कोलकाता- पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण चांगले तापले आहे. भाजपच्या आठ आमदारांनी राजीनामे दिले आहेत. मुकल रॉय यांना लोक लेखा समितीचे चेअरमन पद दिल्याने भाजप आमदारांनी हे पाऊल उचलले आहे. भाजपच्या सर्व आमदारांनी पश्चिम बंगाल विधानसभा समिती आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
भाजप आमदार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेता शुभेंदु अधिकारी म्हणाले, की लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदाच्या नेमणुकीत पश्चिम बंगाल विधानसभेत राजकारण होत आहे. या मुद्द्यावरून आम्ही राज्यापालांकडे आलो आहे. भाजपला मतदान करणाऱ्या 2.28 कोटी लोकांना वेगळे पाडण्याच्या विरोधात भाजपने राज्यपालांची चर्चा केली आहे. राज्यांच्या परंपरांना पहिल्यांदा तडा गेल्याचे राज्यपालांना सांगितले आहे.

हेही वाचा-NEET PG 2021 exam 11 सप्टेंबरला होणार- मनसुख मांडवीय
मुकल रॉय यांना लोक लेखा समितीचे प्रमुखपद देण्याला विरोध
आठही आमदारांनी मंगळवारी विधानसभेत समिती आणि स्थायी समितींचे राजीनामे दिले आहेत. विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामे दिल्यानंतर आमदार हे राजभवनला पोहोचले. त्यावेळी शुभेंदु अधिकारी हेदेखील उपस्थित होते. माध्यमातील वृत्तानुसार मुकल रॉय यांना लोक लेखा समितीचे (पीएसी) प्रमुखपद देण्याला विरोध करत आमदारांनी राजीनामा दिला आहे.
हेही वाचा-डॉक्टर तरुणीच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपा कॅमेरा; पुण्यातील नामांकित डॉक्टरला बेड्या
ही आहेत राजीनामा देणाऱ्या भाजप आमदारांची नावे
- मिहिर गोस्वामी
- मनोज तिग्गा
- कृष्णा कल्याणी
- निखिल रंजन डे
- विष्णुप्रसाद शर्मा
- दीपक बारमैन
- अशोक कीर्तनिए
- आनन्दमय बारमैन
हेही वाचा-VIDEO : शक्य तोपर्यंत धर्मयुद्ध टाळणार, योग्य वेळी घेणार निर्णय, ऐका काय म्हणाल्या पंकजा मुंडे
भाजपाला रामराम ठोकत मुकुल रॉय यांनी केली आहे घरवापसी
भाजपाला रामराम ठोकत मुकुल रॉय यांनी जून 2021 मध्ये पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2017 मध्ये टीएमसी सोडत भाजपाचे कमळ त्यांनी हाती घेतले होते. तब्बल चार वर्षानंतर त्यांची घरवापसी झाली आहे. यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘घर का लडका घर वापस आया' अशी प्रतिक्रिया दिली होती. तसेच आता तृणमूल काँग्रेसमध्ये त्यांची काय भूमिका राहील, हेही ममतांनी स्पष्ट केले होते