पायाभूत सुविधेसाठी करण्यात यायला हवा. त्यातून पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या ०.२ टक्क्यापेक्षांही कमी वारा आणि सौर उर्जा लागेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. रस्त्यावरील आताच्या जळत्या वाहनांच्या ताफ्याला ईलेक्ट्रीक वाहनांमध्ये बदलल्यास शाश्वत उर्जा अर्थव्यवस्थेला गती मिळवून देईल असा टेस्लाला विश्वास असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

१६ देशात सुपर चार्जर नेटर्वक : शाश्वत उर्जेची उत्पादने वाढवून विकासाला गती देता येत असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. घरात आणि व्यवसायात सोलर पंप वापरून शाश्वात उर्जेचा उपयोग करता येतो. त्यासह ईलेक्ट्रीक वाहने, विमाने आणि बोटींमध्येही शाश्वत उर्जा वापरता येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी टेस्ला एक पॉवर ट्रेन विकसित करत असून ती अधिक कार्यक्षम असेल. त्यात पृथ्वीवरची कोणतीही दुर्मीळ गोष्ट वापरण्यात आली नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी ईलेक्ट्रीक वाहनांसाठी यूएससह 16 देशांमध्ये सुपरचार्जर नेटवर्क खुले असल्याची माहिती त्यांनी दिल्याचे वृत्त आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिले आहे.

हेही वाचा - Meta Remove Minors Intimate Images : अल्पवयीन तरुणींचे अश्लिल फोटो शेअर करणाऱ्या विकृतांना लागणार चाप, मेटाने लावला 'सापळा'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.