ETV Bharat / bharat

पक्षांतर बंदी कायद्याच्या कचाट्यातून एकनाथ शिंदे सहीसलामत वाचणार? - Guwahati Assam

एकनाथ शिंदे यांना आता पक्षांतर बंदी कायद्याची मात्रा लागू पडणार नाही हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यांच्याकडे शिवसेनेचे 37 आमदार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांनी 34 आमदारांच्या सहीचे समर्थनाचे पत्रच जारी केले आहे. त्याचबरोबर आणखी तीन शिवसेना आमदार गुवाहाटीला पोहोचत आहेत. त्यामुळे शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांची मॅजिक फिगर 37 गाठली असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्यातून त्यांची सहीसलामत सुटका होणार हे निश्चित झाले आहे. मात्र हे तीन आमदार कोण ते अजूनही स्पष्ट झाले नाही. मात्र रात्रीपर्यंत ही नावेही बाहेर येतील.

पक्षांतर बंदी कायद्याच्या कचाट्यातून एकनाथ शिंदे सहीसलामत वाचणार?

author img

By

Published : Jun 22, 2022, 5:01 PM IST

Updated : Jun 22, 2022, 5:24 PM IST

हैदराबाद - शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांना आता पक्षांतर बंदी कायद्याची मात्रा लागू पडणार नाही हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यांच्याकडे शिवसेनेचे 37 आमदार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांनी 34 आमदारांच्या सहीचे समर्थनाचे पत्रच जारी केले आहे. त्याचबरोबर आणखी तीन शिवसेना आमदार गुवाहाटीला पोहोचत आहेत. त्यामुळे शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांची मॅजिक फिगर 37 गाठली असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्यातून त्यांची सहीसलामत सुटका होणार हे निश्चित झाले आहे. मात्र हे तीन आमदार कोण ते अजूनही स्पष्ट झाले नाही. मात्र रात्रीपर्यंत ही नावेही बाहेर येतील.

पक्षंतर बंदी कायद्याच्या कचाट्यातून एकनाथ शिंदे सहीसलामत वाचणार?

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा व्हीप बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी सुनील प्रभू यांच्या जागी भरत गोगावले यांची मुख्य व्हीप म्हणून नियुक्ती केली आहे. म्हणजेच खुद्द शिंदे आता शिवसेनेवरच दावा ठोकत आहेत. यासोबतच त्यांनी 34 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपाल आणि उपसभापतींना दिले आहे. शिंदे 46 आमदार असल्याचा दावा करत आहेत. गुवाहाटीत सध्या शिवसेनेचे 34 आमदार असून २ अपक्ष आहेत. सध्या शिवसेनेचे दोन आमदार संजय राठोड आणि योगेश कदम सूरतला आले आहेत. त्यांच्याशिवाय आणखी दोन आमदार मंजुळा गावित आणि गोपाळ दळवी सुरत विमानतळावरून गुवाहाटीला रवाना झाले. त्यांच्यासोबत महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही आहेत. म्हणजेच संख्या 38 झाली आहे.

पक्षांतर बंदीचे गणित - बंडखोर एकनाथ शिंदे यांच्याकडील शिवसेना आमदारांचे संख्याबळ पाहता ते 34 असल्याचे या फोटोवरुन दिसते. पक्षांतर कायद्यानुसार शिंदे यांना 37 त्यांच्याबरोबर किमान 37 आमदारांची गरज आहे. शिवसेनेचे 37 आमदार जर फुटले तर त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होणार नाही. तरच त्यांचे बंड खऱ्या अर्थाने यशस्वी झाले असे म्हणता येईल. कारण सध्या शिवसेनेकडे 55 आमदार आहेत. त्यामुळे त्यातील 2/3 आमदारांची संख्या 37 होते. शिवसेनेतून किमान 37 आमदार बाहेर पडले तर त्याना पक्षांतर बंदी कायद्याचा फटका बसणार नाही. मात्र त्याहून एक जरी आमदार कमी पडला तर त्यांना पक्षांतर बंदी कायद्याच फटका बसू शकतो. तसेच त्यांचे विधानसभा सदस्यत्व जाऊ शकते. त्यामुळे शिंदे यांना अजून किमान 5 आमदारांची गरज आहे. शिंदे सांगत आहेत की त्यांच्याबरोबर 40 आमदार आहेत. आता त्यांच्याकडे 32 आमदार असल्याचे फोटोवरुन दिसते. त्यामुळे त्यांचे आणखी 5 समर्थक आमदार कोण हा प्रश्न अजूनही कायम आहे.

नवीन सरकारचे गणित - राज्यात सध्या 287 एकूण आमदार आहेत. बहुमतासाठी 144 आमदारांची गरज आहे. राज्यात भाजपकडे एकूण 113 आमदार आहेत. त्यामध्ये भाजपचे 106 आमदार आणि इतर मिळून त्यांचे एकूण संख्याबळ 113 वर जाते. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या फोटोतील आमदारांचा समावेश केल्यास त्यातील एकूण 34 आमदार जोडले तर त्यांची संख्या 147 होते. अर्थातच भाजप या सगळ्या आमदारांना बरोबर घेऊन सरकार स्थापन करु शकते. मात्र एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जर शिवसेनेचे 37 आमदार नसतील तर त्यांचे पक्षांतर बंदी कायद्यानुसार सदस्यत्व रद्द होऊ शकते.

Last Updated : Jun 22, 2022, 5:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.