हैदराबाद - शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी झाले असे स्पष्ट होत आहे. सध्या तरी त्यांच्यामागे केवळ शिवसेनेचे 37 पेक्षा जास्त आमदार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. त्यामुळे शिवसेनेतून ते कायदेशीर रित्या बाहेर पडून वेगळा गट स्थापन करु शकतात. या सर्व आमदारांची आमदारकी त्यामुळे धोक्यात येणार नाही. पक्षांतर बंदी कायद्याचा अडसर यामुळे दूर झाल्याचे दिसत आहे.
सूरतमध्ये शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 32 आमदार होते. त्यानंतर त्यातील 2 आमदार आपली सुटका करुन परतल्याने त्यांच्याकडील आमदारांची संख्या 30 झाली. मात्र त्यानंतर शिवसेना नेते आणि मंत्री दादा भुसे, उदय सामंत यांच्यासह आमदार दीपक केसरकर, सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, दिलीप मामा लांडे, संजय राठोड हे नॉट रिचेबल झाले. हे सगळेच शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे मानण्यात येत आहे. हे सर्व आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून लवकरच गुवाहाटीला दाखल होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे आमदार जर शिंदे यांना जाऊन मिळाले तर त्यांचे 2/3 बळ होईल. त्यांना हीच मॅजिक फिगर गाठायची होती. ती गाठली गेली असेही म्हणता येईल. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला भले मोठे खिंडार पाडून बाजी मारल्याचेच स्पष्ट होत आहे.
-
Sada Sarvankar and Mangesh Kudalkar - two Shiv Sena MLAs, who were reported to have left Mumbai last night also seen with Eknath Shinde in Guwahati, Assam. pic.twitter.com/rRSVg2poUR
— ANI (@ANI) June 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Sada Sarvankar and Mangesh Kudalkar - two Shiv Sena MLAs, who were reported to have left Mumbai last night also seen with Eknath Shinde in Guwahati, Assam. pic.twitter.com/rRSVg2poUR
— ANI (@ANI) June 23, 2022Sada Sarvankar and Mangesh Kudalkar - two Shiv Sena MLAs, who were reported to have left Mumbai last night also seen with Eknath Shinde in Guwahati, Assam. pic.twitter.com/rRSVg2poUR
— ANI (@ANI) June 23, 2022
सूरतचा घटनाक्रम - शिंदे यांना ४० पेक्षा अधिक आमदारांनी पाठिंबा दिला. सुरतमध्ये शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबवण्यात आले होते. त्यानंतर एअर लिफ्टिंग करुन त्यांना गुवाहाटीत नेण्यात आले. या सर्व आमदारांना ‘रेडीसन ब्लू’ हॉटेलमध्ये ठेवले आहे. सेनेचे ४० पेक्षा अधिक आमदारांनी पाठिंबा दिला असताना गुलाबराव पाटील, रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम, चंद्रकांत पाटील आणि मंजुळा गावित या गुवाहाटीत पोहचल्या. बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे गुलाबराव पाटील हे शिंदे यांच्या गोटात गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शिंदेंना पाठिंब्याचा दावा असलेल्या आमदारांची यादी - शिवसेनेचे 37 पेक्षा जास्त आमदार एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी असल्याचे दिसते. त्यामध्ये शंभूराजे देसाई , अब्दुल सत्तार, बच्चू कडू, संदिपान भुमरे, प्रताप सरनाईक, सुहास कांदे, तानाजी सावंत, भरत गोगावले, यामिनी जाधव, अनिल बाबर, प्रकाश सुर्वे, बालाजी कल्याणकर, प्रकाश आबिटकर, संजय शिरसाट, श्रीनिवास वनगा, महेश शिंदे, संजय रायमुलकर, विश्वनाथ भोईर, सिताराम मोरे, रमेश बोरणारे, चिमणराव पाटील, लहुजी बापू पाटील, महेंद्र दळवी, प्रदीप जैस्वाल, महेंद्र थोरवे, किशोर पाटील, ज्ञानराज चौगुले, बालाजी किणेकर, उदयसिंह राजपूत, राजकुमार पटेल, लता सोनवणे, संजय गायकवाड, गुलाबराव पाटील, योगेश कदम, दादा भुसे, उदय सामंत, दीपक केसरकर, सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, दिलीप मामा लांडे, संजय राठोड या आमदारांचा समावेश आहे. हे सगळे आमदार शिंदे यांच्याबरोबर शेवटपर्यंत राहिले तर ठाकरे यांच्याविना शिवसेना असे ऐतिहासिक चित्र पाहायला मिळेल.
राजकीय हालचालींना वेग - आता या सगळ्या आमदारांसह राज्यात पर्यायी सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. त्यासाठी गुवाहाटी, सूरत आणि गोवा या तीन प्रमुख ठिकाणांवरुन हालचाली होत आहेत. राज्यपालांच्यापर्यंत या सर्व राजकीय घडामोडी पोहोचवण्यासाठी रणनिती आखण्यात येत आहे. त्याचे पत्ते हळू-हळू उघड होतील. सध्या तरी एकनाथ शिंदे यांच्याकडील शिवसेना आमदारांचा पाठिंबा पाहता त्यांनी बाजी मारली आहे असेच म्हणावे लागेल.