नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये (केएनपी) नामिबियातून आणलेल्या चित्त्यांना सोडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली. ते म्हणाले की, आठ चिते आले आहेत, पण 16 कोटी नोकऱ्या आठ वर्षात का आल्या नाहीत?, असा सवाल त्यांनी विचारला आहे.
त्यांनी ट्विट केले, '8 चिते आले, आता मला सांगा, 8 वर्षांत 16 कोटी नोकऱ्या का आल्या नाहीत? तरुणांसमोर आव्हान आहे, ते रोजगाराचे. पंतप्रधानांनी दरवर्षी दोन कोटी नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते, ते पूर्ण केले नाही, असा काँग्रेस आणि राहुल गांधींचा आरोप आहे.
पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट केले की, पंतप्रधान क्वचितच प्रशासनातील सातत्य स्वीकारतात. चीता प्रकल्पासाठी 25 एप्रिल 2010 रोजी माझी केपटाऊन भेट हे त्याचे ताजे उदाहरण आहे. राष्ट्रीय प्रश्न दडपण्यासाठी आणि 'भारत जोडो यात्रे'वरून लक्ष हटवण्यासाठी हा सगळा प्रकार रचण्यात आल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.
पंतप्रधान मोदींनी शनिवारी मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नामिबियातून आणलेल्या चित्त्याचे विशेष बंदोबस्तात सोडले. यावेळी मोदी आपल्या प्रोफेशनल कॅमेऱ्याने चित्त्यांची काही छायाचित्रे काढतानाही दिसले. नामिबियातील आठ चित्ते सात दशकांनंतर देशव्यापी पुनर्वसन प्रकल्पाचा भाग म्हणून शनिवारी सकाळी कुनो राष्ट्रीय उद्यानात दाखल झाले. प्रथम त्यांना विशेष विमानाने ग्वाल्हेर विमानतळावर आणि नंतर हेलिकॉप्टरने श्योपूर जिल्ह्यातील केएनपी येथे आणण्यात आले.