ETV Bharat / bharat

एकनाथ शिंदे समर्थक आमदारांच्या फोटोमागील सरकारचे गणित, पक्षांतरबंदी कायद्यापासून वाचवण्यासाठी 5 आमदारांची गरज - Guwahati Assam

सूरतमधून माध्यमांना मिळालेल्या फोटोमध्ये त्यांच्याबरोबर 34 आमदार असल्याचे दिसत आहे. त्यातील 32 आमदार शिवसेनेचे आहेत. त्याचे इतरही काही फोटोही व्हायरल होत आहेत. त्यातील एका फोटोमध्ये राज्यातील 34 आमदार असल्याचे दिसत आहे. त्यामध्ये शिवसेनेचे एकूण 32 आमदार आहेत. तर इतर पक्षांचे 2 आमदार आहेत. यावरुन एक गोष्ट लक्षात येते की शिवसेनेचे 32 आमदार शिंदे यांच्याबरोबर असल्याचे दिसते.

एकनाथ शिंदे समर्थक आमदारांच्या फोटोमागील सरकारचे गणित

author img

By

Published : Jun 22, 2022, 11:21 AM IST

Updated : Jun 22, 2022, 2:27 PM IST

हैदराबाद - एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी होण्यासाठी त्यांना 37 शिवसेना आमदारांची गरज आहे. सूरतमधून माध्यमांना मिळालेल्या फोटोमध्ये त्यांच्याबरोबर 34 आमदार असल्याचे दिसत आहे. त्यातील 32 आमदार शिवसेनेचे आहेत. त्याचे इतरही काही फोटोही व्हायरल होत आहेत. त्यातील एका फोटोमध्ये राज्यातील 34 आमदार असल्याचे दिसत आहे. त्यामध्ये शिवसेनेचे एकूण 32 आमदार आहेत. तर इतर पक्षांचे 2 आमदार आहेत. यावरुन एक गोष्ट लक्षात येते की शिवसेनेचे 32 आमदार शिंदे यांच्याबरोबर असल्याचे दिसते.

सूरतच्या फोटोचे गणित - सूरतच्या फोटोच्या आधारावरुन महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला तर शिंदे यांच्यापाठीशी असलेले संख्याबळ पाहता राज्यसरकार संकटात असल्याचे दिसत आहे. या फोटोनुसार शिंदे यांच्याजवळ असलेल्या आमदारांच्यावरुन दिसते की नवीन सरकार बनवण्यासाठी सध्या तरी बहुमत आहे. मात्र शिवसेनेचे त्या फोटोमध्ये फक्त 32 आमदार दिसत आहेत. त्यामुळे आमदारांना जर पक्षांतर बंदी कायद्यातून सही सलामत बाहेर पडायचे असतील तर त्यांना अजून 5 शिवसेना आमदारांची गरज आहे. शिंदे यांच्या गोटातून त्यांच्याकडे 40 आमदार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र फोटोचा विचार केला तर त्यामध्ये फक्त 32 शिवसेना आमदार दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार इतर 8 शिवसेना आमदार कोण हा प्रश्नही महत्वाचा आहे.

एकनाथ शिंदे समर्थक आमदारांच्या फोटोमागील सरकारचे गणित
एकनाथ शिंदे समर्थक आमदारांच्या फोटोमागील सरकारचे गणित

शिंदे गोटातून आलेल्या या फोटोनुसार शिवसेनेचे 32 आमदार त्यामध्ये आहेत. तर इतर पक्षाचे 2 आमदार आहेत. खाली बसलेले डावीकडून तिसरे शंभूराज देसाई, चौथे अरुण बाबर, पाचवे तानाजी सावंत, सहावे संदीपान भुमरे, सातवे बच्चू कडू, आठवे शशिकांत शिंदे, दहावे प्रदीप जयस्वाल, अकरावे भरत गोगावले, बारावे बालाजी किनीकर, तेरावे संजय गायकवाड, चौदावे प्रताप सरनाईक, पाठीमागे डावीकडून उभे पहिले राजेंद्र यड्रावकर यांचे भाऊ, तिसरे रमेश बोरनारे, पाचवे यामिनी जाधव, सहावे लता सोनवणे, सातवे संजय शिरसाट, अकरावे व्हीक्ट्री साईन केलेले प्रकाश आबिटकर, तेरावे श्रीनिवास वनगा, चौदावे प्रकाश सुर्वे, सोळावे महेंद्र थोरवे, तसेच अपक्ष आमदार नरेंद्र बोंडेकरही त्यामध्ये आहेत.

संपूर्ण आमदारांची यादी - यातील संपूर्ण 34 आमदारांची नावे पुढील प्रमाणे शंभूराजे देसाई , अब्दुल सत्तार, बच्चू कडू, संदिपान भुमरे, प्रताप सरनाईक, सुहास कांदे, तानाजी सावंत, भरत गोगावले, यामिनी जाधव, अनिल बाबर, प्रकाश सुर्वे, बालाजी कल्याणकर, प्रकाश आबिटकर, संजय शिरसाट, श्रीनिवास वनगा, महेश शिंदे, संजय रायमुलकर, विश्वनाथ भोईर, सिताराम मोरे, रमेश बोरणारे, चिमणराव पाटील, लहुजी बापू पाटील, महेंद्र दळवी, प्रदीप जैस्वाल, महेंद्र थोरवे, किशोर पाटील, ज्ञानराज चौगुले, बालाजी किणेकर, उदयसिंह राजपूत, राजकुमार पटेल, लता सोनवणे, नितीन देशमुख, संजय गायकवाड, नरेंद्र मांडेकर. यांची संख्या पाहता भाजप पुरस्कृत सरकार स्थापन्यासाठी पुरेसे संख्याबळ असल्याचे दिसून येते.

पक्षांतर बंदीचे गणित - बंडखोर एकनाथ शिंदे यांच्याकडील शिवसेना आमदारांचे संख्याबळ पाहता ते 34 असल्याचे या फोटोवरुन दिसते. पक्षांतर कायद्यानुसार शिंदे यांना 37 त्यांच्याबरोबर किमान 37 आमदारांची गरज आहे. शिवसेनेचे 37 आमदार जर फुटले तर त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होणार नाही. तरच त्यांचे बंड खऱ्या अर्थाने यशस्वी झाले असे म्हणता येईल. कारण सध्या शिवसेनेकडे 55 आमदार आहेत. त्यामुळे त्यातील 2/3 आमदारांची संख्या 37 होते. शिवसेनेतून किमान 37 आमदार बाहेर पडले तर त्याना पक्षांतर बंदी कायद्याचा फटका बसणार नाही. मात्र त्याहून एक जरी आमदार कमी पडला तर त्यांना पक्षांतर बंदी कायद्याच फटका बसू शकतो. तसेच त्यांचे विधानसभा सदस्यत्व जाऊ शकते. त्यामुळे शिंदे यांना अजून किमान 5 आमदारांची गरज आहे. शिंदे सांगत आहेत की त्यांच्याबरोबर 40 आमदार आहेत. आता त्यांच्याकडे 32 आमदार असल्याचे फोटोवरुन दिसते. त्यामुळे त्यांचे आणखी 5 समर्थक आमदार कोण हा प्रश्न अजूनही कायम आहे.

नवीन सरकारचे गणित - राज्यात सध्या 287 एकूण आमदार आहेत. बहुमतासाठी 144 आमदारांची गरज आहे. राज्यात भाजपकडे एकूण 113 आमदार आहेत. त्यामध्ये भाजपचे 106 आमदार आणि इतर मिळून त्यांचे एकूण संख्याबळ 113 वर जाते. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या फोटोतील आमदारांचा समावेश केल्यास त्यातील एकूण 34 आमदार जोडले तर त्यांची संख्या 147 होते. अर्थातच भाजप या सगळ्या आमदारांना बरोबर घेऊन सरकार स्थापन करु शकते. मात्र एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जर शिवसेनेचे 37 आमदार नसतील तर त्यांचे पक्षांतर बंदी कायद्यानुसार सदस्यत्व रद्द होऊ शकते.

सरकारचे गाडे कुठे अडेल - भाजपचे चाणाक्य म्हणून राज्यात ओळख असलेले देवेंद्र फडणवीस यांना सरकार बनवण्यासाठी 144 आमदारांची गरज आहे. एकनाथ शिंदे समर्थक आमदार बरोबर घेऊन ते सरकार स्थापन करु शकतात. मात्र पक्षांतर बंदी कायद्याचा अडसर अजूनही सध्याच्या गणितानुसार त्यांच्या सरकार स्थापनेच्या आड येताना दिसत आहे. त्यावर फडणवीस कसे मात करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

गुजरातमध्ये शिवसेनेचे आणखी 3 आमदार - दुपारपर्यंत शिंदे गोटात आणखी तीन आमदार पोहोचल्याचे चित्र आहे. शिवसेनेचे तीन आमदार सूरतला पोहोचले आहेत. ते नेमके कोण आहेत ते अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र यामुळे शिंदे यांचे बळ वाढले आहे. जर असेच त्यांच्यामागे आमदार वाढत गेले तर त्यांचे बंड यशस्वी व्हायला वेळ लागणार नाही.

हेही वाचा - बंडखोर नेते एकनाथ शिंदे स्वतंत्र गट स्थापन करणार? 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा

Last Updated : Jun 22, 2022, 2:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.