ETV Bharat / bharat

ईडीच्या अधिकाऱ्याला २० लाख रुपयांची लाच घेताना अटक - मदुराई अंमलबजावणी विभागाच्या कार्यालयावर छापा

ED Officer Taking Bribe : तामिळनाडूच्या लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालयानं ईडीच्या अधिकाऱ्याला २० लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यानं एका डॉक्टरकडून ही रक्कम मागितली होती. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मदुराई अंमलबजावणी विभागाच्या कार्यालयावर छापा टाकला.

ED Officer Taking Bribe
ED Officer Taking Bribe
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 1, 2023, 10:32 PM IST

दिंडीगुल (तामिळनाडू) ED Officer Taking Bribe : तामिळनाडूच्या दिंडीगुल जिल्ह्यात शुक्रवारी (१ डिसेंबर) अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) अधिकाऱ्याला डॉक्टरकडून २० लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. अंकित तिवारी असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. रोख रकमेसोबत केंद्रीय एजन्सीनं जारी केलेले त्याचं अधिकृत ओळखपत्रही त्याच्याकडून जप्त करण्यात आलं. अवघ्या चार महिन्यांपूर्वी त्याची नागपूरहून येथे बदली झाली होती.

३ कोटी रुपयांची लाच मागितली : लिंक्डइन प्रोफाईलनुसार, अटक करण्यात आलेला व्यक्ती पाच वर्षांहून अधिक काळ ईडीमध्ये काम करत आहे. सेंट्रल एजन्सीमध्ये सामील होण्यापूर्वी, त्यानं बिग फोर अकाउंटिंग फर्मपैकी एकामध्ये काम केलंय. दिंडीगुल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुरेश बाबू यांना या प्रकरणातून वाचवण्यासाठी अंकित तिवारीनं ३ कोटी रुपयांची लाच मागितली होती. ती अंमलबजावणी संचालनालयाकडे सोपवणार असल्याचं सांगितलं होतं. डॉ. सुरेश यांना हे मान्य नव्हतं.

५१ लाख रुपयांचा समझोता झाला : अखेर ५१ लाख रुपयांचा समझोता झाला. त्यापैकी डॉ. सुरेश बाबू यांनी १ नोव्हेंबर रोजी २० लाख रुपये दिले. अंकित तिवारीनं ३० नोव्हेंबर रोजी व्हॉट्सअ‍ॅप कॉलद्वारे डॉक्टरकडे उर्वरित रक्कम मागितली. यावर डॉ. सुरेश बाबू यांनी दिंडीगुल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ३० नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केली. या प्रकरणात, लाचलुचपत प्रतिबंधक पोलिसांनी सांगितल्यानुसार, त्यानं १ डिसेंबर रोजी दिंडीगुल येथील मदुराई बायपास रोडवर अधिकाऱ्याच्या कारमध्ये २० लाख रुपये ठेवले होते.

टोलनाक्यावर अटक केली : दरम्यान, दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालयाच्या (डीव्हीएसी) पथकानं त्याला घेराव घातला. त्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, दिंडीगुल ते मदुराई या मार्गावरील कोडई रोडवरील टोलनाक्यावर कार जप्त करण्यात आली. ईडीच्या अधिकाऱ्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून २० लाख रुपये जप्त करण्यात आले. या मालिकेत दिंडीगुल जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासासाठी मदुराई थबल थांथी नगर भागातील अंमलबजावणी विभागाच्या सहाय्यक विभागीय कार्यालयाला भेट दिली. यावर अंमलबजावणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला अंमलबजावणी विभागाच्या कार्यालयात उच्चपदस्थ अधिकारी नसताना झडती घेण्याची परवानगी देऊ शकत नाही.

ईडीच्या मदुराई कार्यालयात छापे : याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी बराच वेळ वाट पाहत राहिले. तोपर्यंत १०० हून अधिक पोलीस जमा झाले होते. तसेच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केलेल्या अंमलबजावणी अधिकाऱ्यानं वापरलेल्या खोल्यांची झडती घेण्याची परवानगी मागितली. दरम्यान, अंमलबजावणी विभागाचे वकीलही अंमलबजावणी विभागाच्या कार्यालयात गेले. छाप्याला परवानगी मिळाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक पोलिसांनी मदुराई अंमलबजावणी संचालनालयाच्या सहायक प्रादेशिक कार्यालयात छापे टाकण्यास सुरुवात केली.

हेही वाचा :

  1. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, मालवाहू जहाजातून तब्बल २०० कोटी रुपयांचं कोकेन जप्त!
  2. पार्टी भोवली! पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये पार्टी करणारे चार पोलीस निलंबित

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.