नवी दिल्ली - जेईई-मेन्सच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशांक हे थोड्याच वेळात अभियांत्रिकी प्रवेशासाठी जेईई-मेनच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. जेईई मेन्सची परीक्षा २० जुलै ते २५ जुलै दरम्यान होणार आहे. तर जेईई मेन्समधील चौथ्या टप्प्यातील परीक्षा २७ जुलै ते २ ऑगस्टला होणार आहे.
जेईई-मेन्स ही वर्षातून चार वेळा विद्यार्थ्यांच्या सोयीप्रमाणे घेण्यात येते. पहिल्या टप्प्यात फेब्रुवारी तर दुसऱ्या टप्प्यात मार्चमध्ये जेईई-मेन्स परीक्षा घेण्यात आली आहे. मात्र, एप्रिल आणि मे महिन्यातील परीक्षा कोरोना महामारीमुळे परीक्षा ढकलली आहे. याबाबत केंद्रीय शिक्षणमंत्री आज महत्त्वाची घोषणा केली आहे.
-
#JEEMains2021 to be conducted from July 20th to 25th and July 27th to August 2nd, 2021. pic.twitter.com/hjpBEqjFc9
— ANI (@ANI) July 6, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#JEEMains2021 to be conducted from July 20th to 25th and July 27th to August 2nd, 2021. pic.twitter.com/hjpBEqjFc9
— ANI (@ANI) July 6, 2021#JEEMains2021 to be conducted from July 20th to 25th and July 27th to August 2nd, 2021. pic.twitter.com/hjpBEqjFc9
— ANI (@ANI) July 6, 2021
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते, की प्रिय विद्यार्थ्यांनो ज्या गोष्टीची तुम्ही खूप आतुरतेने वाट पाहत आहात, त्याची घोषणा मंगळवारी 7 वाजता करणार आहेत. तुम्हाला मी तिसऱ्या व चौथ्या टप्प्यातील परीक्षेची माहिती देणार आहे.
हेही वाचा-गुजरातमध्ये महामार्गावर मुक्तसंचार करताना दिसले ५ सिंह, व्हिडिओ व्हायरल
कोरोनामुळे ढकलण्यात आली परीक्षा-
केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेची तारीख 3 जुलै 2021 जाहीर केली होती. मात्र, कोरोनामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. कोरोना विषाणूमुळे उद्भवणारी परिस्थिती सामान्य झाल्यानंतर जेईई अॅडव्हान्स परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली जाईल, असे आयआयटी खरगपूरने म्हटले होते.
हेही वाचा-चांदी प्रति किलो ३९७ रुपयांनी महाग; जाणून घ्या सोन्याचे दर
परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर झाले होते!
जेईई मेन परीक्षा उत्तीर्ण झालेले अडीच लाख उमेदवार जेईई अॅडव्हान्स परीक्षा देणार आहेत. जेईई अॅडव्हान्स परीक्षेत दोन पेपर असतात. 3 जुलै रोजी जेईई अॅडव्हान्सचा पहिला पेपर सकाळी 9 ते 12 या वेळेत आणि दुसरा पेपर दुपारी अडीच ते सायंकाळी 5.30 या वेळेत होणार होता. मात्र आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. जेईई अॅडव्हान्स परीक्षा आयआयटीसह विविध केंद्रीय संस्थांतील प्रवेशासाठी घेण्यात येते. आयआयटी खडगपूरने या परीक्षेसाठी मॉक टेस्ट जाहीर केल्या होत्या. याशिवाय विषयवार अभ्यासक्रमही jeeadv.ac.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे.