ETV Bharat / bharat

Assembly Election 2022 : गोव्यात 14 फेब्रुवारीला मतदान, 10 मार्चला निकाल; जाणुन घ्या... इतर राज्यांच्या तारखा - पाच राज्यातील निवडणुकीच्या तारखा

भारतीय निवडणूक आयोग 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा ( Assembly Election 2022 ) आज जाहीर करत आहे. उत्तर प्रदेश व्यतिरिक्त पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. भारतीय निवडणूक आयोग आज तारखा जाहीर केल्या. यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

Election commission on Assembly Election 2022
भारतीय निवडणूक आयोग
author img

By

Published : Jan 8, 2022, 3:41 PM IST

Updated : Jan 8, 2022, 4:51 PM IST

हैदराबाद - भारतीय निवडणूक आयोग 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा ( Assembly Election 2022 ) आज जाहीर करत आहे. उत्तर प्रदेश व्यतिरिक्त पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. भारतीय निवडणूक आयोग आज तारखा जाहीर केल्या. यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

  • पाच राज्यातील ६९० मतदारसंघात निवडणुका -

६९० मतदारसंघात निवडणुका होतील. यापैकी गोव्यातले ४०, मणिपूरमधील ६०, पंजाबमधील १७०, उत्तराखंडमधील ७० आणि उत्तर प्रदेशमधील ४०३ निवडणुकांचा समावेश आहे.

  • 8.55 कोटी महिला मतदार -

पाच राज्यातील एकूण 18.34 कोटी मतदार या निवडणुकीत भाग घेतील, त्यापैकी 8.55 कोटी महिला मतदार आहेत अशी माहिती सीईसी सुशील चंद्रा यांनी दिली आहे. यामध्ये सर्वाधिक २९ टक्के उत्तर प्रदेशात, गोव्यात २४ टक्के, मणिपूरमध्ये १९ टक्के, उत्तराखंड १८ टक्के तर पंजाबमध्ये १० टक्के महिला मतदारांचं प्रमाण वाढलं आहे. २४.९ लाख मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत. त्यामध्ये ११.४ लाख महिला मतदार आहेत.

  • प्रत्येक मतदार संघात एक मतदान केंद्र महिला व्यवस्थापित करणार -

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक मतदान केंद्र महिला व्यवस्थापित करणार आहेत. विधानसभेच्या 690 जागावर निवडणूक होणार आहे. पण महिला व्यवस्थापित करणारी 1620 मतदान केंद्रे उभारत येणार आहोत.

  • ज्येष्ठ, कोरोना रुग्णासाठी पोस्टल मतपत्रिकेद्वारे मतदान -

80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि कोविड-19 रूग्ण पोस्टल मतपत्रिकेद्वारे मतदान करू शकतात अशी माहिती त्यांनी दिली आहे.

  • मतदान केंद्रांवर EVM आणि VVPAT चा वापर -

सर्व मतदान केंद्रांवर EVM आणि VVPAT चा वापर केला जाईल. निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोगाने आधीच पुरेशा प्रमाणात ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटीची व्यवस्था केली आहे असे सीईसी सुशील चंद्रा यांनी सांगितले.

  • आदर्श आचारसंहिता उल्लंघन केल्यास कठोरपणे कारवाई -

आदर्श आचारसंहिता निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेपासून लगेच लागू होते. MCC मार्गदर्शक तत्त्वांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगाने विस्तृत व्यवस्था केली आहे. या मार्गदर्शक तत्त्वांचे कोणतेही उल्लंघन केल्यास कठोरपणे कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले.

  • तक्रारीसाठी C-Vigil मोबाईल अॅप -

नागरिकांसाठी सीव्हिजिल अॅपची घोषणा आयोगाने केली आहे. या अॅपवर कोणत्याही नियमांच्या उल्लंघनाची माहिती अपलोड करता येणार आहे. त्यावर फक्त फोटो घेऊन अपलोड करायचा आहे. पुढच्या १०० मिनिटांत त्यावर कारवाई केली जाईल असे सीईसी सुशील चंद्रा यांनी सांगितले.

  • उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्जची सोय -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुविधा अॅपच्या माध्यमातून उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या वर्षी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची सोय निवडणूक आयोगातर्फे करण्यात आली आहे.

  • रॅली काढता येणार नाही, प्रचाराला बंधन

15 जानेवारीपर्यंत रोड शो, रॅली, पदयात्रा, बाईक रॅली काढता येणार नाही, डोअर टू डोअर प्रचार करताना पाचजणांपेक्षा जास्त जणांना परवानगी नाही.

Election commission on Assembly Election 2022
निवडणूक कार्यक्रम
  • सात टप्पात होणार निवडणुका -

10 फेब्रुवारी पासून निवडणुकीला सुरूवात होणार आहेत. एकूण सात टप्पात होणार निवडणुका होणार आहेत.

पहिला टप्पा 10 फेब्रुवारी
दुसरा टप्पा 14 फेब्रुवारी
तिसरा टप्पा 20 फेब्रुवारी
चौथा टप्पा 23 फेब्रुवारी
पाचवा टप्पा27 फेब्रुवारी
सहावा टप्पा3 मार्च
सातवा टप्पा7 मार्च
  • 7 मार्चला निवडणुकांच्या टप्पांचा शेवट

सात टप्पात होणाऱ्या निवडणुकांचा शेवट हा 7 मार्चला होणार आहे.

  • गोव्यात 14 फेब्रुवारीला मतदान, 10 मार्चला लागणार निकाल लागणार आहे.

Last Updated : Jan 8, 2022, 4:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.