वैशाली (बिहार) : बिहारमधील वैशाली येथून एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओत एक हत्ती वाळूत अडकलेल्या ई-रिक्षाला ढकलताना दिसत आहे. हत्तीच्या या पराक्रमाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हत्तीच्या मदतीनंतर ई-रिक्षा वाळूतून बाहेर पडू लागल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. माणसाच्या वाईट काळात हत्ती कसा उपयोगी ठरू शकतो, हे या व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्ट होत आहे.
हत्तीने सोंडेने ढकलून ई - रिक्षा बाहेर काढली : हत्तीने सोंडेच्या जोरावर ज्या ई - रिक्षाला धक्का दिला, त्या ई - रिक्षामध्ये प्रवासी असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. सगळीकडे फक्त वाळू पसरलेली आहे. अशा परिस्थितीत हत्तीने ई - रिक्षा चालकाला समस्यानिवारक बनून मदत केली. व्हायरल झालेला व्हिडिओ बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील राघोपूरचा आहे.
ई - रिक्षाचे चाक वाळूत अडकले : पीपा पुलावरून बिदुपूरहून मोठ्या संख्येने लोक राघोपूरला येतात. या पिपा पुलाच्या मधोमध मार्ग अनेक ठिकाणी वाळूने भरलेला आहे. तसेच त्यावर लोखंडी पत्रे व विटा टाकण्यात आल्या आहेत. तरीही यावर वाळूचे जाड थर बसल्या जाते. व्हायरल झालेला हा व्हिडिओ त्याच मार्गाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. राघोपूरकडून येणाऱ्या ई - रिक्षाचे चाक वाळूत अडकल्याने बाहेर पडू शकले नाही. यावर ई - रिक्षाचालकाने मागून येणाऱ्या हत्तीची मदत घेतली.
रिक्षाचालकाने माहूतकडे केली मदतीची विनंती : हत्तीवर बसलेल्या माहुतने ई - रिक्षाचालकाची कैफियत ऐकून मदतीचे आश्वासन दिले. यानंतर माहुतच्या सांगण्यावरून हत्तीने आपल्या सोंडेच्या जोरावर ई - रिक्षाला धक्का दिला. ई - रिक्षा जेथे जेथे वाळूत अडकत होती तेथे तेथे हत्ती ई - रिक्षाला ढकलताना दिसत आहे. थोड्याच वेळात ई - रिक्षा रस्त्यावरून सरपटत जाऊ लागली. दरम्यान, या घटनेचा कोणीतरी मोबाईलवरून व्हिडिओ बनवला. हा व्हिडीओ कधी बनवला गेला याबाबत फारशी माहिती नाही.
हेही वाचा :
- Bengal Firecracker Factory Blast : पश्चिम बंगालमध्ये विना परवाना फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 9 जण ठार
- JP Nadda Maharashtra Visit : जे.पी. नड्डा मुंबईत पोहोचले, कार्यकर्त्यांनी केले जंगी स्वागत
- Tamil Nadu Hooch Tragedy : विषारी दारू प्रकरणातील मृतांचा आकडा झाला 21, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची सरकारला नोटीस