ETV Bharat / bharat

2024 मध्ये प्रशांत किशोर असणार खरे किंगमेकर? - प्रशांत किशोर न्यूज

प्रशांत किशोर यांना 2024 च्या निवडणुकीत सरकारचे किंगमेकर व्हायचे आहे, अशी चर्चा आहे. अनेक लोक त्यांना 'विरोधी ऐक्याचे सूत्रधार' असेही म्हणत आहेत. पीके खरोखरच विखुरलेल्या विरोधकांना एकत्र करतील का, हे 2022 मध्ये होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतच कळेलच. जर पीके यात यशस्वी झाले तर ते खरोखरच भारतीय राजकारणाचे चाणक्य असतील.

2024 मध्ये प्रशांत किशोर असणार खरे किंगमेकर?

author img

By

Published : Aug 1, 2021, 5:46 PM IST

हैदराबाद: पश्चिम बंगाल विधानसभेच्या 294 जागांसाठी 27 मार्चपासून मतदान सुरू होणार होते. 10 मार्च 2021 रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पायाला निवडणूक प्रचारादरम्यान दुखापत झाली होती. यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये एक घोषणा लोकप्रिय झाली होती - 'खेला होबे' अर्थात खेळ होणार. 2 मे रोजी निवडणुकीचे निकाल आले आणि खेळ संपला. तृणमूल काँग्रेसने 213 जागा जिंकल्या होत्या आणि ममता तिसऱ्यांदा बंगालच्या मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले होते.

या विजयाने पुन्हा एकदा निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर आणि त्यांच्या आय-पॅक टीमने यशाची चव चाखली. यासह, प्रशांत किशोर यांची रणनीती तामिळनाडूमध्येही यशस्वी झाली आणि द्रमुकने पुन्हा सत्ता मिळविली.

2024 मध्ये प्रशांत किशोर असणार खरे किंगमेकर?
2024 मध्ये प्रशांत किशोर असणार खरे किंगमेकर?

पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये राजकीय परिस्थिती वेगळी होती. ममता बॅनर्जी यांच्यासमोर अँटी इन्कम्बन्सीचे आव्हान होते, तर स्टॅलिन यांना अँटी इन्कम्बन्सीचा फायदा घ्यायचा होता. प्रशांत किशोर एकाच वेळी दोन्ही प्रकारे निवडणूक रणनीतीची आखणी करत होते. प्रशांत किशोर यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी एकाच वेळी अनेक निवडणूक रणनीतींवर काम केले. ते त्यांच्या विरोधकांवर असा दबाव निर्माण करतात, जेणेकरून त्यांचा क्लाएन्ट मध्यवर्ती भूमिकेत येतो. यानंतर आपल्या रणनीतीनुसार, ते सहजपणे सर्व संदेश मतदारांपर्यंत पोहचवतात, ज्यामुळे विरोधकांचा पराभव होतो.

तज्ञांना असे वाटते की, प्रशांत किशोर विरोधकांवर टीका करण्याऐवजी स्वतःच्या सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करतात. त्यांच्या अॅक्शन प्लॅनमध्ये पब्लिक कनेक्टचा समावेश असतो.

  • बंगालमध्ये त्यांची टीम दीदीर के बोलो (दीदींसोबत बोला), बांगलार गौरवो ममता (बंगालची शान ममता), दीदी 10 अंगीकार, द्वारे सरकार, बंगध्वनी यात्रेद्वारे लोकांमध्ये गेली.
  • आपचे रिपोर्ट कार्ड, टाऊन हॉल, केजरीवाल यांच्या 10 गॅरंटी, मोहल्ला सभा या २०२० च्या दिल्ली निवडणुकांमध्ये प्रशांत आणि त्यांच्या टीमची आयडीया होत्या.
  • 2019 मध्ये, जेव्हा जगन मोहन रेड्डी यांनी आंध्रात पदभार स्वीकारला, तेव्हा त्यांनी नवरत्न सभालू, वायएसआर कुटुंबकम, प्रजा संकल्प यात्रा, वॉक विथ जगन असे कार्यक्रम केले.
  • पंजाब दा कॅप्टन, कॉफी विथ कॅप्टन, कॅप्टन किसान यात्रा, हर घर तो एक कॅप्टन सारख्या मोहिमांनी 2017 च्या पंजाब विधानसभा निवडणुका गाजविल्या.
  • 2015 च्या बिहार निवडणुकांमध्येही, हर घर दस्तक, नितीश यांचे 7 निश्चय, स्वाभिमान रथ यांना प्रचंड यश मिळाले.
  • 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पीके यांनी चाय पे चर्चा, नरेंद्र मोदींची 3 डी रॅली, विचारमंथन यासारख्या कल्पनांवर काम केले.

प्रशांत किशोर यांची रणनीती आणि I-PAC: गुजरात विधानसभेत भाजपच्या विजयानंतर 2013 मध्ये प्रशांत किशोर यांनी CAG ( citizen for accountable governance) नावाची संघटना स्थापन केली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर लोकांना पीकेंबद्दल माहिती झाली. 2015 मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी कॅगच्या सहकाऱ्यांसह त्यांनी I-PAC ची पायाभरणी केली. तेव्हापासून, या टीमसह, त्यांनी 8 राज्यांमधील विविध पक्षांसाठी निवडणूक रणनीती बनवली. प्रशांत यांनी सर्व विचारसरणीच्या पक्षांसोबत काम केले आहे.

आय-पॅक केवळ जाहिरातींवर काम करत नाही: जेव्हा आय-पॅक एखाद्या पार्टीसाठी काम करण्यास सुरुवात करते, तेव्हा सर्वप्रथम ते त्या राज्यात कार्यालय बनवतात. प्रशांत यांची टीम राज्यात सर्वेक्षण करते आणि पब्लिक कनेक्ट मोहिमेसाठी जनतेचा मूड जाणून घेते. ही टीम फक्त जाहिरात डिझाईन आणि घोषणा तयार करण्यापुरती मर्यादित नाही. रणनीतीशी संबंधित सदस्य निवडणूक क्षेत्रांतील राजकीय समीकरणे जाणून . यानंतर ही टीम स्वयंसेवी संस्था आणि इतर संस्थांच्या स्वयंसेवकांना आपल्या सोबतीने घेते, जे त्यांच्यासाठी इन्फ्लुएन्सर म्हणून काम करतात. तमिळनाडूच्या निवडणुकीत त्यांच्या कोअर टीममध्ये सुमारे 800 लोक काम करत होते, तर तिथे त्यांनी 3500 इन्फ्लुएन्सर्सना एकत्र केले होते.

सोशल मीडियाशी संबंधित टीमचे सदस्य त्यांच्या क्लाएन्टसाठी झटत असतात. असे म्हटले जाते की प्रशांत तिकीट वाटपात आपल्या क्लाएन्टला सल्लाही देतात. यासह, ते पक्षाच्या नित्य कामातही हस्तक्षेप करतात. यामुळे त्यांना पक्षातील नेत्यांच्या नाराजीचाही सामना करावा लागतो.

युती करण्यातही पीके भूमिका निभावतात! प्रशांत किशोर केवळ निवडणुकीत प्रचाराची रचना करत नाही, तर युतीचा फॉर्म्युलाही ठरवतात. 2015 च्या बिहार निवडणुकीत आरजेडी-जदयू युतीच्या माध्यमातून या सुरुवात झाली. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीला एकत्र आणण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली असे मानले जाते. 2017 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि काँग्रेसला एका व्यासपीठावर त्यांनी आणले. मात्र त्यांना त्यावेळी निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. सध्या सर्व विरोधी पक्ष केंद्रात एकत्र येत आहेत. ममता बॅनर्जी यांनी सोनिया-राहुल आणि विरोधी पक्षाच्या इतर नेत्यांशी भेट घेतल्यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पीकेंची ही रणनीती असल्याची चर्चा होत आहे. त्यांनी अनेक पक्षांच्या नेत्यांसाठी काम केले असल्याने प्रत्येक पक्षाचे बडे नेते त्यांच्या मित्र यादीत समाविष्ट आहेत.

पीके सक्रिय राजकारणात सामील होणार का?: बंगालच्या निवडणुकीनंतर प्रशांत किशोर यांनी निवडणूक रणनीतिकार म्हणून निवृत्तीची घोषणा केली. यावरून ते स्वतः सक्रिय राजकारणात पुन्हा सक्रिय होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 2015 मध्ये बिहार विधानसभेनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांना जदयूचे उपाध्यक्ष बनवले. परंतु २०२० पूर्वी त्यांच्यात मतभेद झाले आणि त्यांनी जद (यू) पासून स्वतःला दूर केले. तृणमूलने बंगालमधून त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची ऑफर दिल्याची चर्चा आहे. पण पीकेंनी ती स्वीकारली की नाही, हे स्पष्ट नाही. त्यांचे निकटवर्तीय म्हणतात की सध्या ते 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोठी भूमिका निभावण्याची तयारी करत आहेत.

वैयक्तिक परिचय: 1977 मध्ये जन्मलेल्या प्रशांत किशोर यांनी संयुक्त राष्ट्रामध्ये 8 वर्षे राजकीय रणनीतिकार म्हणून काम केले आहे. ते मूळचे बिहारमधील रोहतासचे आहेत पण त्यांचे वडील डॉ श्रीकांत पांडे बक्सरला शिफ्ट झाले होते. पीके यांनी बक्सरमध्येच शिक्षण घेतले आहे.

हेही वाचा - आजची देशाची स्थिती ही इंग्रजांच्या काळातील असल्यासारखी आहे - नाना पटोले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.