ETV Bharat / bharat

Jaipur Accident : अजमेरला दर्शनास जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, ट्रेलरने कारला चिरडल्याने 8 जण जागीच ठार

author img

By

Published : May 5, 2023, 8:42 AM IST

जयपूर जिल्ह्यातील दुडू येथे गुरुवारी झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला आहे. हे सर्व भाविक फागीहून अजमेरला जात होते. त्यांच्या कारवर टँकर उलटल्याने हा अपघात झाला.

Jaipur Accident
घटनास्थळावरील ट्रेलर

जयपूर : ट्रेलरने कारला चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातात तब्बल आठ भाविकांचा बळी गेला. ही घटना गुरुवारी अजमेर जयपूर मार्गावर दुडू येथे घडली असून सगळे मृतक हे एकाच कुटूंबातील आहेत. हा अपघात इतका भीषण होता, की ट्रेलरने कारला चिरडल्यानंतर सगळे मृतदेह कारमध्ये अडकले होते. या अपघातात एक जण गंभीर जखमी असून त्याला दुडूच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जयपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राजीव पाचर हे घटनास्थळी पोहोचले असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

थर्मल प्लांटची राख भरुन जात होता ट्रेलर : कारला चिरडणारा ट्रेलर हा थर्मल प्लांटची राख भरुन अजमेरहून जयपूरच्या दिशेने जात होता. मात्र दुडू येथे ट्रेलरचा पुढचा टायर फुटल्याने ट्रेलर अनियंत्रित झाला. त्यानंतर हा ट्रेलर डिव्हायडर तोडून समोरुन येणाऱ्या भाविकांच्या कारवर आदळल्याने कारमधील तब्बल 8 जण जागीच ठार झाले. यातील एकजण गंभीर जंखमी अशून त्याला दुडूच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच जयपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राजीव पाचर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

अजमेर दर्ग्यात जियारतसाठी जात होते भाविक : थर्मल प्लांटच्या राखेने भरलेला ट्रेलर अजमेरहून जयपूरच्या दिशेने जात होता. दुडू परिसरातील रामनगरजवळ समोरचा टायर फुटल्याने ट्रेलर अनियंत्रित होऊन दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या कारवर पलटी झाला. या अपघातात कारमधील हसीना, इस्माईल, फरजाना, मुराद, रोहिना, शकील, सोनू आणि सेराज यांचा जागीच मृत्यू झाला. सर्व मृतक एकाच कुटुंबातील असून ते त्यांच्या फागी गावातून अजमेर दर्ग्याकडे जियारतसाठी जात होते. या अपघातात जखमी झालेल्या एका व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. सर्व मृतदेह दुडू रुग्णालयात आणण्यात आले आहेत. तिथे शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक राजीव पाचर यांनी दिली.

एफएसएल टीम घटनास्थळी दाखल : अपघातानंतर ट्रेलर चालक वाहन सोडून पळून गेला. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. जयपूरची एफएसएल टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. अपघाताचे खरे कारण काय आहे हे शोधण्यासाठी हे पथक घटनास्थळावरून ट्रकचे टायर व इतर पुरावे गोळा करणार आहे. त्या आधारे यापुढे अशा घटना घडू नयेत, यासंदर्भात मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहितीही पोलीस अधीक्षक राजीव पाचर यांनी दिली आहे.

अपघातात कारचा चक्काचूर : हा अपघात एवढा भीषण होता की, टँकरखाली दबल्यामुळे कार पूर्ण चक्काचूर झाली आहे. कारमधील प्रवाशांचे मृतदेहही कारमध्ये अडकले होते. अशा परिस्थितीत मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह बाहेर काढले. अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर बराच वेळ वाहतूक जाम झाली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने रस्त्यावरील कोंडीत सापडलेली कार हटवून रोड खुला केला.

हेही वाचा - जोपर्यंत सनातन बालक जिवंत आहे तोपर्यंत बजरंग दलावर बंदी अशक्य -गिरिराज सिंह

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.