ETV Bharat / bharat

भाजपा आणि तृणमूल काँग्रेसचे उमेदवारावर 24 तासांची प्रचार बंदी; निवडणूक आयोगाची कारवाई - CAMPAIGN BAN ON BJP SAYANTAN BASU

वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने भाजपा नेते सयंतन बसू आणि तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या सुजाता मंडल यांच्यावर 24 तासांची प्रचार बंदी घातली आहे. दोन्ही नेत्यांवर 18 एप्रिल सांयकाळी 7 ते 19 एप्रिल सांंयकाळी 7 वाजेपर्यंत ही बंदी असेल. या वेळेत दोन्ही नेते निवडणूक प्रचारात भाग घेऊ शकणार नाहीत.

पश्चिम बंगाल
पश्चिम बंगाल
author img

By

Published : Apr 19, 2021, 1:22 AM IST

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सत्तेत येण्यासाठी भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई पाहायला मिळत असून दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून प्रचार सभा घेण्यात येत आहेत. मतदानाच्या प्रत्येक टप्प्यानंतर राजकारण तापत चाललं आहे. वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने भाजपा नेते सयंतन बसू आणि तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या सुजाता मंडल यांच्यावर 24 तासांची प्रचार बंदी घातली आहे. दोन्ही नेत्यांवर 18 एप्रिल सांयकाळी 7 ते 19 एप्रिल सांंयकाळी 7 वाजेपर्यंत ही बंदी असेल. या वेळेत दोन्ही नेते निवडणूक प्रचारात भाग घेऊ शकणार नाहीत.

यापूर्वी निवडणूक आयोगाने भाजपा अध्यक्ष दिलीप घोष यांच्यावर २४ तासांची प्रचार बंदी घातली होती. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल, त्यांच्यावर 15 एप्रिल सांयकाळी 7 वाजल्यापासून ते 16 एप्रिल सायंकाळी 7 पर्यंत प्रचार बंदी घालण्यात आली होती. तसेच निवडणूक आयोगाने भाजपा नेता राहुल सिन्हावर 48 तासांसाठी प्रचार बंदी लावली होती. तर निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांच्यावर 24 तासांसाठी प्रचार बंदी घातली होती. अल्पसंख्याक मतांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई केली होती. ममतांनी लोकप्रतिनिधी कायदा आणि आचारसंहितेच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याचे निवडणूक आयोगाने म्हटलं होते.

भाजपाचे खासदार सौमित्र खान यांच्या सुजाता मंडल पत्नी आहेत. मंडल यांच्या तृणमूलमध्ये जाण्याच्या निर्णयानंतर त्यांच्या पतीने त्यांना तलाक देण्याची घोषणा केली होती. राजकारणाच्या या ड्राम्यामुळे त्यांचं १० वर्षांचं नात संकटात आलं होते.

आठ टप्प्यात मतदान -

पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान 8 टप्प्यात मतदान होत आहे. मतदानाचा पहिला टप्पा हा 27 मार्चला पार पडला. तर दुसरा टप्पा हा 1 एप्रिल, तिसरा टप्पा 6 एप्रिल, चौथा टप्पा 10 एप्रिला पार पडला आहे. तर पाचवा टप्पातील मतदान 17 एप्रिलला झाले. तर सहावा टप्पा 22 एप्रिल, सातवा टप्पा 26 एप्रिलला आणि आठवा टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला पार पडेल.

दीदींसमोर आव्हान -

गेल्या 10 वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे. आता ममता बॅनर्जी हॅटट्रीक करण्याच्या प्रयत्नात आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना एकाच वेळी दोन आव्हानांचा सामना करावा लागतोय. एक म्हणजे काँग्रेस आणि डाव्या पक्षांची आघाडी आणि दुसरीकडे भाजपप्रणित एनडीए आहे.

हेही वाचा - आंध्र प्रदेश: मुलीवर झालेल्या बलात्कारातून झाली एकाच कुटुंबातील ६ जणांची हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.