मुंबई - मुंबईतील पत्राचाळ प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ( Shiv Sena leader MP Sanjay Raut भांडूप येथील घरी आज ईडीने धडक देत कारवाईला सुरुवात केली. ईडीने यापूर्वी ( ED Officers दोनदा समन्स बजावले होते. संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने राहू त्यांनी वेळ मागवून घेतली ( ED Raid Sanjay Raut home ) होती. मात्र सकाळपासूनच कारवाईला सुरुवात केल्याने राऊत यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणात अनियमितता आढळून आल्याने संजय राऊत यांची ईडीमार्फत चौकशी सुरू होती. पत्राचाळीत राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी ईडीकडे तक्रार केली होती. ईडीने राऊत यांना ईडीकडून वारंवार समन्स बजावण्यात आले होते. १ जुलै रोजी ईडीने १० तास चौकशी केली. त्यानंतर पुन्हा दोन वेळा संजय राऊत यांना समन्स बजावले. मात्र, संसदेचे अधिवेशन सुरू असल्याचे सांगत राऊत यांनी मुदत वाढ मिळावी, अशी मागणी केली होती. आज पहाटे ईडीच्या पथकाने राऊत यांच्या घरी धाड टाकली असून चौकशीला सुरूवात केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारची सुरक्षा व्यवस्था घराबाहेर तैनात केली आहे.
वकिलांमार्फत ईडीकडे वेळ मागितला-शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांना पुन्हा ईडीने चौकशी करिता मुंबईतील ( MP Sanjay Raut ED probe ) ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र, लोकसभा अधिवेशनामुळे राऊत उपस्थित राहिले नसून त्यांनी 8 ऑगस्टपर्यंत वकिलांमार्फत ईडीकडे वेळ मागितला असण्याची माहिती मिळाली आहे. ( Shiv Sena MP Sanjay Raut ) गोरेगाव येथील पत्रा चाळ कथित घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावले होते. यापूर्वी 7 जुलै रोजी 10 तास संजय राऊत यांची चौकशी करण्यात आली होती.
काय आहे पत्राचाळ घोटाळा ( Patra chawl corruption ) ? - मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा म्हाडा भूखंड आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा 1,034 कोटी रुपयांचा आहे. पत्राचाळमध्ये राहणाऱ्या 672 भाडेकरूंना सदनिका देण्याची योजना सरकारने आखली. तेव्हा हा घोटाळा सुरू झाला. ही चाळ विकसित करण्याचे कत्रांट महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाने प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला दिले होते.
हेही वाचा-हेही वाचा-CM Eknath Shinde Delhi Tour : महाराष्ट्र दौरा अर्थवट सोडून मुख्यमंत्री शिंदे पुन्हा दिल्लीला रवाना; भाजप पक्षश्रेष्ठींची घेणार भेट